काश्मीर एक जाणीव – भाग तीन

कांद्याच्या गरमागरम भज्यांबरोबर , तुम्ही कधी वाफाळता चहा घेतला आहे ?
हा काय प्रश्न झाला का ?
असं कुणालाही वाटेल .
आणि खरंच आहे ते .

पण मंडळी , आता त्यात सुधारणा करतो .
सभोवताली मायनस तापमान असताना , तलावाच्या पाण्यात हात घातल्यावर थंडपणामुळे बधिरता आलेली असताना , दातावर दात आपटत असताना , कुठल्याही वस्तूला हात लावल्यावर बर्फच हातात घेतल्याची भावना होत असताना , कांद्याची गरम भजी आणि वाफाळलेला चहा समोर आल्यावर काय होईल ?
सुटलं ना तोंडाला पाणी ?

थांबा मग जरा ...

श्रीनगरला उतरल्यानंतर शिकाऱ्यातून हाऊसबोटीत गेल्यानंतर , जणू एखाद्या पंचतारांकित राजवाड्यात गेल्यावर होणारं स्वागत अनुभवायला मिळालं तर ...?
आलिशान डायनिंग रूम , तेथील मंद दिवे , जुन्या काळातील डायनिंग टेबल , खुर्च्या , त्यावर नजाकतीने मांडून ठेवलेला भजी आणि चहाचा सरंजाम , अदबीनं सर्व्ह केलेल्या पदार्थांची कलात्मक डिश ...
क्या बात है !
असेच उद् गार तोंडून बाहेर पडतात न पडतात तोच ,
" आप हॉल मे भी बैठ सकते है , या फिर ऐतराज ना हो तो दिवाण ए खास , याने बाहर भी बैठ सकते हो . बाहर का नजारा भी शायद आपको पसंद आ जाएगा . "
अशी अदबशीर विनवणी ऐकल्यानंतर थेट बाहेरचा नजारा पाहण्याची इच्छा नाही झाली तरच नवल .

खरं सांगतो यार ...

बाहेरचं दृश्य बघितल्यावर भान हरपून गेलं .
बाहेर छानपैकी सजवलेला कलात्मक सोफा , सहासात जणांना आरामात बसता येईल अशी बैठक व्यवस्था , समोरचं शांत गहिरं पाणी , जवळच्या रस्त्यावरच्या दिव्यांचं पडलेलं प्रतिबिंब , सजवलेल्या हाऊसबोटी वरचं लायटिंग आणि त्यामुळं अंधारलेल्या वातावरणात निर्माण झालेले सप्तरंग ...

आम्ही सगळे मूक झालो होतो .
नंदनवनात आल्याची जाणीव पुन्हा पुन्हा होत होती .
आणि आम्ही सगळ्यांनी नव्या काळाला अनुसरून फोटोसेशन करून घेतलं.

हातातला चहा थंड झाल्याची जाणीव म्हाताऱ्या मालकानं करून दिली , तेव्हा आम्ही भानावर आलो .

" मैं फिरसे आप के लिये चाय लाता हूं ."

तो पाठी वळून किचनकडे गेला .
आणि पुन्हा एकदा गरम कांदा भजी आणि चहा असं सेशन झालं .
कधी नव्हे इतका दोन मोठाले कप भरून चहा घेतला .
सौभाग्यवती डोळ्याच्या एका कोपऱ्यातून पहात होती , कारण घरी दोन चमचे चहा , इतकंच माझं चहा घेण्याचं प्रमाण होतं , आणि आज मी चहा घेण्याचा कहर केला होता .

जाने भी दो यारो ...
अशी उन्मनी अवस्था घरी कुठे अनुभवायला मिळते ?

मग सगळी हाऊस बोट म्हाताऱ्या मालकाच्या तोंडून ऐकत पाहू लागलो .
एकेक पुराण्या वस्तू पाहताना , हाऊसबोटीची अंतर्गत रचना पाहताना , थकायला झालं .

राहण्याची इतकी उत्तम व्यवस्था , कमर्शियल असूनही घरगुती संवादाचा आणि वागण्याचा दिलेला टच ...

सारंच विलोभनीय होतं .
सगळं अनपेक्षित होतं .

आणि तरीही...

काश्मीर मधली परिस्थिती...
भूतकाळ...
वर्तमानकाळ...
तिथल्या निसर्गसौंदर्याला लागणारे गालबोट ...

विसरता येत नव्हते .

--रात्री अचानक केव्हातरी जाग आली .
थंडी आणखी वाढली होती . बंदिस्त बेडरूममध्ये खूपच जाणवत होती .
मी मोबाईल मध्ये पाहिले .
रात्रीचे तीन वाजले होते .

काय वाटलं कुणास ठाऊक .
मी रुमचं दार उघडून बाहेर आलो .
टपून बसल्यासारख्या असणाऱ्या थंडीने झडप घातली .
मी आणखी काकडलो .

हाऊसबोटीचं दार उघडून बाहेर आलो .
पाचच मिनिटात परत रूममध्ये आलो .
सुरक्षित जागी .

पण बाहेर पाहिलेलं दृश्य डोळ्यासमोर तसंच होतं .
त्या पाच मिनिटात , कडाक्याच्या थंडीत सैनिकांची एक गाडी गस्त घालण्यासाठी फिरत होती .

थंडीची तमा न बाळगता .
जिभेचे लाड न पुरवता .
गरम चहाची अपेक्षाही न ठेवता .

केवळ नागरिकांच्या सुरक्षेसाठी !
काश्मीरचं अस्तित्व टिकवण्यासाठी .

- मी पुन्हा अंतर्मुख झालो .

तिन्हीसांजेला घेतलेल्या चहाची चव आता पूर्ण विसरायला झाली होती .

( क्रमशः)

- श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी
----------------------------------------

लेखमाला आवडल्यास नावासह सर्वत्र पाठवायला हरकत नाही .

कांद्याच्या गरमागरम भज्यांबरोबर , तुम्ही कधी वाफाळता चहा घेतला आहे ?
हा काय प्रश्न झाला का ?
असं कुणालाही वाटेल .
आणि खरंच आहे ते .

पण मंडळी , आता त्यात सुधारणा करतो .
सभोवताली मायनस तापमान असताना , तलावाच्या पाण्यात हात घातल्यावर थंडपणामुळे बधिरता आलेली असताना , दातावर दात आपटत असताना , कुठल्याही वस्तूला हात लावल्यावर बर्फच हातात घेतल्याची भावना होत असताना , कांद्याची गरम भजी आणि वाफाळलेला चहा समोर आल्यावर काय होईल ?
सुटलं ना तोंडाला पाणी ?

थांबा मग जरा …

श्रीनगरला उतरल्यानंतर शिकाऱ्यातून हाऊसबोटीत गेल्यानंतर , जणू एखाद्या पंचतारांकित राजवाड्यात गेल्यावर होणारं स्वागत अनुभवायला मिळालं तर …?
आलिशान डायनिंग रूम , तेथील मंद दिवे , जुन्या काळातील डायनिंग टेबल , खुर्च्या , त्यावर नजाकतीने मांडून ठेवलेला भजी आणि चहाचा सरंजाम , अदबीनं सर्व्ह केलेल्या पदार्थांची कलात्मक डिश …
क्या बात है !
असेच उद् गार तोंडून बाहेर पडतात न पडतात तोच ,
” आप हॉल मे भी बैठ सकते है , या फिर ऐतराज ना हो तो दिवाण ए खास , याने बाहर भी बैठ सकते हो . बाहर का नजारा भी शायद आपको पसंद आ जाएगा . ”
अशी अदबशीर विनवणी ऐकल्यानंतर थेट बाहेरचा नजारा पाहण्याची इच्छा नाही झाली तरच नवल .

खरं सांगतो यार …

बाहेरचं दृश्य बघितल्यावर भान हरपून गेलं .
बाहेर छानपैकी सजवलेला कलात्मक सोफा , सहासात जणांना आरामात बसता येईल अशी बैठक व्यवस्था , समोरचं शांत गहिरं पाणी , जवळच्या रस्त्यावरच्या दिव्यांचं पडलेलं प्रतिबिंब , सजवलेल्या हाऊसबोटी वरचं लायटिंग आणि त्यामुळं अंधारलेल्या वातावरणात निर्माण झालेले सप्तरंग …

आम्ही सगळे मूक झालो होतो .
नंदनवनात आल्याची जाणीव पुन्हा पुन्हा होत होती .
आणि आम्ही सगळ्यांनी नव्या काळाला अनुसरून फोटोसेशन करून घेतलं.

हातातला चहा थंड झाल्याची जाणीव म्हाताऱ्या मालकानं करून दिली , तेव्हा आम्ही भानावर आलो .

” मैं फिरसे आप के लिये चाय लाता हूं .”

तो पाठी वळून किचनकडे गेला .
आणि पुन्हा एकदा गरम कांदा भजी आणि चहा असं सेशन झालं .
कधी नव्हे इतका दोन मोठाले कप भरून चहा घेतला .
सौभाग्यवती डोळ्याच्या एका कोपऱ्यातून पहात होती , कारण घरी दोन चमचे चहा , इतकंच माझं चहा घेण्याचं प्रमाण होतं , आणि आज मी चहा घेण्याचा कहर केला होता .

जाने भी दो यारो …
अशी उन्मनी अवस्था घरी कुठे अनुभवायला मिळते ?

मग सगळी हाऊस बोट म्हाताऱ्या मालकाच्या तोंडून ऐकत पाहू लागलो .
एकेक पुराण्या वस्तू पाहताना , हाऊसबोटीची अंतर्गत रचना पाहताना , थकायला झालं .

राहण्याची इतकी उत्तम व्यवस्था , कमर्शियल असूनही घरगुती संवादाचा आणि वागण्याचा दिलेला टच …

सारंच विलोभनीय होतं .
सगळं अनपेक्षित होतं .

आणि तरीही…

काश्मीर मधली परिस्थिती…
भूतकाळ…
वर्तमानकाळ…
तिथल्या निसर्गसौंदर्याला लागणारे गालबोट …

विसरता येत नव्हते .

–रात्री अचानक केव्हातरी जाग आली .
थंडी आणखी वाढली होती . बंदिस्त बेडरूममध्ये खूपच जाणवत होती .
मी मोबाईल मध्ये पाहिले .
रात्रीचे तीन वाजले होते .

काय वाटलं कुणास ठाऊक .
मी रुमचं दार उघडून बाहेर आलो .
टपून बसल्यासारख्या असणाऱ्या थंडीने झडप घातली .
मी आणखी काकडलो .

हाऊसबोटीचं दार उघडून बाहेर आलो .
पाचच मिनिटात परत रूममध्ये आलो .
सुरक्षित जागी .

पण बाहेर पाहिलेलं दृश्य डोळ्यासमोर तसंच होतं .
त्या पाच मिनिटात , कडाक्याच्या थंडीत सैनिकांची एक गाडी गस्त घालण्यासाठी फिरत होती .

थंडीची तमा न बाळगता .
जिभेचे लाड न पुरवता .
गरम चहाची अपेक्षाही न ठेवता .

केवळ नागरिकांच्या सुरक्षेसाठी !
काश्मीरचं अस्तित्व टिकवण्यासाठी .

– मी पुन्हा अंतर्मुख झालो .

तिन्हीसांजेला घेतलेल्या चहाची चव आता पूर्ण विसरायला झाली होती .

( क्रमशः)

– श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी
—————————————-

लेखमाला आवडल्यास नावासह सर्वत्र पाठवायला हरकत नाही .

Author