(User Level: User is not logged in.)

खाद्ययात्रा

महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • कटाची आमटी

    पुर्वीच्या काळी स्वयंपाकघरात सर्व गोष्टींचा अगदी व्यवस्थित वापर केला जायचा. कोणत्याही गोष्टीची नासाडी होत नसे. पुरणपोळीच्या बेतामधील उरलेले जिन्नस वापरुन हमखास केलेला एक पदार्थ म्हणजे – कटाची आमटी. त्याचे साहित्य आणि कृती पुढीलप्रमाणे..

      August 8, 2013


  • कॉर्न आणि मेथी पुलाव

    साहित्य:- ३/४ कप बासमती तांदूळ, ३/४ कप मेथीची पाने, ३/४ कप कांदा, पातळ उभा चिरून, २ हिरव्या मिरच्या, उभ्या चिरून, १/२ कप मक्याचे दाणे, उकडून,१ टिस्पून किसलेले आले, ३ टेस्पून तेल, ३/४ कप दही, २ तमाल पत्र, ४ लवंगा, २ वेलची, दिड कप पाणी, चवीपुरते मिठ, १ टेस्पून तूप, चिमूटभर कसूरी मेथी, पूड करून घ्यावी,थोडी कोथिंबीर, सजावटीसाठी.

    कृती:- मेथी साफ करण्यासाठी, बारीक चिरून १/२ तास मिठाच्या पाण्यात भिजवून ठेवावी. बासमती तांदूळ धुवून, पाण्यात २० मिनीटे भिजवून ठेवावा. धुतलेली मेथी पाण्यातून काढून पिळून घ्यावी म्हणजे मेथीचा कडवटपणा कमी होईल. भिजवलेले तांदूळही निथळून १० मिनीटे ठेवावे. एका खोलगट पातेल्यात तेल गरम करावे. त्यात तमालपत्र, वेलची आणि लवंगा घालून काही सेकंद परतावे. नंतर त्यात उभा चिरलेला कांदा घालून मिडीयम हाय गॅसवर ५ मिनीटे किंवा लालसर होईस्तोवर परतावे. नंतर त्यात आलं आणि हिरव्या मिरच्या घालून परतावे. आता पिळून घेतलेली मेथी घालून २ मिनीटे परतावे. त्यात घोटून घेतलेले दही घालून ढवळत राहावे. दही घट्टसर झाले कि त्यात उकडलेले कॉर्न घालावे. छान मिक्स करून पाणी घालावे. मीठ घालावे आणि चव पहावी. पाण्याला उकळी येऊ द्यावी. एकदा पाणी उकळू लागले कि त्यात धुतलेले तांदूळ घालावे. मध्यम आचेवर, झाकण न ठेवता तांदूळ शिजू द्यावे. ६० % पर्यंत तांदूळ शिजेपर्यंत झाकण ठेवू नये. नंतर झाकण ठेवून मंद आचेवर तांदूळ पूर्ण शिजू द्यावा. फक्त गरज असेल तेव्हाच हलक्या हाताने भात ढवळावा. खुप जास्तवेळा ढवळू नये, त्यामुळे भाताची शिते तुटतात आणि भात निट बनत नाही. भात व्यवस्थित शिजला कि वरून १ टेस्पून तूप घालावे आणि हलक्या हाताने सर्व्हींग प्लेटमध्ये वाढावा. फ्लेवरसाठी थोडी कसूरी मेथी भुरभूरावी. थोडी कोथिंबीर पेरून सजवावे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      January 17, 2017


  • माझी अधिकमासी पाककृती खास जावयासाठी -पनीर वेज बिन्दापुरी

    आपल्या इथे अधिक मासात जावयाला वाण देण्याची पद्धत आहे. गेल्या रविवारी लेक-जावयाला जेवायला बोलविले होते. शनिवारी रात्री सौ.ने अनरसे केले होते. (किमान ३३ अनरसे तरी जावयाला द्यायचे असतात, ते ही एका तांब्याच्या किंवा पितळेच्या डब्यात). साहजिक आहे चिवडा ही केला होता. रविवारी सकाळी सौ.ने सहज म्हंटले, मी केलेल्या पाककृती तुम्ही आपल्या नावाने खपवितात. आज लेक- जावई येणार आहे. त्या साठी तुम्हीच डिश बनवा. मी ही म्हणालो त्यात काय आहे, मला ही चांगले पदार्थ बनविता येतात, तू बघच. त्यावर सौ. म्हणाली साधी- सौपी पनीरची भाजी करा. काल संध्याकाळीच बाजारातून अर्धा किलो विकत घेतले आहे. टमाटर, कांदे आणि शिमला मिर्च ही आहे. तेवढ्यात लेकीचा फोन आला. बहुतेक तिच्या आईने तिला आज बाबा रेसिपी बनविणार आहे याची कल्पना दिली असेल. ती म्हणाली, बाबा नेहमी सारखी पंजाबी स्टाईल पनीरची भाजी बनवू नका, काही तरी वेगळ बनवा. विचार करू लागलो आणि एक नवीन कल्पना सुचली. पनीर, टमाटर, कांदे आणि शिमला मिरची (ढोबळी मिरची) वापरून भाजी करायचे ठरविले.

      July 21, 2015


  • p-2860-upvaas-paanipuri

    उपवासाची पाणीपुरी

    साहित्य: ३/४ कप वरीचा तांदूळ, २ टेस्पून शाबुदाना पीठ, चवीपुरते मिठ, क्लब सोडा वॉटर (प्यायचा सोडा), तळण्यासाठी तेल.

    कृती:
    १) वरीचे तांदूळ, शाबुदाना पीठ आणि मिठ एकत्र करावे. त्यात सोड वॉटर घालून एकदम घट्ट भिजवावे. सुती कपडा पाण्याने भिजवून घट्ट पिळून घ्यावा. भिजवलेला गोळा या कपड्याने १५ ते २० मिनीटे झाकून ठेवावे.
    २) नंतर भिजवलेल्या पिठाचे करवंदाएवढे छोटे गोळे करावे आणि ते गोळे कोरडे पडू नयेत म्हणून ओल्या फडक्याखाली ठेवून द्यावे.
    ३) तेल मध्यम आचेवर तापवावे. गोळे लाटून पुर्‍या तळाव्यात. तेल खुप गरम किंवा खुप कोमट नसावे. मध्यम आचेवर तेल तापवावे.
    ४) पुर्‍या तळल्यावर जाळीच्या रॅकवर तेल निथळण्यास ठेवाव्यात. या रॅकच्या खाली एकादे ताट ठेवावे म्हणजे निथळलेले तेल ताटात जमा होईल.
    ५) पुर्‍या शक्यतो कुरकूरीत राहातील. पण जर राहिल्या नाहीत तर बेकिंग ट्रे मध्ये पुर्‍या पसरवाव्यात. ओव्हन २०० F (९३ C) वर प्रिहीट करावा, बेकिंग ट्रे मधल्या रॅकवर ठेवावा आणि साधारण १० मिनीटे पुर्‍या बेक कराव्यात. बेक केल्यावर पुर्‍या नक्की कुरकूरीत राहतील.

    स्टफिंग साठी: उकडलेला बटाटा त्यात मीठ हिरवी मिरची जिरे पेस्ट घालून कालवून घालावे. खारे शेंगादाणे. उपासाची शेव.

    पाणी पुराचे पाणी

    साहित्य: अर्धा कप चिंच, ४-५ टेस्पून किसलेला गूळ, १०-१२ खजुर, ६-७ हिरव्या मिरच्या, २ टिस्पून जिरेपूड, मीठ.

    कृती:
    १) चिंच पाण्यात भिजत घालून चिंचेचा कोळ करावा. खजूर ४-५ तास कोमट पाण्यात भिजवावे. बिया काढून मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यावे.
    २) हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये बारीक कराव्या.
    ३) ४-५ भांडी पाण्यात चिंचेचा कोळ, गूळ, खजूराची पेस्ट, मिठ, मिरचीची चटणी, जिरेपूड सर्व मिक्स करावे.

      August 10, 2018


  • स्टफ्ड पापलेट विथ प्रॉन्स

    साहित्य : १ मध्यम आकाराचे पापलेट, १ वाटा मध्यम आकाराची कोलंबी, १ कांदा, आलं-लसूण मिरची, कोथिंबीरीचे कोलंबीसाठी वाटण, (२-३ चमचे टेबलस्पून) २ टेबलस्पून आलं व लसणाचे वेगळे वाटण, अर्धे लिंबू, अर्धा चमचा हळद, १ चमचा तिखट, १ चमचा चिंचेचा कोळ, १ अंड, ब्रेड क्रम्ब्स, चवीनुसार मीठ, सजावटीसाठी अंड्याचे काप, केळीचे पान

    कृती : प्रथम पापलेट स्वच्छ धुऊन त्याचा मधला काटा काढून घ्यावा व त्याला वरुन अलगद ३-४ खाचा कराव्यात. पापलेट थोडे मीठ, हळद, लिंबू व आलं-लसणाची पेस्ट आतून व वरुन लावून घ्यावी. १५ मिनीटे त्याचे मॅरिनेशन होऊ द्यावे. नंतर कोलंबी दोरे काढून स्वच्छ धुऊन घ्यावी. कोलंबीला आलं-लसूण, मिरची, कोथिंबीरीचे वाटण, हळद, तिखट, मीठ व चिंचेचा कोळ लावून घ्यावा. एका कढईत तेल टाकून त्यावर कांदा परतावा त्यावर कोलंबी घालून ती सुखी होई पर्यंत परतावी, मॅरिनेट झालेल्या पापलेटमध्ये कोलंबी थंड झाल्यावर व्यवस्थित भरावी. नंतर पापलेटला तळताना कोलंबी बाहेर येऊ नये म्हणून दोरा बांधून किंवा सुई दोऱ्याने शिवावे.

    पापलेटला वरुन ब्रशने अंड लावून घ्यावे व ब्रेडक्रम्स मध्ये घोळवून शॅलो फ्राय करावे. केळीच्या पानात अंड्यांच्या चकत्यांची सजावट करुन सर्व्ह करावे.

    सोबत अन्नपूर्णेची मूर्ती व सुगरणीचा वसा घेऊन आलेल्या गृहिणीकडील हि कृती म्हणजे खानाखजिना अशी नजाकतीने केळीच्या पानावरील हा सागरी नजराणा पाहताच अस्सल खवय्यांची भूक खवळते व त्याचा आस्वाद घेतल्यावर तृप्त मनाने आणि भरल्या पोटाने रसिकांकडून जी दिलखुलास दाद मिळते त्याहून मोठे इनाम कुठले !

    - सौ. शर्मिला आदित्य गुप्ते

    ५१ सीकेपी पाककृती व सण-वार या पुस्तकातुन

      September 10, 2026


  • suki-bhel-300

    सुकी भेळ

    कुरमूरे थोडे गार झाले कि आधी त्यात सुके पदार्थ घालावेत. चवीपुरते मिठ, फरसाण, तळलेले शेंगदाणे आणि शेव घालून मिक्स करावे. नंतर मिरच्या, कैरी, कांदा, कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून मिक्स करावे. खुप जास्त वेळ मिक्स करू नये. लगेच सर्व्ह करावे. भेळ तयार केल्यावर लगेच खावी. भेळ तयार करून ठेवल्यास ती नरम पडेल.

      December 23, 2016


  • p-3006-kothimbir-paratha

    कोथिंबिरीचे पराठे

    साहित्य: कोथिंबिरीच्या २-३ मोठ्या जुड्या, ३-४ वाट्या कणीक, दोन टेबलस्पून बेसन (चणा डाळीचे) पीठ, चवीनुसार निरव्या मिरच्या, ५-७ लसूण पाकळ्या, पेरभर आले, चवीनुसार मीठ, एकचमचा जिरेपूड, पावचमचा हळद, एक टेबलस्पून पांढरे तीळ अथवा खसखस, एक वाटी तेल कींवा वनस्पती तूप, सारणाचा मसाला परतण्यासाथी एक टेबलस्पून तेल.

    कृती : प्रथम कोथिंबीर चांगली निवडून, स्वच्छ धुवून, निथळून सूती कपड्याने चांगली कोरडी करून घ्या. आले - लसूण – मिरच्या व पांढरे तीळ अथवा खसखस (भाजून घेऊन) एकत्र वाटून घ्यावे. त्यातचजिरेपूड घालावी. आता थोड्या तेलावर कोथिंबीर चुरचुरीत होईतो परतावी. मग त्यात मिक्सरवर केलेले मसाल्याचे वाटण व चवीनुसार मीठ घालून पुन्हा परतावे. बेसन (चणा डाळीचे) पीठ थोड्या तेलावर खमंगभाजून कोथिंबीरीच्या तयार केलेल्या मसाल्यात घालावे. चांगले कालवून हा बाकर – मसाला सारण एका बाऊलमध्ये काढून ठेवा.एका परातीत पराठ्याची कणीक,एक टेबलस्पून तेलाचे मोहन व चवीला मीठ घालून घट्ट पीठ भिजवून दोन तासओल्या सूती कपड्याखाली मुरण्यासाठी झाकून ठेवावे. आता पराठे करतेवेळी लाडवा एव्हढा कणकेचा गोळा घेऊन हाताने द्रोणाचा आकार द्यावा किंवा छोटी पुरी लाटुन्न व त्याचाद्रोण करावा. त्यात सुमारे दोन टेबलस्पून कोथिंबिरीचा बाकर(सारण)भरावा. द्रोणाच्या कडा जुळवून गोल कचोरीसारखी गोळा वळावा.पोळपाटावर कणीक भुरभुरून त्यावर हा गोळा ठेवून हलक्या हाताने पराठे लाटून तेल वा तूप सोडून भाजावे. हे कोथिंबिरीचे पराठे आठवडाभर छान टिकतात.लोणी व पुदिना चटणी सोबत सर्व्ह करावे. खूपच स्वादिष्ट लागतात.

      August 4, 2018


  • shevgyachi-Paane-300

    आजचा विषय शेवग्याची पाने

    भारतात महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडूत शेवग्याची शेती केली जाते. आयुर्वेदिक दृष्ट्या शेवग्याची पाने ही औषधी असुन यामध्ये अ ब क हि जिवनसत्वे, लोह, कँल्शीअम यासारखी खनिजे मोठ्या प्रमाणात असतात. पानांची पावडरची प्रक्रिया करून पदार्थ साध्या पद्धतीने बनविता येतात, असुन त्याला जगभरात मोठी मागणी आहे.

      January 16, 2017


  • कच्चाकेळ्याची भाजी

    साहित्य: ४ मध्यम कच्ची केळी, २ कांदे बारीक चिरलेला, ४ हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे, अर्धी वाटी ओले खोबरे, मीठ व साखर चवीपुरते, कढीपत्ता ८ ते १० पाने, कोथिंबीर, फोडणीसाठी २ चमचे तेल, पाव चमचा मोठ मोहरी, पाव चमचा हळद, चिमुटभर हिंग

    कृती: कच्ची केळी साला सकट तुकडे करुन उकडून घ्यावीत नंतर त्याची साले काढून केळ्याचा किस करुन घ्यावा. पातेल्यात तेल तापवून मोहोरी, मिरची, कढीपत्ता हळद व हिंग घालून फोडणी करावी. त्यावर चवीपुरते मीठ, साखर व ओले खोबरे घालावे. सर्व परतल्यावर केळयांचा किस घालून हलवावा. हाताने परतवावे व वरुन कोथिंबीर घालावी..

    ही भाजी मधल्यावेळचे खाणे म्हणून सुद्धा छान लागते.

    -सौ. प्राची हर्षित निमक

    ५१ सीकेपी पाककृती व सण-वार या पुस्तकातुन

      September 10, 2026


  • p-3130-dahi bhaat

    दही भात

    साहित्य : ४ वाटया शिजलेला भात, १ वाटी गोड दही, अर्धी वाटी दूध, चवीनुसार मीठ (साधारणत: दीड ते दोन चमचे), ३ तळलेल्या सांडग्या मिरच्या.

    कृती : प्रथम शिजलेला भात एका पसरट पातेलीत किंवा ताटात पसरुन पूर्ण गार होऊ द्यावा, किंवा शक्यतो सकाळी दही भात करायचा असेल तर रात्रीच शिजवून तयार केलेला असला तर फारच बरे. गार भात पातेलीत घाला त्यात दही, दध घालून नीट कालवा. नंतर त्यात सांडग्या मिरच्या हाताने कुस्करून घाला. भाताची चव घेऊन पहा. आवश्यकता असेल तरच त्यात मीठ घाला. सांडग्या मिरचीत मीठ असते, म्हणून मीठ घालण्याआधी नेहमी चव घेऊन पहा. हा भात केळीच्या पानावर फार चांगला लागतो.

    टीप : हा भात कालवल्यानंतर फार वेळ ठेवल्यास तो फुगतो व घट्ट होता. अशावेळी त्यात पुन्हा थोडेसे दूध घालून भात कालवून खावा

      August 3, 2018