(User Level: User is not logged in.)

कथा

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • एक परीस स्पर्श ( भाग – २१ )

    आज विजय बस स्टॉपवर उभा होता. तोच त्याची नजर रस्त्याच्या कडेला नारळाच्या झावळ्यांपासून झाडू बनविणाऱ्या स्त्री पुरुष आणि लहान मुलांकडे गेले. तर एक मुलगी तीन दगडांच्या चुलीवर चहा बनवत होती. चहा बनविण्यात ती खूपच एकाग्र झाली होती. ते पाहून विजयला त्याचे बालपणीचे दिवस आठवले! त्याची आई अशीच चुलीवर चहा बनवत असे आणि विजय बटर घेऊन तिच्या बाजूला बसलेला असे.

      February 27, 2022


  • वाघीण भाग 2

    तिच्या मानात विचारांचे काहूर माजले होते, ती अचानक थांबली, तिला वाटले, पुन्हा जर असाच हमला झाला आणि माझा जीव गेला तर माझ्या मुलाकडे आणि नवऱ्याकडे कोण लक्ष देईल?, त्यांचा सांभाळ कोण करेल?. या विचाराने ती खूप घाबरली.

      January 15, 2022


  • एक परीस स्पर्श ( भाग – ५०)

    काही दिवसापूर्वी विजयने एका किर्तनात एक कथा ऐकली ती कथा अशी होती की एका गावात एक मोठे साधू महाराज येतात.. त्या गावातील लोक खूपच धार्मिक असतात ते त्या साधूना लोक वर्गणीतून एक आश्रम बांधून देतात .. त्यावर ते साधू महाराज मानत विचार करतात या गावाने आपल्यावर उपकार केलेले आहेत त्या उपकाराची परतफेड आपल्याला करायला हवी म्हणून ते त्या गावकऱ्यांना सांगतात तुम्ही मला तुमच्या गावातील पन्नास विद्यार्थी द्या मी त्या पन्नास विद्यार्थ्यांना दोन वर्षे शिकवून ज्ञानी करेन त्याप्रमाणे गावकरी ४९ विद्यार्थी जमा करतात पण एक विद्यार्थी कमी पडत असतो. त्या गावात एक मुलगा असतो तो फक्त खात असतो आणि झोपत असतो. गावकरी विचार करतात ५० वा विद्यार्थी म्हणून ह्याला पाठवू या ! घरी झोपा काढतो त्या ऐवजी तेथे जाऊन झोपा काढेल. ठरल्याप्रमाणे ते साधू त्या विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात करतात तो ५० वा विद्यार्थी आपल्या सवयी प्रमाणे मागे भिंतीला टेकून झोपा काढत असतो.  हा ! हा ! म्हणता एक वर्ष होते .. साधू महाराज त्या मागे बसलेल्या ५० व्या विद्यार्थ्याला  उठवून पुढे आणून बसवायला सांगतात आणि सर्व विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणतात,” एक गॊष्ट लक्षात ठेवा ! ईश्वर चराचर आहे …

      August 28, 2022


  • गुणांचा शोध

    माणसामधील चांगल्या गुणांचा शोध घेऊन त्याच्याकडून आपणास हवी ती कामे करून घेण्यासाठी गुणग्राहकता लागते. कारण अशी चांगली माणसेच, ती ज्या संस्थेत काम करतात त्या संस्थेची भरभराट करू शकतात. ही भरभराट केवळ त्या संस्थेची नसते तर पर्यायाने समाजाची व देशाचीही असू शकते.

    अँड्र्यू कार्नेगी हा अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योगपती होता. केवळ चांगल्या माणसांच्या जोरावर त्याने आपल्या उद्योगाची मोठी भरभराट केली होती. त्याच्या गुणग्राहकतेची ख्याती सर्वत्र होती. एकदा त्याला कोणीतरी विचारले, की चांगली माणसे तुम्ही शोधता तरी कधी आणि केव्हा? त्यासाठी तुम्ही कोणाकडे प्रशिक्षण घेतले आहे काय?

    त्यावर कार्नेगी यांनी त्याला फार समर्पक उत्तर दिले. ते म्हणाले, चांगली माणसे शोधणे म्हणजे मातीतून सोने मिळविण्यासारखे आहे.. जर तुम्हाला मातीतून एक किलो सोने मिळवायचे आहे, तर त्यासाठी हजारो टन माती उकरावी लागेल. अर्थात तुम्ही त्या वेळी केवळ माती उकरायला नाही तर त्यातील सोने शोधायला गेला असाल तरच तुम्हाला थोडे फार सोने मिळू शकेल. चांगली मासे याच पद्धतीने शोधायची असतात. कार्नेगी यांचे हे उत्तर ऐकून प्रश्नकर्त्यांचे साहजिकच समाधान झाले.

      November 9, 2016


  • अडुसष्ट वर्षांपूर्वी – भाग १

    मी त्यावेळी चौदा वर्षांचा होतो. तो दिवस मला आठवतो. 30 जून ही तारीख होती. महिन्याचा शेवटचा दिवस-‘मंथ एण्ड’ म्हणून शाळेला अर्धा दिवस सुट्टी मिळाली होती. म्हणजे शाळेचं काम चालूंच होतं पण मुलांना अर्ध्या दिवसाची सुट्टी मिळाली होती. कोंडवाड्यातून सुटल्याप्रमाणे मी धावत घरी आलो.

      June 2, 2018


  • रोना जरूरी है

    थोरले आबा खूपच सिरियस होते. आज जातील की उद्या अशी अवस्था होती. घरातले काळजीत होते.त्यांचा उजवा हात जितेंद्र खूपच जास्त टेन्शनमध्ये होता. त्याला एका वेगळ्याच काळजीने घेरले होते. तो सतत ठिकठिकाणी फोन लावत होता. कोणाकोणाशी फोनवर बोलत होता. मधूनच आय सी यू मध्ये नजर टाकत होता. आबांचा कारभार दोन दिवसांपेक्षा कमी वेळात आटपू देत अशी देवाशी प्रार्थना करत होता.

      January 17, 2024


  • सर्वात वाईट वस्तू

    एक मौलवी होते. त्यांनी सगळीकडे आपल्या प्रामाणिकपणाचा प्रचार प्रसार केला. मशीदीत बसून दिवसभर मुलांना शिकवित असत आणि जी फी मिळे त्यात आपला उदर निर्वाह करीत असे. एक दिवस संध्याकाळी ते घरी आले आणि पत्नीला म्हणाले, “आज काय स्वयंपाक केला आहे.

      November 25, 2025


  • एक परीस स्पर्श… ( भाग -२८ )

    साधू त्यांना एक जादुई घोडा, काटी आणि झोळी देतो आणि त्यांच्या कानात एक मंत्र सांगतो. हा घोडा तुम्हाला तुमच्या इच्छित स्थळी घेऊन जाईल..ही  झोळी तुम्हाला हव्या त्या वस्तू देईल…आणि ही काटी तुमच्या शत्रूंचा नाश करेल…आणि ते साधू स्वर्गात प्रयाण करतात. ते दोघे बहीण भाऊ घोड्यावर बसतात आणि मंत्र म्हणून घोड्याला आदेश देतात आमचे आईवडील ज्या राज्यात असतील तेथे आम्हाला घेऊन चल…क्षणात ते घोड्यासह आटपाट नगरात पोहचतात…तेथे पोहचल्यावर ते झोळीतून मंत्राच्या साह्याने मोहरा निर्माण करतात आणि एक वाडा विकत घेतात…आपल्या राज्यात कोणी श्रीमंत बहीण भाऊ राहायला आल्याची बातमी राजदरबारात पोहचते… दृष्ट राणीला त्यांना भेटण्याची उत्सुकता निर्माण होते…

      July 18, 2022


  • धौम्य व उपमन्यू

    फार प्राचीन काळी धौम्य या नावाचे एक महान ऋषी होऊन गेले. ते आपल्या शिष्यांना केवळ ज्ञान देत नसत, तर ज्ञानाच्या जोडीला व्यवहार शिकवीत असत. त्यासाठी शिष्यांना आश्रमात पडतील ती कामे करावी लागत.

      November 25, 2025


  • एक अभागी – नक्षलवादी दहशतीची बळी (कथा ५)

    शाळेत मुळाक्षर,शिकणे, १०० पर्यंत आकडे मोजणे, प्रादेशिक कोया भाषेत हे सर्व लिहिता येणे, ही नक्षलवादी जनता सरकारची सर्व मुलामुलींना शिक्षण देण्याची पद्धत, इयत्ता वगैरेची गरज नाही, अबुजमाड भागात अशा शाळा आहेत. एवढे जुजबी शिक्षण घेतले की यातील काही मुले खेड्यातील आपली राहती चंद्रमोळी झोपडी सोडून जंगलातील नक्षलवादिंच्या तंबूत राहण्यास येतात व तेच त्यांचे कायमचे आयुष्य जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत, नाहीतर केंव्हाही मृत्यूच्या जाळ्यात अडकायचे, नक्षल प्रमुखाच्या गोळीने नाहीतर पोलिसांच्या गोळीबारात.

      February 18, 2022