जपून धरायला हव्या होत्या
ओंजळीतल्या कळ्या..
सुगंध हरपून गेला तर
मग काय उरते?
प्रेमाचही असंच आहे
प्रेम भावना मिटवून
टाकता येतं नाही मनात..
सांजवेळी त्याचीही
भरती येते..
अडीच अक्षरांचा डाव
आणि जन्मभराचा घावं…
अडकून जातो चक्रव्यूहात
प्रेम भावना जपणारा…
रमून जातो भावनांशी
कोणी खेळ खेळणारा..
मनाला प्रेमाचे व्यसन
लावायचे नाही..
पण जीव मात्र लावला
जावा आपापल्या परीने..
कारण जगायचं तर असते
प्रेमाच्या ताकदीने..
अपेक्षांचे ओझे आपणच उतरायचे..
प्रेम सर्वप्रथम आपणच आपल्याशी करायचे.
जगण्याचे सुंदर कारण स्वतःच बनून जायचे..
प्रतिभा चौगले यांच्या प्रतिभास या कवितासंग्रहाच्या इ-पुस्तकातील ही कविता.
हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.
किंमत : रु.८०/-
सवलत किंमत : रु.५०/-
https://marathibooks.com/books/pratibhas-by-pratibha-chougale/