(डॉ.) राजू मानकर

लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाने गेल्या दोन दशकांच्या कालावधीत नेमकी काय कामगिरी केली, याची उच्चशिक्षणविश्वाला फारशी माहिती नाही. या विद्यापीठामध्ये प्रवेश घेण्यासाठी अभियांत्रिकीच्या ‘सीईटी’त चढाओढ नसते, कोकणच्या भूमिपुत्रांनाही मुंबई-पुण्यातील संस्थांचीच भुरळ पडते. म्हणूनच या विद्यापीठाचे पाचवे कुलगुरू म्हणून कार्यभार स्वीकारताना डॉ. राजू मानकर यांच्यासमोर अपेक्षांचा ‘कोकणकडा’च सर करण्याचे आव्हान आहे! नागपूर विद्यापीठातून केमिकल इंजिनिअरिंगमध्ये ‘एमटेक’ला सुवर्णपदक पटकावून त्यांनी जर्मनीतून ‘पीएच.डी.’ संपादन केली. त्यानंतर डॉ. मानकर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन, अध्यापन प्रकल्पांमध्ये सहभागी झाले.

भारती विद्यापीठातून प्राध्यापकीला प्रारंभ केल्यानंतर लोणेरे तंत्रज्ञान विद्यापीठातच १९९२ ते २००५ या कालावधीत पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंगचे असिस्टंट प्रोफेसर म्हणून त्यांनी काम पाहिले. नागपूरच्या लक्ष्मीनारायण इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक म्हणून जबाबदारी सांभाळल्यानंतर आता ते कुलगुरू होत आहेत. साहजिकच, तंत्रज्ञान विद्यापीठाकडून समाजाला नेमकी कोणती अपेक्षा आहे, याची डॉ. मानकर यांना पूर्ण जाणीव आहे. ‘अभियांत्रिकी संशोधनाचा वेग व दर्जा वाढविण्याची किती गरज आहे, याची मला कल्पना असून, त्या दिशेनेच विद्यापीठातर्फे विविध प्रकल्प राबविण्यात येतील,’ असे डॉ. मानकर सांगतात.

Author