(डॉ.) श्याम भास्करन

जपानने अंतराळात पाठवलेली हयाबुसा ही अंतराळ कुपी ऑस्ट्रेलियातील वूमेरा तळावर उतरली, त्यावेळेस जपान आणि अमेरिकेबरोबरच मुंबईतही जल्लोष साजरा झाला. कारण या अंतराळ कुपीच्या परतण्यामध्ये एका भारतीय वैज्ञानिकाचे यश सामावलेले होते. या वैज्ञानिकाचे नाव डॉ. श्याम भास्करन. ४६ वर्षांचे असलेल्या डॉ. भास्करन यांचा जन्म मुंबईत माटुंगा येथे झाला. बालपण मुंबईतच गेले. हा लहान मुलगा त्याहीवेळेस रात्री आकाशाकडे डोळे लावून बसलेला असायचा, अशी आठवण श्यामचे वडील गोिवदन सांगतात.

हा मुलगा आता जगभरातील अनेक महत्त्वाच्या अंतराळ मोहिमांचा दिशादर्शक ठरला आहे. काही वर्षांपूर्वी नासा या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेने पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या निर्मितीबद्दल एक महत्त्वाची शोधमोहीम हाती घेतली होती. पृथ्वीवरील जीवसृष्टीसाठी महत्त्वाचा ठरणारा पाण्याचा अंश आणि प्रत्यक्ष जीवदेखील पृथ्वीच्या बाहेरच्या वातावरणातून आले असावेत, असे संशोधकांना वाटते आहे. या दोन्ही महत्त्वाच्या बाबी अशनी - धूमकेतूच्या शेपटा- तून आल्या असाव्यात असा संशोधकांचा प्राथमिक अंदाज आहे. त्याची नेमकी माहिती घेण्यासाठीच डीप इम्पॅक्ट ही मोहीम नासातर्फे हाती घेण्यात आली होती. या मोहिमेत यान थेट टेम्पल- वन या धूमकेतूवर ३६ हजार ८०० प्रति तास या वेगाने हे यान आदळवण्यात आले.

धूमकेतूचा वेग आणि यानाचा वेग याचे गणित करून ही मोहीम पार पाडण्यात आली. ही सारी योजना फत्ते करण्यात डॉ. भास्करन यांचा सिंहाचा वाटा होता. मात्र त्यावेळेस त्यांच्या नावाची फारशी चर्चा झाली नाही. आताची ही मोहीमदेखील डीप इम्पॅक्टपेक्षा अधिक नेमकेपणाची गरज असलेली होती. म्हणूनच जपानच्या अंतराळ संशोधन संस्थेने त्यासाठी नासाची मदत मागितली. या मोहिमेमध्ये अंतराळ कुपी प्रत्यक्ष एका अशनीवर उतरणार होती आणि त्यावरील अनेक नमुने गोळा करून कुपीच्या माध्यमातूनच ते पृथ्वीवर आणले जाणार होते. अशनीवरून गोळा केलेल्या या नमुन्यांवरून भविष्यात संशोधन केले जाणार असून त्यामुळे पृथ्वीची निर्मिती आणि भूतलावरील जीवाचे अस्तित्व या सर्व बाबींची उकल होणे अपेक्षित आहे.

अशनीवर उतरण्यासाठी नेमकेपणा खूप गरजेचा होता. म्हणूनच नासाने जपानच्या अंतराळ संशोधन संस्थेला डॉ. भास्करन यांच्या नेतृत्त्वाखालील चमू मदतीसाठी दिला. डॉ. भास्करन सध्या नासाच्या आऊटर प्लॅनेटस् नेविगेशन ग्रुपमधील महत्त्वपूर्ण वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी नासाने हाती घेतलेल्या अनेक मोहिमांमधील नेविगेशन टीमचे नेतृत्व त्यांनी यशस्वीरीत्या केले आहे. जपानने हाती घेतलेल्या या मोहिमेला सुमारे सात वर्षांपूर्वीच सुरुवात झाली होती. ही अंतराळ कुपी हयाबुसा गेली सात वर्षे फिरतेच आहे. २५ नोव्हेंबर २००५ रोजी ही अंतराळ कुपी इटोकोवा या अशनीवर यशस्वीरीत्या उतरली. सुमारे ३० मिनिटे ती त्यावरच होती. त्या काळात गोळा केलेले नमुने घेऊन ही कुपी आता परत आली आहे. या कुपीने आणलेले नमुने भविष्यातील संशोधनासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत. या मोहिमेचे सर्व यश हे कुपी यशस्वीरीत्या परत येण्यामध्ये आहे. त्याची प्रमुख जबाबदारी नेविगेशन करणाऱ्या डॉ. भास्करन यांची होती.

कुपी वळविण्यासाठी हायड्रेझाईन इंधन वापरले जाते. मात्र तेच संपुष्टात आल्याने या मोहिमेच्या यशस्वितेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या शिवाय त्याचा समतोल साधणाऱ्या यंत्रणेमध्येही तीन बिघाड निर्माण झाले होते. त्यामुळे अशनीपर्यंत मजल मारून यशस्वी ठरलेली ही कुपी परत येणार का, असा प्रश्न होता. मात्र डॉ. भास्करन यांनी कसब पणाला लावले आणि मोहीम यशस्वी करून दाखवली. गेली ११ वर्षे डॉ. भास्करन नासाच्या जेट प्रोप्लशन लॅबोरेटरीमध्ये कार्यरत आहेत. याच ठिकाणी त्यांचा नेविगेशन ग्रुप काम करतो. त्यांनी त्यांच्या करियरची सुरुवातच गॅलिलोओ मिशनपासून केली. मंगळाच्या ओडिसी मिशनमध्येही त्यांचा मोलाचा सहभाग होता. डीप स्पेससाठी त्यांनी नवीन नेविगेशन यंत्रणाच विकसित केली होती.

टेक्सास विद्यापीठातून त्यांनी बी. एस. व एम. एस. केले तर पी. एचडी कोलोरॅडो विद्यापीठातून पूर्ण केली. भारताचे चांद्रयान-एक अंतराळात झेपावले त्याहीवेळेस ते नासाच्या चमूचे सदस्य या नात्याने बंगळुरूला उपस्थित होते. सध्या ते अमेरिकेत असले तरी आयुष्यातील अनेक चांगल्या आठवणी या मुंबईमध्ये पेडर रोडवरील बीएआरसीच्या केनिलवर्थ या निवासी संकुलाशीच संबंधित असल्याचे ते अभिमानाने सांगतात. मुंबईकरांनाही त्यांचा अभिमान आहेच!

जपानने अंतराळात पाठवलेली हयाबुसा ही अंतराळ कुपी ऑस्ट्रेलियातील वूमेरा तळावर उतरली, त्यावेळेस जपान आणि अमेरिकेबरोबरच मुंबईतही जल्लोष साजरा झाला. कारण या अंतराळ कुपीच्या परतण्यामध्ये एका भारतीय वैज्ञानिकाचे यश सामावलेले होते. या वैज्ञानिकाचे नाव डॉ. श्याम भास्करन. ४६ वर्षांचे असलेल्या डॉ. भास्करन यांचा जन्म मुंबईत माटुंगा येथे झाला. बालपण मुंबईतच गेले. हा लहान मुलगा त्याहीवेळेस रात्री आकाशाकडे डोळे लावून बसलेला असायचा, अशी आठवण श्यामचे वडील गोिवदन सांगतात.

हा मुलगा आता जगभरातील अनेक महत्त्वाच्या अंतराळ मोहिमांचा दिशादर्शक ठरला आहे. काही वर्षांपूर्वी नासा या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेने पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या निर्मितीबद्दल एक महत्त्वाची शोधमोहीम हाती घेतली होती. पृथ्वीवरील जीवसृष्टीसाठी महत्त्वाचा ठरणारा पाण्याचा अंश आणि प्रत्यक्ष जीवदेखील पृथ्वीच्या बाहेरच्या वातावरणातून आले असावेत, असे संशोधकांना वाटते आहे. या दोन्ही महत्त्वाच्या बाबी अशनी – धूमकेतूच्या शेपटा- तून आल्या असाव्यात असा संशोधकांचा प्राथमिक अंदाज आहे. त्याची नेमकी माहिती घेण्यासाठीच डीप इम्पॅक्ट ही मोहीम नासातर्फे हाती घेण्यात आली होती. या मोहिमेत यान थेट टेम्पल- वन या धूमकेतूवर ३६ हजार ८०० प्रति तास या वेगाने हे यान आदळवण्यात आले.

Author