(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • संस्कारांची टोपी…

    समाज नेहमीच संस्कारांची टोपी फक्त स्रीयांच्याच डोक्यावर ठेवत आला आणि पुरुषांना मोकाट सोडत आला आता ती टोपी पुरुषांच्याही डोक्यावर ठेवायला हवी ! तरच समाजातील बलात्कार आणि स्त्रियांवरील अत्याचार कमी होतील आपणही संस्काराची टोपी आपल्या डोक्यावर स्वत: ठेवून घेऊया !

      August 19, 2017


  • एक परीस स्पर्श( भाग – ३० )

    ह्या सगळ्या कथा राजा – राणीच्या काल्पनिक कथा होत्या. तसा या कथांमधून बोध फक्त एकच घेता येतो…प्रत्येक कथेतून काहीतरी शिकता येते…विजयनेही कथा लिहिण्याचा प्रयत्न केला…विजयने लिहिलेली पहिलीच कथा समाजमनावर भाष्य करणारी होती..ती कथा एका प्रसिद्ध वर्तमानपत्रात प्रकाशित झाली होती…त्या नंतर त्याने पहिली प्रेम कथा लिहिली…तो बसमधून प्रवास करताना एका सुंदर तरुणीच्या प्रेमात पडला होता… तसही कोणी विद्रुप मुलीच्या प्रेमात पडत नाही…ह्या बसच्या प्रवासात त्याला भेटलेल्या, त्याच्या प्रेमात पडलेल्या आणि तो ज्यांच्या प्रेमात पडला होता अशा इतक्या होत्या की आता विजयला त्या आठवायच्या म्हटल्या तरी एक दिवस अपुरा पडेल…

      July 21, 2022


  • हवा हवाई

    दिसत नाही, मात्र जाणवते.. ती ‘हवा’! मंद हवेची लहर आली, तर तिला ‘झुळूक’ म्हटलं जातं.. तिचं जर वेगाने आली तर तो होतो, सोसाट्याचा वारा.. अशा वाऱ्यानं वेगाची परिसिमा ओलांडली की त्याचं रूपांतर वादळात होतं..

      June 11, 2022


  • नवरा आमदार, मग मी रेशनच्या रांगेत कशी उभी राहू?

    या हेमलताबाईचा नवरा सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आला होता. पण हेमलता यांनी आमदाराची बायको म्हणून आपले वेगळेपण अखेरपर्यंत जाणवू दिले नाही.आजच्या जमान्यात कारखानीस आमदार व्हायच्य पात्रतेचेच नव्हते असे वाटून जाते .

      September 17, 2021


  • व्यवस्थेचे गुलाम

    कर्नल सावंत निवृत्त होणार होते. आतापर्यंत त्यांनी कधी निवृत्तीचा व विशेषत: निवृत्तीनंतर कुठे रहायचं, याचा विचारच केला नव्हता.
    सीमेवर देशाची सेवा करतांना प्राण पणाला लावणाऱ्या सैनिकाला निवृत्तीचे बेत आंखायला वेळ नसतो. सीमेवर तीक्ष्ण नजरेने पहाणारा सैनिक आपल्या भविष्याकडे कधीच नजर लावून बसत नाही. कर्नल सावंत याला अपवाद नव्हते. अतुलनीय पराक्रमाबद्दल मिळालेली पदके छातीवर अभिमानाने लावायची, मान ताठ ठेवायची व देशरक्षणासाठी सज्ज रहायचे एवढेच त्यांना ठाऊक होते. त्यांच्या बदल्या झाल्या व ते कुटुंबासह एका शहरांतून दुसऱ्या शहरांत चार वेळा गेले पण त्यांना नवीन ठीकाणी रहाण्यांत विशेष अडचणी आल्या नाहीत कारण आर्मी पाठीशी असे. रहायला चांगले घर व इतर सर्व सोयीही बघितल्या जात.

      February 2, 2026


  • प्लॅन्ड सीझर

    मे महिन्यात घराचे बांधकाम सुरु झाले होते तशातच डिसेंबर महिन्यात आम्हाला दुसरे बाळ होणार आहे समजल्यावर आनंद झाला. किमया ताईने ह्यावेळी आपण कोणतीही रिस्क न घेता प्लॅन्ड सीझर करू त्यासाठी तिने तिच्या हॉस्पिटलला येणाऱ्या डॉ. रेखा थोटे यांच्याकडे कन्सल्ट करायला सांगितले, त्यांनी पण मागील डिलिव्हरीचे सगळे रिपोर्ट आणि हिस्टरी पाहिली आणि सीझरच करायचा निर्णय घेतला.

      July 24, 2021


  • सूर गवसण्याचा आनंद

    आपल्या घरात हार्मोनियम असावी अशी माझी खूप इच्छा होती. एक दिवस मी पेटी विकत घेतली आणि ती वाजवायला बसलो. याआधी मी कधीही पेटी वाजविली नव्हती. शुद्ध सूर कोणते, कोमल सूर कोणते, तीव्र सप्तक म्हणजे काय मला कशाचीही काहीही कल्पना नव्हती. मी उगाचच चाळा म्हणून पेटी वाजवत बसलो. बोटं फिरवता फिरवता पेटीतून सूर उमटू लागले. ते सूर कानावर पडताच एखादं गाणं आपल्याला वाजवता येईल का याचा मी विचार करु लागलो. एक गाणं मला सुचलं. मी ते पेटीवर वाजवता येतंय का याची चाचपणी करु लागलो. पेटीतून बाहेर पडणारे काही सूर त्या गाण्याच्या चालीशी मिळते जुळते होते, मात्र चालीशी न जुळणारेही अनेक सूर पेटीतून उमटत होते. पेटीतून हरतऱ्हेचे सूर उमटतात. त्यातील काही मोजकेच सूर चालीशी संबंधीत असतात. अन्य सूर एरव्ही मधुर भासत असले तरी चालीत बांधलेले नसल्यास कानांना कर्कश भासतात हा पहिला धडा मी शिकलो. आपण पेटी वाजवणं शिकायचंच हा निश्चय मी मनाशी केला. सध्यातरी कोणाकडे पेटी वाजवणं शिकण्याऐवजी स्वतःच्या स्वतः रोज धडे गिरवायचे असं मी मनाशी ठरवून टाकलं. मी नित्यनियमाने पेटी वाजवू लागलो.

    त्यानंतर अमुक एक गाणं आपल्याला वाजवता येतं का हे मी रोज चाचपू लागलो. ही चाचपणी सुरु असताना आपल्याला हवा असलेला नेमका सूर गवसला की मनाला अभूतपूर्व आनंद मिळतो हे माझ्या ध्यानात आलं. सुरांच्या गर्दीतून नेमका तो सूर शोधणं म्हणजेच पेटी वाजविण्याचं कौशल्य हे साधं गणित मला उमगलं. मात्र हे कौशल्य अंगी भिनविण्यासाठी सतत रियाझ करणं आवश्यक आहे हे ही माझ्या ध्यानात आलं. ती मेहनत घ्यायला मी तयार होतो. या मेहनीतून एक अवर्णनीय आनंद मला सापडत होता. त्या आनंदासाठी रोज पेटी वाजविण्याचं व्रत मी स्वीकारलं. काही दिवसांनी पेटी वाजवणं आपल्याला बऱ्यापैकी जमतंय हे माझ्या ध्यानात आलं. आता पेटीतून उमटणाऱ्या चालीशी संबंधीत बसणाऱ्या कर्कश सुरांची संख्या रोडावत होती. थोडा नेट धरला की नेमके सूर उमटतात हे मी हेरलं. त्या सुरांचा मागोवा घेत खेळत राहण्यात मी तल्लीन होऊ लागलो.

    पेटी वाजविण्यात तल्लीन झाल्यानंतर मनातले दुसरे विचार लुप्त होतात हेही माझ्या लवकर ध्यानात आलं. दैनंदिन कामकाजात आपल्या मनात सतत विचारांची आवर्तनं घोंघावत असतात. अनेकदा रात्री झोपेतही विचार करीत राहणं सुरुच असतं. कित्येकदा झोप मोडण्याची खोडी करण्यासही हे विचार धजावतात. पेटी वाजवताना मात्र हे विचार विनायास दूर पळतात हे माझ्या ध्यानात आलं. पेटी वाजवताना आपलं केवळ सुरांशी नातं जुळलेलं असतं. अन्य सर्व गोष्टी त्यावेळी नगण्य ठरतात. दैनंदिन कामाचा ताण हलका करण्यासाठी पेटी वाजवणं हा एक रामबाण उपाय आहे हे मला उमगलं आणि मी अक्षरशः प्रफुल्लीत झालो. आता बाहेरच्या जगात काय घडलं, माझ्याशी कोण कसा वागला आणि कोण काय बोलला, या क्षुद्र गोष्टींशी माझं कसलंही देणंघेणं उरलं नाही. मला माझ्या आनंदाचा मूळ स्त्रोत सपडला. त्या आनंदात हरवून जाणं मला सहजसाध्य झालं. उर्वरीत जगातील घडामोडींशी माझा कसलाही संबंध उरला नाही.

    मी जसा पेटी वाजविण्याचा छंद जोपासला तसा प्रत्येकाने एखादा तरी छंद अवश्य जोपासावा. हा छंद जोपासण्याचा आनंद मनातले सर्व ताण सहजरित्या दर लोटतो. मात्र हा छंद जोपासताना एक पथ्य अवश्य पाळावं. ते म्हणजे, या छंदातून पुन्हा आणखी काही मिळविण्याचा अट्टाहास कधी धरु नये. छंद हा केवळ छंदासाठी जोपासायचा असतो. आपण पेटी वाजविण्याच्या छंदाचंच उदाहरण घेऊ. पेटीचा रियाझ करताना मी एक दिवस जगातला सर्वोत्कृष्ट पेटीवादक होईन, माझं पेटीवादन ऐकून लोक थक्क होऊन जातील, माझ्या हार्मोनियमच्या वादनाच्या सी.डी. निघतील, माझे देशविदेशात कार्यक्रम होतील, मला उत्तम पैसा मिळेल, प्रसिद्धी मिळेल असले मनोरथ कधीही कुणी हाकू नयेत. कारण अपेक्षा ठेवली की अपेक्षाभंगही जोडीनेच येतो आणि फार मोठी अपेक्षा ठेवली की नैराश्य ! थोडक्यात पेटी वादनातून आपल्याला काही मिळवायचं आहे किंवा काही मिळणार आहे हा विचार बाजूला सारुनच पेटी वादनाकडे म्हणजेच आपल्या छंदाकडे वळायचं असतं.

    दुसरं पथ्य पाळायचं ते कुणाचंही अनुकरण न करण्याचं. अमका पेटी वाजवतो म्हणून मीही पेटी वाजवीन, तो क्रिकेट खेळतो म्हणून मी क्रिकेट खेळेन, तो स्विमिंगला जातो म्हणून मीही स्विमिंगला जाईन असं अनुकरण कधीही करु नये. आपला जीव कशात रमतो हे प्रत्येकाने स्वतःच शोधून काढायचं असतं. व्यक्ती तितक्या प्रकृती तसेच व्यक्ती तितके छंद हे ध्यानात ठेवावं. संगीत, अभिनय, खेळ अशा अनेक प्रकारच्या छंदातून आपला नेमका छंद कोणता हे आपणच हुडकून काढावं. कारण दुसऱ्याचा छंद हा कदाचित आपली डोकेदुखी ठरण्याचाही संभव असतो. म्हणून आपली नाळ कशाशी जोडली गेली आहे ते आपणच शोधावं . हा नेमका छंद सापडणं म्हणजेच अचूक सूर गवसणं असंही म्हणता येईल.

    छंद जोपासण्यासाठी दररोज ठराविक वेळ देणंही आवश्यक ठरतं. आपण सर्व आरंभशूर असतो. काहीही करायचं म्हंटलं की सुरुवातीचे काही दिवस आपण अट्टाहासाने त्याच्या मागे लागतो. मात्र काही दिवस लोटल्यानंतर मध्येच काहीतरी महत्त्वाचं काम निघतं आणि छंद बाजूला पडतो. काही दिवस लोटले की आपण अमुक छंद जोपासणार होतो याचाही आपल्याला विसर पडतो. मध्येच कधीतरी त्या छंदाची आपल्याला आठवण होते आणि मग मनाला चुटपूट लागून राहते . आपलं चुकलंच ही जाणीव पदरी दुःखाचंच दान देऊन जाते. यावर उपाय म्हणजे दररोज नियमाने छंदासाठी वेळ काढणं. वेळेचं नियोजन हा मोठा विषय आहे. दिवसातल्या चोवीस तासांतून ठराविक गोष्टींसाठी ठराविक वेळ काढता आला की बरंच काही साध्य होतं. आपण जसा नोकरीधंद्यासाठी वेळ काढतो, कुटुंबियांसाठी वेळ काढतो, जगात काय चाललंय ते घेण्यासाठी वेळ काढतो तसाच वेळ छंद जोपासण्यासाठी काढावा. असा वेळ काढता जाणून आला की आपलं छंदाशी अतूट नातं जुळून येतं.

    छंदाशी नातं जुळून घेणं म्हणजे एकप्रकारे स्वतःशीच नातं जुळून येणं. आयुष्याच्या कोलाहलात आपल्याला अनेक गोष्टींसाठी वेळ असतो. वेळ नसतो तो केवळ स्वत:साठी, वेळ नसतो तो केवळ आपला आतला आवाज जाणून घेण्यासाठी. तो वेळ काढता आला की आपल्याला स्वतःच्या सामर्थ्यांची, अंगभूत कौशल्यांची जाणीव होऊ लागते. आपला आत्मविश्वास द्विगुणीत होतो आणि आयुष्याला सामोरं जाण्यासाठी आपण सिद्ध होतो. दिवसातला केवळ अर्धा पाऊण तास आपल्याला उरलेल्या तासांशी सामना करण्याचं सामर्थ्य देऊन जातो. मी जर पेटी वाजवू शकतो तर मी परिपूर्ण आहे, माझ्यात कसल्याही उणिवा नाहीत हा आश्वासक विचार आपल्याला व्यक्तिमत्त्व विकासाची गुरुकिल्लीच हाती देऊन जातो. ही गुरुकिल्ली हाती गवसली की अलिबाबाची गुहाच आपल्यासमोर उलगडली जाते.

    भोवतालचं तेच ते कंटाळवाणं जग आपल्याला नवं भासू लागतं. सूतावरुन स्वर्ग गाठता येतो ही म्हण कदाचित मूळात सूरांवरुन स्वर्ग गाठता येतो अशी असावी. तो नेमका सूर गवसणं म्हणजेच स्वर्गलोकीचं सुख भुतलावर उपभोगणं, जीवनाला वेगळा अर्थ मिळवून देणं आणि अक्षय सुखाचा खजिना लुटणं!

    -सुनील रेगे

      August 13, 2022


  • शतकाचा साक्षीदार !

    कॅनडात मी जे पाहिलं, अनुभवलं ते कधीच विस्मृतीत जाणारं नव्हतं! मी जेंव्हा एकांतात बसतो तेंव्हा एकएक गोष्ट माझ्या नजरेसमोरून तरळू लागते. माझ्याशी बोलू लागते. तिथल्या निसर्गाची किमया व निसर्गाशी अनुरूप मानवनिर्मित कलाकृती मनाला भुरळ घालतात, एक अनोखा आनंद देऊन जातात. त्यापैकीच एक अविस्मरणीय पर्यटन क्षेत्र म्हणजे अटलांटीक महासगराच्या किनारपट्टीवरील पेगीची खाडी (पेगीज कोव्ह) व शतकाचा शाक्षिदार ठरलेले तिथले लाईट हाऊस!

      October 16, 2020


  • शेरास सव्वाशेर

    धनचंद नावाचा एक हिऱ्याचा एक व्यापारी होता. अनेकदा अत्यंत मौल्यवान हिरे घेऊन तो प्रवास करायचा. खरे तर किमती हिरे घेऊन प्रवास करायची मोठी जोखीमच होती. परंतु धनचंद हा अतिशय चतुर व प्रसंगावधानी होता. त्यामुळे आलेल्या संकटातून तो बऱ्याच वेळा वाचला होता.

    एकदा दुसऱ्या एका हिरे व्यापाऱ्याशी सौदा करून धनचंद काही किमती हिरे घेऊन रेल्वेने प्रवास करीत होता. हिऱ्याची पिशवी त्याने आपल्या जवळच्या बॅगेत सुरक्षित ठेवली होती. मात्र धनचंदच्या पाळतीवर असलेला एक अट्टल चोर त्याच्याच डब्यात चढला व धनचंदजवळ येऊन बसला. त्याने आपली बॅगही धनचंदच्या बॅगेजवळच ठेवली होती.

    योगायोगाने त्या दिवशी रेल्वेच्या डब्यात फारशी गर्दी नव्हती. धनचंद व चोर समोरासमोरच बसले होते. चोराच्या हालचालीवरून हा चोर असावा हे ओळखायला धनचंदला वेळ लागला नाही. परंतु त्याने तसे भासू दिले नाही. उलट त्याने त्याचाशी गप्पा सुरू केल्या. थोड्या वेळाने गाडी एका स्थानकावर थांबली. आपला अधिक संशय येऊ नये, म्हणून चोर डब्यातून उतरला व परत डब्यात येऊन बसला.

    रात्र झाली तेव्हा धनचंदने झोपायची तयारी सुरू केली. थोड्या वेळाने तो झोपीही गेला. दिवसभराच्या श्रमाने त्याला गाढ झोप लागली होती. चोर याच क्षणाची वाट पहात होता. धनचंद झोपल्यावर चोराने हळूच बनावट चावीने धनचंदच्या बॅगेचे कुलूप उघडले. बॅग शोधली, परंतु हिऱ्याची पिशवी काही त्याला मिळेना. त्यानंतर त्या चोराने धनचंदचा सदरा, कोट आदी सर्व कपडे तपासले परंतु त्याला कोठेच हिऱ्याची पिशवी मिळाली नाही. त्यामुळे तो अस्वस्थ झाला. त्याला झोपही लागली नाही.

    सकाळ झाली. धनचंदचे स्थानक जवळ आले होते. चोराचा निरोप घेताना धनचंद त्याला म्हणाला, “काल रात्री तुम्ही काही वेळ डब्यात नव्हता. त्या वेळी मी घाईघाईत माझ्याजवळची एक पिशवी चुकून माझ्या बॅगेत ठेवायच्या ऐवजी तुमच्या बॅगेत ठेवली. ती कृपया मला द्या.”

    चोराने आपली बॅग उघडली तर त्यात ती हिऱ्याची पिशवी होती. त्या चोराला ती हिऱ्याची पिशवी धनचंदला देण्याशिवाय पर्यायच नव्हता. आपल्याला धनचंदने असे फसविले तर असे मनातल्या मनात म्हणत तो चरफडत राहिला.

    धनचंद त्याला शेरास सव्वाशेर भेटला होता..

      July 11, 2016


  • समज गैरसमज

    काही वर्षांपूर्वीची गोष्ट. भल्या सकाळी सहाच्या सुमारास आमच्या घराची बेल वाजली. घरी सर्वांची नीजानीज झाली होती. रात्री उशिरापर्यंत टीव्ही बघणे आणि मग सकाळी उजाडेपर्यंत ताणून देणे हा आमच्या घरचा शिरस्ता. पहाटे दूधवाल्याने झोपमोड करु नये म्हणून आमच्या दाराला पिशवी बांधलेली असते. या पिशवीतले पैसे दूधवाल्याने न्यायचे आणि पिशवीत दूधाच्या पिशव्या ठेवायच्या. एवढया सकाळी दरवाजात कोण उपटल असा विचार करत मी चरफडत दार उघडलं. बघतो तो समोर कुणी पोसवदा मुलगी उभी. "कचराऽऽ" ती केकाटली. इथे मी हैराण.

      July 9, 2022