हेल्मेट, रिस्टबँड, नीकॅप आदी संरक्षणाची विविध आयुधे फारशी प्रचलित नसताना खेळपट्टीजवळ क्षेत्ररक्षण करणे हेच एक आव्हान समजले जाणाऱ्या काळात फॉरवर्ड शॉर्टलेगला उभे राहून क्षेत्ररक्षणावर कारकीर्द गाजविणारा खेळाडू म्हणून भारताचा एकनाथ सोलकर याचा नावलौकिक होता.
त्यांच्या नावाने मुंबईत क्रिकेट प्रशिक्षण अकादमी सुरू करण्यात आली आहे, यानिमित्ताने या महान खेळाडूच्या स्मृती जाग्या होतात. ‘कॅचेस विन मॅचेस’ हे तत्त्व यशस्वी करून दाखविणाऱ्यांमध्ये एकनाथ हा अग्रेसर होता. बिशनसिंग बेदी, एरापल्ली प्रसन्ना, भागवत चंद्रशेखर व एस. वेंकटराघवन या भारतीय फिरकी गोलंदाजांच्या यशात एकनाथचा मोठा वाटा होता. झेल हे निर्माण करावयाचे असतात. क्रिकेटमधील श्रेष्ठ फलंदाज खेळपट्टीवर खेळत असताना त्यांचे कोणतेही दडपण न घेता खेळपट्टीजवळच उभे राहून क्षेत्ररक्षण करण्यात एकनाथ हा माहीर होता. आता क्षेत्ररक्षणासाठी जॉन्टी ऱ्होड्ससारख्या महान क्षेत्ररक्षकांचा सल्ला भारतामध्ये घेतला जातो, मात्र ज्या काळात असे परदेशी प्रशिक्षक सहजपणे उपलब्ध नसताना एकनाथने आपले चापल्य, अचूकता आणि झेपावत क्षेत्ररक्षण करण्याची शैली याच्या जोरावर कारकीर्द गाजविली.
मैदानावर मुख्य ग्राऊंड्समनचे काम करणाऱ्या धोंडू सोलकर यांचा एकनाथ हा मुलगा. पाच भावंडांमधील या एकनाथने शालेय जीवनातच क्रिकेट कारकीर्दीचा ध्यास घेतला होता. त्याच्याकडील गुणवत्तेमुळे त्याला संधी मिळण्यास अडचण आली नाही. त्याने १९६४ मध्ये श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर त्याने १९६५-६६ मध्ये लंडन स्कूल्सविरुद्धच्या सामन्यात भारताचे कर्णधारपद भूषविले. एक्की या नावाने लोकप्रियता मिळविलेल्या या खेळाडूस १९६९ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध हैदराबाद येथे कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. जेमतेम आठ वर्षांच्या कसोटी कारकीर्दीत त्याने २७ कसोटी सामने खेळले. त्यामध्ये त्याने एक शतक व सहा अर्धशतकांसह १०६८ धावा केल्या. त्याने १८ बळी घेतले. या २७ कसोटींमध्ये त्याने ५७ झेल घेत कौतुकास्पद कामगिरी केली.
१९७१ मध्ये भारतास इंग्लंडविरुद्ध ओव्हल येथे जो ऐतिहासिक कसोटी विजय मिळाला, त्या कसोटीत त्याने अॅलन नॉट याचा घेतलेला झेल खेळास कलाटणी देणारा ठरला. त्याने पूर्णपणे शरीर झोकून घेतलेल्या या झेलचे सर्वच प्रसारमाध्यमांनी मुक्तपणे कौतुक केले होते. एकाच वेळी फिरकी व द्रुतगती अशा दोन्ही प्रकारे गोलंदाजी करणारा तो जगातील सर्वोत्तम डावखुरा गोलंदाज होता. १९७५ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत वेंकटराघवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघात एकनाथचा समावेश होता. एक दिवसीय सामन्यांमध्ये त्याची कामगिरी फारशी चमकदार झाली नाही. त्याने एक दिवसीय सात आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. मुंबईकडून खेळताना एकनाथने प्रथम श्रेणीच्या १८९ सामन्यांमध्ये भाग घेतला. त्यामध्ये त्याने आठ शतके व ३६ अर्धशतकांसह ६८५१ धावा केल्या. त्याने २७६ बळी घेतले. ३८ धावांमध्ये सहा बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.
एकाच डावात पाच किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेण्याचा पराक्रम त्याने दहा वेळा केला, तर एकाच सामन्यात दहापेक्षा जास्त बळी घेण्याची कामगिरी त्याने एकदा केली. प्रसिद्धिपराङ्मुख असलेला एकनाथ हा अजातशत्रू खेळाडू होता. जेवढी त्याने आपल्या नेत्रदीपक क्षेत्ररक्षणाच्या जोरावर कारकीर्द गाजविली, तेवढे त्याचे फारसे कौतुक झाले नाही. त्याचा फारसा सन्मानही कधी झाला नाही किंवा आपल्यासाठी गौरवनिधी सामना घ्यावा अशीही त्याने कधी विनंती केली नाही. वयाच्या अवघ्या ५७ व्या वर्षी त्याने या जगाचानिरोप घेतला. मात्र त्याचे नेत्रदीपक क्षेत्ररक्षण चिरकाल स्मरणात राहील.