भावनांचा पूर ओसरला, किनारा राहिला नाही,
मनातल्या त्या माणसाचा ठाव आता कुठेच नाही.
शब्द सारे बोललो मी, अर्थ सारे मूक झाले,
ओठ होते समोर तरी, एकही संवाद नाही.
फूल होते कालपर्यंत, गंध होता श्वासभरचा,
आज त्या नात्यावरी विश्वासाचा थेंब नाही.
रोज थोडे तुटत गेलो, रोज थोडे विझत गेलो,
घाव देणाऱ्यालाही माझ्या वेदनेचा बोध नाही.
डोळ्यांमध्ये पावसांचे ढग दाटून उभेच होते,
हास्य ओठी ठेवले तरी आसवांना वाट नाही.
जखम जेव्हा मनास झाली, औषधांनी काय व्हावे?
मनच जेथे दूर गेले, त्या विरहाला अंत नाही.
सोडताना हात माझा, एकदाही वळून पाहिलं?
एवढ्याशा प्रश्नाचंही आजवर उत्तर नाही.
जपले ज्याला जीवापाड, तोच परका होत गेला,
मनातून जो उतरला, परत त्याचा ठाव नाही.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
भावनांचा पूर ओसरला, किनारा राहिला नाही,
मनातल्या त्या माणसाचा ठाव आता कुठेच नाही.
शब्द सारे बोललो मी, अर्थ सारे मूक झाले,
ओठ होते समोर तरी, एकही संवाद नाही.
फूल होते कालपर्यंत, गंध होता श्वासभरचा,
आज त्या नात्यावरी विश्वासाचा थेंब नाही.
रोज थोडे तुटत गेलो, रोज थोडे विझत गेलो,
घाव देणाऱ्यालाही माझ्या वेदनेचा बोध नाही.
डोळ्यांमध्ये पावसांचे ढग दाटून उभेच होते,
हास्य ओठी ठेवले तरी आसवांना वाट नाही.
जखम जेव्हा मनास झाली, औषधांनी काय व्हावे?
मनच जेथे दूर गेले, त्या विरहाला अंत नाही.
सोडताना हात माझा, एकदाही वळून पाहिलं?
एवढ्याशा प्रश्नाचंही आजवर उत्तर नाही.
जपले ज्याला जीवापाड, तोच परका होत गेला,
मनातून जो उतरला, परत त्याचा ठाव नाही.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
Post Views: 1