काही माणसं
मैत्रीने खांद्यावर हात टाकतात
दु:खातही कायम साथ देतात.
काही माणसं
गजबजलेल्या शहरासारखी असतात,
गरज पडली तरच आपला विचार करतात.
बाकीच्या वेळी ते सगळी नाती विसरतात.
मात्र काही माणसं
पिंपळाच्या पानांसारखी असतात
जाळी झाली तरी मनाच्या पुस्तकात
आयुष्यभर जपून ठेवतात…
Author
Post Views: 14