आजचा विषय आवळा

आजचा विषय आवळा

भारतीय संस्कृतीत वृक्ष,वनस्पतींना अतिशय मानाचे स्थान दिलेले आढळते. वृक्षांचे संवर्धन, पालनपोषण, इतकेच नाही, तर त्यांचे पूजन करण्याचीही पद्धत आपल्या संस्कृतीत आहे. तसेच कार्तिक महिन्यात एकादशी ते पौर्णिमेच्या काळात आवळ्याच्या झाडाची पूजा करण्याची प्रथा आहे. पूजा झाल्यावर आवळ्याचा औषधासाठी वापर करण्यास प्रारंभ करायचा असतो. आवळा हे फळ गुणवत्तेमध्ये सर्व फळांमध्ये श्रेष्ठ आहे. आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभण्यासाठी आवळ्याचा आहार आणि औषधी द्रव्य म्हणून उपयोग करता येतो. आवळ्यामध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतं. आयुर्वेदामध्ये आवळ्याला अत्यंत श्रेष्ठ मानलं आहे. हिंदी मध्ये आँवला, संस्कृतमध्ये आमलकी, इंग्रजीमध्ये ‘एम्ब्लिका मायरोबेलान’ या नावाने परिचित आहे. आवळा पोषणाचं काम करतो. म्हणून आयुर्वेदात त्याला धात्री असंही म्हणतात. वार्धक्य अवस्था टाळून चिरतरुण राहण्यासाठी मदत करतो. म्हणून त्याला वयस्थाही म्हटले जाते. चरकाचार्य, वाग्भट, सुश्रूत या सर्व श्रेष्ठ ऋषींनी औषधामध्ये आवळ्याचा वापर करावयास सांगितलं आहे. आवळ्याचे पांढरे आवळे व रान आवळे असे दोन प्रमुख प्रकार आहेत. सुकलेल्या आवळ्यापेक्षा हिरवा ताजा आवळा आधिक गुणकारी असतो. आवळ्याचा छुंदा, मुरंबा, लोणचे, चटणी, अवलेह, कँडी, सरबत, सुपारी करून वर्षभर आवळा सेवन करता येतो. आवळा रक्तदोषहारक, पित्तशामक, सारक व रुचकर आहे. आवळा हा आम्लमधुर रसाचा, शीतवीर्यात्मक व मधुर विपाकी असल्यामुळे शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी करतो. यामध्ये शोधनाचा गुण असल्याने रक्तात साचलेली विषद्रव्ये दूर करून रक्त शुद्ध करतो. अशाच प्रकारे रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र या सप्तधातूंमध्ये जाऊन प्रत्येक धातूतील विषद्रव्ये दूर करून सर्वच धातूंना शुद्ध बनवतो. या त्याच्या गुणांमुळेच शरीर शुद्ध होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते. म्हणूनच नियमितपणे आवळा सेवन करणे आवश्यक आहे. औषधात आवळ्याचे फळ, पाने आणि बिया वापरल्या जातात. आवळा पोटात घेतला जातो, तसेच शरीराला बाहेरून लावण्यासाठीसुद्धा वापरला जातो. वाळवलेल्या आवळ्यांचाही औषधात वापर करता येतो. मात्र च्यवनप्राशसारखे रसायन बनवताना किंवा ज्या ठिकाणी आवळ्याचा रस वापरायला सांगितला आहे आवळकाठी म्हणजे वाळवून ठेवलेले आवळे. आवळा हा औषधात वापरला जातोच, पण तो स्वयंपाकातही महत्त्वाचा असतो. "अम्लफलेषु श्रेयम्‌' म्हणजे सर्व आंबट फळांमध्ये आवळा श्रेष्ठ सांगितला असल्याने चटणी, लोणचे, सुपारी करण्यासाठी आवळ्यासारखे दुसरे उत्तम फळ नाही. मोरावळा तर सर्वांच्याच परिचयाचा असतो. खरं तर आम्लधर्मी पदार्थाने पित्ताची वृद्धी होते, परंतु आवळा आम्लधर्मी असला तरी त्याचा विपाक मधुर असल्यामुळे त्याच्या मधुर व शीतल गुणांमुळे त्याच्या सेवनाने पित्त वृद्धी न होता पित्तप्रकोप कमी होतो. त्यामुळे शरीराचा दाह होत असेल तर अशा अवस्थेत आवळ्याचा रस प्यावा.
रक्त विकारांमध्ये उदा. नाकाचा घोळणा फुटला असेल, शौचामधून रक्त पडत असेल, आवळा, हिरडा, बेहडा ही द्रव्ये समप्रमाणात घेऊन त्याचं चूर्ण बनवावं यालाच त्रिफळा चूर्ण असं म्हणतात. हे चूर्ण रोज पाण्यात भिजत घालून सकाळी ते पाणी वस्त्रगाळ करून गाळलेल्या पाण्याने डोळे धुवावेत. असं केल्याने डोळ्यांचं तेज वाढतं. तसंच रात्री झोपताना गरम पाण्यातून एक चमचा त्रिफळा चूर्ण घेतलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी शौचास साफ होतं. जर डोकंदुखीचा त्रास होत असेल तर आवळ्याचं चूर्ण, तूप व खडीसाखर समप्रमाणात घेऊन एकत्र करावं. सकाळच्या वेळी उपाशी पोटी हे मिश्रण सेवन केल्याने डोके दुखीचा त्रास नाहीसा होतो. केसांच्या तक्रारींवर उदा. केस गळणं, पांढरे होणं, कोंडा होणं, केस निस्तेज होणं या सर्वावर आवळा, शंखपुष्पी, ब्राम्ही, जास्वंद यांनी युक्त तेल केसांना लावावं. काही दिवसांमध्येच केसांची वाढ चांगली होते. केस गळणं थांबतं. केसांचा रंग टिकून राहतो व रात्री शांत झोप लागते. तोंड बेचव होऊन मळमळ किंवा उलटी होत असल्यास आवळ्याचा रस व मध यांचं चाटण करावं. तोंडास रुची प्राप्त होते. गर्भारपणात स्त्रीला उलटी व मळमळ वारंवार होत असते. अशा वेळी आवळा सुपारी, कँडी व सरबत यांचा वापर करावा. यामुळे तोंडास रुची निर्माण होऊन मळमळ कमी होते. नियमित आवळा सेवनाने शरीरातील रसरक्तभिसरण क्रिया सुरळीत चालू राहते व त्यामुळे कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी होऊन हदयविकार टाळता येतो. नियमितपणे आवळा सेवन केल्यास त्यात असणाऱ्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे हृदय, केस, मांसपेशी व शरीरातील अनेक ग्रंथींना बळ मिळतं व त्यामुळे तारुण्यावस्था जास्त दिवस टिकून ठेवता येते. म्हणूनच वार्धक्यावस्था टाळण्यासाठी च्यवनऋषींनी आवळ्यापासून बनविलेला च्यवनप्राशावलेह सेवन केला व तारुण्यप्राप्त करून घेतलं. म्हणूनच बाराही महिने रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहण्यासाठी व त्यातून आरोग्य टिकण्यासाठी नियमितपणे च्यवनप्राश सेवन करावा. आवळकाठी पाण्यात वाटून अंगाला उटण्याप्रमाणे लावून ठेवली व काही वेळाने स्नान केले तर कांती उत्तम राहते, त्वचा सुरकुतत नाही. आवळकाठी व पांढरे तीळ रात्रभर पाण्यात भिजत घालावे. सकाळी बारीक करून तयार झालेला कल्क डोळे बंद करून पापण्यांवर लावल्यास डोळ्यांची आग शमते, डोळे थंड राहतात. उष्णता वाढल्याने नाकातून रक्‍त पडते, त्यावर तुपात परतलेली आवळकाठी कांजीत वाटून टाळूवर लावल्यास फायदा होतो.
अंगावर पित्त उठते, त्यावर आवळकाठी रात्रभर गोमूत्रात भिजत घालावी, सकाळी वाटून घ्यावी व नारळाच्या दुधात मिसळून अंगावर चोळावी. याने पित्ताच्या गांधी येणे बंद होते. ताप वाढल्याने डोके फार तापले असता आवळकाठी दुधासह बारीक करून लेप करण्याने डोके शांत राहते. वाढत्या वयामुळे शरीराची झीज होणे स्वाभाविक असते. पण ही झीज कमीत कमी व्हावी, धातूंची संपन्नता टिकून राहावी यासाठी मदत करणारी द्रव्ये म्हणजे वयःस्थापन द्रव्ये. शतावरी, गोक्षुर, अश्‍वगंधा अशी अनेक द्रव्ये वयःस्थापन करणारी असतात, मात्र यात आवळा सर्वश्रेष्ठ सांगितला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

भारतीय संस्कृतीत वृक्ष,वनस्पतींना अतिशय मानाचे स्थान दिलेले आढळते. वृक्षांचे संवर्धन, पालनपोषण, इतकेच नाही, तर त्यांचे पूजन करण्याचीही पद्धत आपल्या संस्कृतीत आहे. तसेच कार्तिक महिन्यात एकादशी ते पौर्णिमेच्या काळात आवळ्याच्या झाडाची पूजा करण्याची प्रथा आहे. पूजा झाल्यावर आवळ्याचा औषधासाठी वापर करण्यास प्रारंभ करायचा असतो. आवळा हे फळ गुणवत्तेमध्ये सर्व फळांमध्ये श्रेष्ठ आहे. आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभण्यासाठी आवळ्याचा आहार आणि औषधी द्रव्य म्हणून उपयोग करता येतो. आवळ्यामध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतं. आयुर्वेदामध्ये आवळ्याला अत्यंत श्रेष्ठ मानलं आहे. हिंदी मध्ये आँवला, संस्कृतमध्ये आमलकी, इंग्रजीमध्ये ‘एम्ब्लिका मायरोबेलान’ या नावाने परिचित आहे. आवळा पोषणाचं काम करतो. म्हणून आयुर्वेदात त्याला धात्री असंही म्हणतात. वार्धक्य अवस्था टाळून चिरतरुण राहण्यासाठी मदत करतो. म्हणून त्याला वयस्थाही म्हटले जाते. चरकाचार्य, वाग्भट, सुश्रूत या सर्व श्रेष्ठ ऋषींनी औषधामध्ये आवळ्याचा वापर करावयास सांगितलं आहे. आवळ्याचे पांढरे आवळे व रान आवळे असे दोन प्रमुख प्रकार आहेत. सुकलेल्या आवळ्यापेक्षा हिरवा ताजा आवळा आधिक गुणकारी असतो. आवळ्याचा छुंदा, मुरंबा, लोणचे, चटणी, अवलेह, कँडी, सरबत, सुपारी करून वर्षभर आवळा सेवन करता येतो. आवळा रक्तदोषहारक, पित्तशामक, सारक व रुचकर आहे. आवळा हा आम्लमधुर रसाचा, शीतवीर्यात्मक व मधुर विपाकी असल्यामुळे शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी करतो. यामध्ये शोधनाचा गुण असल्याने रक्तात साचलेली विषद्रव्ये दूर करून रक्त शुद्ध करतो. अशाच प्रकारे रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र या सप्तधातूंमध्ये जाऊन प्रत्येक धातूतील विषद्रव्ये दूर करून सर्वच धातूंना शुद्ध बनवतो. या त्याच्या गुणांमुळेच शरीर शुद्ध होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते. म्हणूनच नियमितपणे आवळा सेवन करणे आवश्यक आहे. औषधात आवळ्याचे फळ, पाने आणि बिया वापरल्या जातात. आवळा पोटात घेतला जातो, तसेच शरीराला बाहेरून लावण्यासाठीसुद्धा वापरला जातो. वाळवलेल्या आवळ्यांचाही औषधात वापर करता येतो. मात्र च्यवनप्राशसारखे रसायन बनवताना किंवा ज्या ठिकाणी आवळ्याचा रस वापरायला सांगितला आहे आवळकाठी म्हणजे वाळवून ठेवलेले आवळे. आवळा हा औषधात वापरला जातोच, पण तो स्वयंपाकातही महत्त्वाचा असतो. “अम्लफलेषु श्रेयम्‌’ म्हणजे सर्व आंबट फळांमध्ये आवळा श्रेष्ठ सांगितला असल्याने चटणी, लोणचे, सुपारी करण्यासाठी आवळ्यासारखे दुसरे उत्तम फळ नाही. मोरावळा तर सर्वांच्याच परिचयाचा असतो. खरं तर आम्लधर्मी पदार्थाने पित्ताची वृद्धी होते, परंतु आवळा आम्लधर्मी असला तरी त्याचा विपाक मधुर असल्यामुळे त्याच्या मधुर व शीतल गुणांमुळे त्याच्या सेवनाने पित्त वृद्धी न होता पित्तप्रकोप कमी होतो. त्यामुळे शरीराचा दाह होत असेल तर अशा अवस्थेत आवळ्याचा रस प्यावा.

Author