(User Level: User is not logged in.)

खाद्ययात्रा

महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • kelyachi-bhakri-300

    केळ्याची भाकरी

    जास्त पिकलेले केळे किंवा उकडलेले राजेळी केळे यांचा गर वापरुन, फ़णसाच्या भाकरीप्रमाणेच
    भाकरी करता येते.

      November 9, 2016


  • p-1064-tomato

    काही पदार्थ टॉमेटोचे

    टॉमेटो स्वच्छ धुवून घ्यावेत. पातेल्यात टॉमेटो बुडतील इतपत पाणी गरम करून त्यात टॉमेटो घालावेत ५ मिनीटे उकळवावेत. नंतर गॅस बंद करून ५ मिनीटे झाकून ठेवावेत. टॉमेटोची प्युरी करून घ्यावी. एका नॉनस्टीक पॅनमध्ये टॉमेटोची प्युरी घालावी आणि त्यात लाल तिखट, साखर, दालचिनी, आलेलसूण पेस्ट, चवीपुरते मिठ घालून मंद आचेवर १० मिनीटे परतावे. दाटसर सॉस तयार झाला कि दालचिनी काढून टाकावी.

      March 12, 2017


  • Kashmiri gravy-300

    काश्मिरी ग्रेव्ही

    पातेल्यात तूप गरम करून त्यात प्रथम शहाजिरे, खडे मसाले व आलंलसूण पेस्ट खरपूस भाजल्यानंतर लाल मिरचीचे वाटण व अक्रोडाचे वाटण घालावे. नंतर थोडेसे पाणी, घोटलेले दही घालून हे मिश्रण शिजवावे. मिश्रणाला तूप सुटल्यानंतर चवीला मीठ घालून गॅस बंद करावा.

      February 3, 2017


  • p-93-shilya-chapati-chivda

    शिळ्या चपात्यांचा चिवडा

    आपल्याकडे अनेकदा रात्रीच्या जेवणानंतर कधी चपात्या शिल्लक रहातात तर कधी भात आणि कधीतरी भाजीसुद्धा. या उरलेल्या अन्नाला थोडं नवीन रुप दिलं तर?

      May 8, 2017


  • पांढरे शुभ्र रव्याचे मोदक

    ओल्या नारळाचं खोबरं, साखर वेलदोडे पुड, पेढे आणि केळी यांचं सारण बनवून घ्यावं. एका भांड्यात पाणी गरम करून त्यात मीठ आणि डालडा टाकावा. एक उकळी आल्यावर त्यात रवा घालून नीट एकत्र करावं. ५-६ मिनिटं मंद गॅसवर झाकण लावून वाफवा. मग एका परातीत काढून नीट मळून घ्यावा.

      September 4, 2016


  • मोदकाचे निरांजन

    नेहमीप्रमाणे उकडीचा मोदक करावा. पीठ जरा जास्त घ्यावे. मोदक बंद केल्यावर वर थोडे पीठ राहायला हवे. वरच्या पिठाला हाताने निरांजनाच्या वरच्या भागाचा आकार द्यावा व त्यात तूप व वात घालून दिवा लावावा.

      September 5, 2016


  • ग्रीन क्लिअर सूप

    साहित्य: वेळ: २५ मिनिटे
    १ जुडी पातीचा कांदा (कांदे थोडे मोठे असावेत.), अर्धी जुडी पालक, १ जुडी सॅलडची पाने, २ टे. स्पून लिंबाचा रस, थोडी पुदिन्याची पाने, सेलरीच्या दोन काड्या, १ कप ओला मटार, २ टे. स्पून तेल, थोडे किसलेले चीज.मीठ, थोडी मिरेपूड,

    कृती: कांदे सोलून मोठ्या फोडी कराव्या. कांद्याची पात व पालकाची पाने धुऊन चिरावी. सॅलडच्या पानांचे हाताने तुकडे करावे. एका पातेल्यात रिफाइंड तेल घालून, त्यावर सर्व भाज्या जरा परता व चार कप पाण्यात शिजवा. मऊ झाल्या की मोठ्या गाळणीने गाळून, त्यातील फक्त पाणी घ्या. वेगळ्या पाण्यात थोडे मीठ टाकून व कणभर सोडा घालून, मटार त्यात शिजवून घ्या व गाळून मटार वेगळा ठेवा. हे गाळलेले पाणी पहिल्या पाण्यात एकत्र करा व उकळत ठेवा. त्यात मीठ, मिरेपूड व लिंबाचा रस घाला. उकळी आल्यावर बाऊलमध्ये थोडे शिजलेले वाटाणे व बारीक चिरलेली सेलरी घालून त्यावर हे गरम गरम सूप ओता. वरुन किसलेले चीज घाला.

      September 10, 2026


  • आहारीय केरसुणी – शेपू

    शेपू या भाजीस “आहारीय केरसुणी’ म्हणतात. पोटात अडथळा निर्माण करणाऱ्या वायूचे नि:सरण उत्तम प्रकारे ही भाजी करते. पोटात गॅस होणे, अजीर्ण, क्षुधामांद्य, कृमी अशा अनेक पचनाच्या तक्रारींवर शेपू गुणकारी समजली जाते.

      December 6, 2016


  • http://www.marathisrushti.in/prime/oldsiteimages/sites/20/2017/05/p-2588-corn-cutlet.jpg

    मक्याचे कटलेटस्

    प्रथम बटाटे व मक्याचा कोवळ्या कणसाचे दाणे उकडून घ्या. उकडलेल्या कणसाच्या दाण्यात आले व हिरवी मिरची पेस्ट, मीठ, साखर घालून सुकी भाजी परतून घ्या.

      June 7, 2017


  • पालकाचे चटपटीत सूप

    साहित्य: १ जुडी पालकाची पाने, २ टोमॅटो, १ टी स्पून लिंबाचा रस, ५ कप पाणी, ५-६ लसणाच्या पाकळ्या, १ लहान हिरवी मिरची, फोडणीसाठी तूप १ टी स्पून साखर मीठ.

    कृती: वेळ: २५ मिनिटे पालक स्वच्छ धुऊन बारीक चिरा. त्यात टोमॅटो व पाणी घालून सर्व मऊ होईपर्यंत शिजवा. हे सर्व मिश्रण थंड झाले की मिक्सरमध्ये फिरवा, गाळून घ्या. फार दाटसर असू नये. गाळलेल्या मिश्रणात मीठ टाकून उकळत ठेवल्यावर लसणाच्या पाकळ्या व मिरची ठेचून चांगल्या तुपावर थोडा हिंग व लसूण घालून फोडणी तयार करा व ही फोडणी उकळत्या पालकाच्या सूपावर ओता. गॅस बंद करा. झाकण ठेवा. शेवटी लिंबाचा रस व थोडी साखर घाला. हे चटपटीत सूप गरमागरम प्यायला द्यावे.

      September 10, 2026