गुजराथी लोक हे खाण्यापिण्याचे शौकीन लोक. कुठेही जातील तेथे अगोदर जेवण्याखाण्याची काय सोय आहे हे पाहून जातील. ऑफिसातदेखील लंच साठी भक्कम पाच सहा कप्प्यांचा डबा नेतील. त्यात त्यांचा मधल्यावेळेतला नाष्ता देखील असेल. बस मध्ये रेल्वे मध्ये गुजराथी लोक त्यांच्या घरचे पदार्थ खाताना दिसतील, त्यांचे आतिथ्य आगदी भारावून टाकणारे असते. घरातच नव्हे तर अगदी हॉटेलात सुद्धा. गुजराती पदार्थ म्हटले की, सगळ्या आधी आठवतो तो ‘ढोकळा’. तसेच गुजराती पद्धतीने बनवलेली अळुवडी म्हणजे ‘पात्रा रोल’ आणि बनवायला कठीण पण अत्यंत मऊ असा चवदार पदार्थ म्हणजे ‘खांडवी’. गुजराती खाद्यपदार्थाची एक वेगळीच लज्जत असते. गुजराती पदार्थामध्ये डाळ, तांदूळ, भाज्या, चपाती, भाज्यांचं सॅलड, पापड आणि दही यांचा मुख्य समावेश असतो. गुजराती जेवण हा समतोल आहाराचं एक चांगलं उदाहरण समजलं जातं. ढोकळा, खांडवी हे गुजराथी पदार्थ प्रसिद्ध आहेत.
काही गुजराथी पदार्थ कृती
लीलवा नु भात
साहित्य:-२ टेबलस्पून चिरलेली कोथिबिंर, २ टेबलस्पून वाटलेली हिरवी मिरची, २ लाल मिरच्या, २ कप तांदूळ, २ टेबलस्पून तेल, १ टेबलस्पून मोहरी, लसणाच्या ४- ५ पाकळ्या बारीक करून, अर्धा टेबलस्पून आल्याची पेस्ट, चवीसाठी मीठ, एक चिमूट हिंग, पाव किलो मोड आलेले वाल
कृती:- तांदूळ धुवून अर्धा तास निथळत ठेवा. कढईत तेल घाला. फोडणी तयार करून घ्या. फोडणी तडतडल्यावर त्यात वाल, आलं आणि वाटलेली मिरची घाला. एखादे मिनिटभर तसेच ठवून नंतर त्याल धुतलेले तांदूळ घाला. थोडा वेळ परता. आता त्यात चार कप उकळते पाणी घाला. मंद आचेवर शिजवा. सगळे पाणी आटले, भात आणि वाल शिजला की गॅस बंद करा. कोथिंबिरीने सजवून गरमगरम खायला द्या.
मकाई ना भरता
साहित्य:- १ टीस्पून कोथिंबीर पावडर, १ टीस्पून हळद, १ किलो फ्रेश मका, १ टीस्पून तिखट, १ टेबलस्पून तेल, ३ मध्यम आकाराचे टोमॅटो, अर्धा टीस्पून गरम मसाला, मध्यम आकाराचे तीन कांदे, अर्धा टीस्पून मोहरी, ६-७ हिरव्या मिरच्या, चवीसाठी मीठ, चिरलेली कोथिंबीर
कृती:-मक्याचे कणीस अख्खे उकडून घ्या. मग त्याचे दाणे काढा आणि मिक्सरमधून वाटून घ्या. कांदा चिरून घ्या. टोमॅटो धुऊन चिरून घ्या. मिरची धुऊन चिरून घ्या. कढई गॅसवर तापत ठेवा. तेल घाला. मोहरी घाला. ती तडतडल्यावर कांदा घाला. त्याचा रंग बदलेपर्यंत तो परतून घ्या. मिरची घाला. दोन-तीन मिनिटे परता. लाल तिखट, हळद, गरम मसाला, मीठ घाला. थोडा वेळ परता. टोमॅटो घाला. टोमॅटो चांगला शिजल्यावर कॉर्न, थोडं मीठ आणि पाणी घाला. आणखी ५-१० मिनिटं परता. कोथिंबिरीने सजवून गरमगरम खायला द्या.
सुकावनी
साहित्य:- तळणीसाठी तेल, २० हिरव्या मिरच्या, १ कप दही, अर्धा टीस्पून मोहरी, पाव टीस्पून लाल तिखट, १ कप श्रावणघेवडा, अर्धा टीस्पून कोथिंबीर पावडर, दीड कप गवार, चवीपुरते मीठ
कृती : भाज्या धुऊन घ्या. त्या सुकवा. दह्य़ात पाणी घालून घुसळून ताक बनवा. या भाज्या त्या ताकात घाला आणि दोन दिवस ठेवा. त्यानंतर त्या ताकातून त्या भाज्या काढून घेऊन कडक उन्हात वाळवा. तळून घ्या. एका डिशमध्ये घेऊन त्यावर मीठ भुरभुरा. कोथिंबीर, लाल तिखट, घालून सजवा आणि गरमगरम खायला द्या.
रसपात्रा
साहित्य:- अळूच्या उकडलेल्या वड्या ५ – ६, चिंचेचा कोळ अर्धी वाटी, गूळ एक मोठा – लिंबा एव्हढा खडा, तिखट १ चमचा, हळद पाव चमचा, मीठ चवीप्रमाणे, कोथिंबीर, कढीपत्त्याची ४ -५ पाने, तेल २ चमचे, जिरे अर्धा चमचा, पाणी अर्धा कप
कृती: – पातेल्यात तेल टाकून तापत ठेवा. त्यात जिरे टाका. जिरे तडतडले की त्यात कढीपत्ता टाका. हिंग टाका. तिखट, हळद, मीठ टाका. आता त्यात चिंचेचा कोळ टाका. गूळ टाका. पाणी टाका. कोथिंबीर टाका. एक उकळी आली, गूळ नीट विरघळला की त्यात अळूच्या वड्या सोडा. उकळी आली की झाकण ठेऊन २ -४ मिनिटं शिजवा. तयार आहे झणझणीत रसपात्रा.
गुजराथी डाळ खिचडी
साहित्य:- एक वाटी साला सकट हिरव्या मुगाची डाळ,अर्धी वाटी पिवळी मुगाची डाळ,दीड वाटी बासमती तांदूळ, अर्धी मूठ शेंगदाणे, टोमॅटो, फ्लावर, बटाटा ,तोंडली, बीन्स,१“दालचिनीचा तुकडा,तीन वेलदोडे,३-४ लवंगा,दोन हिरव्या मिरच्या,एक चमचा काळी मिरीपूड ,एक टेबलस्पून तेल, ९-१० वाट्या पाणी(तुम्हाला हवे असेल त्याप्रमाणे कमी-जास्त),चवीनुसार मीठ,एक तमालपत्र,अर्धा टेबलस्पून जिरे,१२-१५ कढीपत्त्याची पाने.चिमूटभर हिंग,अर्धा चमचा हळद.
कृती:- हिरव्या सालीची मुगाची डाळ स्वच्छ धुवा आणि अर्धा-पाऊण तास आधी भिजत घालून ठेवा. अशाच प्रकारे पिवळी मुगाची डाळसुद्धा स्वच्छ धुवा आणि अर्धा-पाऊण तास आधी भिजत घालून ठेवा. गॅसवर एका मोठ्या जाड बुडाच्या पातेल्यांत फोडणीसाठी तूप+तेल एकत्र गरम करून घेऊन त्यात जिरे टाका. जिरे चांगले तडतडले व सोनेरी-ब्राऊन झाले की त्यात तमालपत्र,दालचीनी,लवंगा,वेलची आणि मिरीपुड घालून या कच्च्या मसाल्यांचा चांगला सुवास येईपर्यंत परता. परतून मस्त वास सुटल्यावर त्यात कढीपत्त्याची पाने,हिरव्या मिरचयांचे तुकडे,हळद व हिंग घालून पुन्हा दोन मिनिटे परता. आता त्यात शेंगदाणे, टोमॅटो, फ्लावर, बटाटा ,तोंडली व बीन्स घालून परता व पातेल्यावर झाकण ठेऊन ५-१० मिनिटे नुसत्या वाफेवर शिजवून घ्या. नंतर दोन्ही डाळींमधील पाणी निथळून घेऊन त्या पातेल्यात शिजत असलेल्या भाज्यात टाकून पुन्हा २-३ मिनिटे परता. मग त्यात पाणी घालून दोन्ही डाळी शिजू द्या. दरम्यान बासमती तांदूळ धुवून घ्या व १५-२० मिनिटे भिजत घालून ठेवा.
जेंव्हा डाळी अर्धवट शिजतील तेंव्हा त्यात भिजत घातलेले तांदूळ घालून ढवळून चांगले मिक्स करून घ्या. मध्यम आंचेवर दोन्ही डाळी व तांदूळ शिजू द्या. जेंव्हा तांदूळ शिजत आला असे वाटेल तेंव्हा त्यात मीठ घालून हलकेच खिचडी ढवळून मिक्स करून घ्या. खिचडी जेव्हढी हवी तेव्हढी घट्ट झाली असे वाटेल तेंव्हा उरलेले तूप घाला व एखादे मिनिट शिजवून घेऊन गॅस बंद करा. कढी, पापड व रायता सोबत सर्व्ह करा.
या खिचडी चे रेडिमिक्स तयार करता येईल सगळ्या गोष्टी तेल तुपावर फक्त परतून घ्यायच्या शिजवायच नाही पाणी घालून भाज्यावगैरे मग सगळे मसाले घालून रेडिमिक्स तयार
पाहिजे तेव्हढे राईस कुकर मध्ये शिजवून जास्तीचे फ्रिज मध्ये हवाबंद डब्यात पिशवीत ठेवा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
आजचा विषय गुजराथी पदार्थ
गुजराथी लोक हे खाण्यापिण्याचे शौकीन लोक. कुठेही जातील तेथे अगोदर जेवण्याखाण्याची काय सोय आहे हे पाहून जातील. ऑफिसातदेखील लंच साठी भक्कम पाच सहा कप्प्यांचा डबा नेतील. त्यात त्यांचा मधल्यावेळेतला नाष्ता देखील असेल. बस मध्ये रेल्वे मध्ये गुजराथी लोक त्यांच्या घरचे पदार्थ खाताना दिसतील, त्यांचे आतिथ्य आगदी भारावून टाकणारे असते. घरातच नव्हे तर अगदी हॉटेलात सुद्धा. गुजराती पदार्थ म्हटले की, सगळ्या आधी आठवतो तो ‘ढोकळा’. तसेच गुजराती पद्धतीने बनवलेली अळुवडी म्हणजे ‘पात्रा रोल’ आणि बनवायला कठीण पण अत्यंत मऊ असा चवदार पदार्थ म्हणजे ‘खांडवी’. गुजराती खाद्यपदार्थाची एक वेगळीच लज्जत असते. गुजराती पदार्थामध्ये डाळ, तांदूळ, भाज्या, चपाती, भाज्यांचं सॅलड, पापड आणि दही यांचा मुख्य समावेश असतो. गुजराती जेवण हा समतोल आहाराचं एक चांगलं उदाहरण समजलं जातं. ढोकळा, खांडवी हे गुजराथी पदार्थ प्रसिद्ध आहेत.
काही गुजराथी पदार्थ कृती
लीलवा नु भात
साहित्य:-२ टेबलस्पून चिरलेली कोथिबिंर, २ टेबलस्पून वाटलेली हिरवी मिरची, २ लाल मिरच्या, २ कप तांदूळ, २ टेबलस्पून तेल, १ टेबलस्पून मोहरी, लसणाच्या ४- ५ पाकळ्या बारीक करून, अर्धा टेबलस्पून आल्याची पेस्ट, चवीसाठी मीठ, एक चिमूट हिंग, पाव किलो मोड आलेले वाल
कृती:- तांदूळ धुवून अर्धा तास निथळत ठेवा. कढईत तेल घाला. फोडणी तयार करून घ्या. फोडणी तडतडल्यावर त्यात वाल, आलं आणि वाटलेली मिरची घाला. एखादे मिनिटभर तसेच ठवून नंतर त्याल धुतलेले तांदूळ घाला. थोडा वेळ परता. आता त्यात चार कप उकळते पाणी घाला. मंद आचेवर शिजवा. सगळे पाणी आटले, भात आणि वाल शिजला की गॅस बंद करा. कोथिंबिरीने सजवून गरमगरम खायला द्या.
मकाई ना भरता
साहित्य:- १ टीस्पून कोथिंबीर पावडर, १ टीस्पून हळद, १ किलो फ्रेश मका, १ टीस्पून तिखट, १ टेबलस्पून तेल, ३ मध्यम आकाराचे टोमॅटो, अर्धा टीस्पून गरम मसाला, मध्यम आकाराचे तीन कांदे, अर्धा टीस्पून मोहरी, ६-७ हिरव्या मिरच्या, चवीसाठी मीठ, चिरलेली कोथिंबीर
कृती:-मक्याचे कणीस अख्खे उकडून घ्या. मग त्याचे दाणे काढा आणि मिक्सरमधून वाटून घ्या. कांदा चिरून घ्या. टोमॅटो धुऊन चिरून घ्या. मिरची धुऊन चिरून घ्या. कढई गॅसवर तापत ठेवा. तेल घाला. मोहरी घाला. ती तडतडल्यावर कांदा घाला. त्याचा रंग बदलेपर्यंत तो परतून घ्या. मिरची घाला. दोन-तीन मिनिटे परता. लाल तिखट, हळद, गरम मसाला, मीठ घाला. थोडा वेळ परता. टोमॅटो घाला. टोमॅटो चांगला शिजल्यावर कॉर्न, थोडं मीठ आणि पाणी घाला. आणखी ५-१० मिनिटं परता. कोथिंबिरीने सजवून गरमगरम खायला द्या.
सुकावनी
साहित्य:- तळणीसाठी तेल, २० हिरव्या मिरच्या, १ कप दही, अर्धा टीस्पून मोहरी, पाव टीस्पून लाल तिखट, १ कप श्रावणघेवडा, अर्धा टीस्पून कोथिंबीर पावडर, दीड कप गवार, चवीपुरते मीठ
कृती : भाज्या धुऊन घ्या. त्या सुकवा. दह्य़ात पाणी घालून घुसळून ताक बनवा. या भाज्या त्या ताकात घाला आणि दोन दिवस ठेवा. त्यानंतर त्या ताकातून त्या भाज्या काढून घेऊन कडक उन्हात वाळवा. तळून घ्या. एका डिशमध्ये घेऊन त्यावर मीठ भुरभुरा. कोथिंबीर, लाल तिखट, घालून सजवा आणि गरमगरम खायला द्या.
रसपात्रा
साहित्य:- अळूच्या उकडलेल्या वड्या ५ – ६, चिंचेचा कोळ अर्धी वाटी, गूळ एक मोठा - लिंबा एव्हढा खडा, तिखट १ चमचा, हळद पाव चमचा, मीठ चवीप्रमाणे, कोथिंबीर, कढीपत्त्याची ४ -५ पाने, तेल २ चमचे, जिरे अर्धा चमचा, पाणी अर्धा कप
कृती: - पातेल्यात तेल टाकून तापत ठेवा. त्यात जिरे टाका. जिरे तडतडले की त्यात कढीपत्ता टाका. हिंग टाका. तिखट, हळद, मीठ टाका. आता त्यात चिंचेचा कोळ टाका. गूळ टाका. पाणी टाका. कोथिंबीर टाका. एक उकळी आली, गूळ नीट विरघळला की त्यात अळूच्या वड्या सोडा. उकळी आली की झाकण ठेऊन २ -४ मिनिटं शिजवा. तयार आहे झणझणीत रसपात्रा.