दहशतवादी हल्ल्यात अमुक अमुक देशात तमुक तमुक माणसे मरली गेली या अशा आशयाच्या बातम्या आता नित्याच्या झालेल्या आहेत. आपल्या मराठीत म्ह्णच आहे ना ‘रोज मरे त्याला कोण रडे’ तसेच काहीसे या दहशतवादी हल्ल्यांच्या बाबतीत झालेले आहे. फक्त आपल्या देशातीलच नव्हे तर जगभरातील लोकही आता या बाबतीत उदासिन झालेले असावेत. सध्याच्या युगातील माणसे मला वाटत आपला जीव तळहातावर घेऊनच जीवन जगत असतात. त्यांचा जीव त्यांच्या तळहातावरून बर्फाच्या गोळ्यासारखा कधीही गळून पडेल याची जणू त्यांना खात्रीच असते. असं तळहातावर जीव घेऊन जीवन जगणारेच आज खर्याग अर्थाने जीवन जगत असतात असं म्हटलं तर ती अतिशोक्ती ठरणार नाही. आज ना उद्या मरायचेच आहे मग आज मेलो तरी काय फरक पडणार आहे ? हा विचार अगदी सहज करण्याइतपत आजचा माणूस येऊन पोहचलेला आहे. आपण कोणासाठी तरी जगायला हवं अथवा आपल्या जगण्यावर कोणीतरी अवलंबून आहे आपल्या जगण्याची जगाला गरज आहे असं आत्मविश्वासाने मानणारा माणूस आता या भूतळावर जीवंत असण्याची शक्यता आता जवळ - जवळ धुसरच आहे.
माणसाने कोणाच्या पोटी जन्म घ्यावा हे त्याच्या हातात नसते त्यामुळे तो ज्या धर्मात जन्माला आला तो धर्म स्वीकारण्याखेरीज त्याच्याकडे पर्याय नसतो. ज्यावेळी रामायण महाभारत घडले त्यावेळी आजच्या प्रचलित विशिष्ठ अशा कोणत्याही धर्माचा उल्लेख आढळत नाही. पण संस्कृतीचा उल्लेख आढळतो. त्यावेळी माणसातील भेद दोनच प्रकारे केला जायचा एक सत्याची बाजू घेणारा आणि दुसरा असत्याची बाजू घेणारा. सत्याची बाजू घेणारा तो धार्मिक आणि असत्याची बाजू घेणारा तो अधर्मी रामायणात राम धार्मिक तर रावण अधर्मी होता. महाभारतात पांडव धार्मिक तर कौरव अधर्मी होते. गीतेत म्हटल्या प्रमाणे शेवटी धर्माचाच विजय होतो. पण त्यावेळी श्रीकृष्णांना अपेक्षीत असणारा धर्म आज अस्तित्वात आहे का ? हा संशोधनाचा विषय आहे. आज धर्माची परिभाषा भयंकर बदलेली आहे. हिंदू संस्कृती ही जागतिक होती, संपूर्ण जगासाठी होती या संस्कृतीमुळेच निसर्ग सांतुलीत होता. कालांतराने अधर्मामुळे संस्कृतीत भेसळ वाढत गेली आणि संस्कृती बदलत तिला धर्माचे स्वरूप प्राप्त झाले. एखाद्या प्रदेशाचे भौगोलिक वातावरण त्या प्रदेशात राहणार्यात लोकांची भाषा आणि त्यांच्या भौगोलिक गरजा याला पुरक म्ह्णून तिथे राहणार्याा लोकांनी आपल्या संस्कृतीत काही बदल करत गेले आणि ते बदल वाढत गेल्यावर एका नवीन धर्माचा जन्म झाला.
आज जगभरात जो दहशतवाद पसरविला जातोय तो फक्त धर्माच्या नावावर. धर्म आणि दहशतवाद यांचा संबंध इतका जवळ्चा आहे की एखादया लहान मुलाला जरी विचारलं की दहशतवादाच्या मुळाशी काय आहे ? तर तो अगदी सहज म्ह्णेल धर्म ! दहशत म्ह्णजे काय भितीचे वातावरण तयार करून लोकांच्या मनात भय निर्माण करणे, त्यांना निर्भय होऊ न देणे गीतेत म्ह्टल्या प्रमाणे जोपर्यंत माणूस निर्भय होत नाही तोपर्यंत तो काहीही साध्य करू शकत नाही. निर्भय माणसाला जिंकणे अशक्य असते. त्यामुळे जगावर राज्य करण्याचे स्वप्न पाहणारे दहशत ही एखादया शस्त्राप्रमाणे वापरतात. जे कधी - कधी शस्त्रानेही साध्य होत नाही ते दहशतीने साध्य करता येते. मुंबईसारख्या शहरात अगदी किरकोळ शरीर असणारे तरुण फक्त हातात एक सुरा घेऊन रस्त्यावर फिरतात आणि शेकडो लोकांना त्यांच्या दहशतीच्या सावटाखाली जगायला भाग पाडतात. पण त्या शेकडो लोकांपैकी एक जरी निर्भय असेल तर तो या गुंडाना अगदी सहज पाणी पाजू शकतो पण दुदैवाने तसे क्वचित होते. मुंबईसारख्या शहरांवर दहशदवादी हल्ले होतात ते काही लोकांना फक्त ठार मारण्यासाठी होत नाहीत हे करणार्यांानाही माहित असते करोडो लोकांमधील पाच पन्नास लोक मेल्याने काहीही फरक पडत नाही. पण त्या पन्नास माणसांना मारून ते पन्नास करोड लोकांच्या मनात दहशत निर्माण करण्यात यशस्वी होतात. त्या दहशतीच्या जोरावर पुढे कित्येक वर्षे ते त्या लोकांवर राज्य करतात.
आज दहशत निर्माण करण्यासाठी धर्माचाच आधार का घेतला जातो ? खरं तर दहशतवादाला कोणताही जात-धर्म अथवा रंग नसतो पण दहशतवादाची बंदूक चालविण्यासाठी एक खांदा लागतो तो खांदा म्ह्णजे हल्ली धर्म असतो. एका धर्माच्या दहशतीखाली दुसरा धर्म वावरत असतो. भारतापासून पाकिस्तान हा वेगळा देश निर्माण झाला फक्त धर्माच्या नावावर एक स्वतःला हिंदू तर दुसरा स्वतःला मुस्लिम राष्ट्र म्ह्णवून घेतो आणि उगाच एकमेकांच्या दहशतीच्या सावटाखाली विनाकारण दिवस ढकळत आहेत. काही मुस्लिम राष्ट्रे ख्रिश्चन राष्ट्रांच्या दहशतीखाली दिवस ढकळत आहेत. फक्त जैन आणि बौद्ध धर्माचे कोणाला भय वाटत नाही पण त्या धर्मातील लोकांना दहशतवादाचा सामना करावाच लागतो. या अहिंसावादी धर्मांमुळेच जगात हिंसक अधर्माचे प्राबल्य वाढले त्यांना आवर घालण्यासाठी धर्माच्या रक्षणासाठी हिंसा मान्य असणार्यार हिंदू धर्मामुळेच अहिंसा मानणारे हे धर्म टिकले नाहीतर ते ही नष्ट झाले असते आणि सार्याय जगावर अधर्माचे राज्य असते हे सत्य नाकारता येणार नाही. धर्माच्या रक्षणासाठी हिंसा मान्य असणार्या याच हिंदू धर्मात जन्माला आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदूचे नव्हे तर न्यायाचे राज्य प्रस्थापित केले नाहीतर आज हिंदूस्तानात हिंदू शोधावा लागला असता. हिंदूनी आपला धर्म वाढविण्याची महत्वकांक्षा कधीच बाळगली नाही त्यामुळे सर्वाधिक अघात हिंदू धर्मावरच झाले आहेत हे सत्य नाकारता येणार नाही. त्यामुळे हिंदू धर्माची कोणालाच कधीच दहशत वाटली नाही. पण मुस्लिम राज्यकर्त्यांनी मुस्लिम धर्माची दहशत संपूर्ण जगात पसरविण्याचा प्रयत्न केला. त्यात ख्रिश्चन धर्मिय ही मागे नाहीत आजही भारतात गरीब हिंदूंना पैशाची लालच दाखवून त्यांना आपल्या धर्मात आणण्याचे प्रकार अधूनमधून उजेडात येत असतात. जगात अशी कितीतरी लोक आहेत ज्यांना आपला धर्म कोणता आहे हेच माहित नाही या अशा लोकांना आपल्या धर्माचे मांडलीक करून आपल्या धर्माची दहशत जगभरात पसरविण्याचा छुपा प्रयत्न केला जातो. फक्त धर्म कुरवाळत बसलेल्या लोकांची प्रगती खुंटते पण त्यांना जगातील सारी भौतिक सुखे मात्र मिळवायची असतात ती मिळविण्यासाठी ही लोक दहशतवादाचा मार्ग स्वीकारतात आणि त्यासाठी कधी - कधी ते आपल्याच धर्म बांधवांचा बळी घ्यायलाही कचरत नाहीत.
आता तर दहशतवादी धर्माच्याही पलिकडे गेलेले आहेत आता त्यांना दहशतवाद हाच त्यांना त्यांचा धर्म वाटू लागलेला आहे पण हीच त्यांच्या विनाशाची घंटा आहे कारण आजपर्यंत धर्मच त्यांचा रक्षणकर्ता होता, कारण दहशतवाद्यांना माहित नाही की धर्म हाच या विश्वातील सर्वात मोठा दहशतवादी आहे. एक धर्म फक्त दुसर्यान धर्मातील लोकांवर दहशत ठेवण्यास तत्पर नसतो तर तो त्याच्याच धर्मातील लोकांवर दहशत ठेवत असतो. हिंदू धर्मातील लोकांच्या मनात देवाविषयी , पाप- पुण्या विषयी दहशत असते, आपल्या परंपरा जपण्याची त्या टिकवून ठेवण्याची दहशत असते. कित्येक धर्मात स्त्रियांनी कस वागावं याची दहशत असते. कित्येक धर्मांच्या प्रमुखांवर आपला धर्म जीवंत ठेवण्यासाठीची दहशत असते. प्रत्येक धर्म ज्या ईश्वराला मानतो त्या ईश्वराच्या दहशतीखाली त्या - त्या धर्मातील लोकांना ठेवण्याचा प्रत्येक धर्माचा प्रयत्न असतो. इंग्रजांनी आपल्या देशावर जवळ - जवळ दोनशे वर्षे राज्य केले पण त्यांनी आपल्या देशातील लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या नाहीत नाहीतर त्यांना आपल्या देशावर दोन दिवस राज्य करणेही शक्य झाले नसते. आजही भले-भले धर्मावर भाष्य करताना हजारदा विचार करतात. आजचे राजकारणीही धर्माच्या दहशतीखाली राहूनच राज्य करीत आहे हे सत्य आहे. धर्म आणि दहशतवाद हे हातात हात घालून चालता आहेत. जोपर्यत धर्म आहे तोपर्यंत दहशतवाद असणारच धर्माच्या दहशतीत राहण वेगळ आणि त्या दहशतीचा आपल्या स्वार्थासाठी वापर करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आज धर्माच्या दहशतीचा काही लोक आपला स्वार्थ साधण्यासाठी वापर करीत आहेत पण त्यांना माहित नाही धर्माची दहशत इतकी भयंकर आहे की ती त्यांना कधी गिळंकृत करेल त्यांचे त्यांनाही कळणार नाही...
लेखक – निलेश बामणे
गोरेगांव ( पूर्व ), मुंबई – 400 065.
मो. 8652065375
April 23, 2016
समर्थ रामदास स्वामींनी त्यांच्या सुप्रसिध्द दासबोधात मुर्खांची लक्षणे सांगितली आहेत. ही लक्षणे पढतमूर्खांची म्हणजेच मूर्खपणा आणि शहाणपणा यातील फरक कळणार्या मुर्खांची आहेत. अशा पढतमूर्खांची विस्तृत लक्षणे रामदास स्वामींनी सांगीतली असली तरी त्यांच्या समर्थ प्रतिभेला 21व्या शतकातील मुर्खांचा वेध घेता आला नाही, असे खेदपूर्वक नमूद करावेसे वाटते. अर्थात त्यात दोष स्वामींचा नाही, केवळ रामदास स्वामीच नव्हे तर इतर कोणत्याही अलौकीक प्रतिभेच्या व्यक्तीला मुर्खात काढण्याची प्रचंड क्षमता 21व्या शतकातील भरतखंड निवासी लोकांमध्ये आहे. अधिक स्पष्ट सांगायचे तर 17व्या शतकात दासबोधाची रचना करणाऱ्या रामदास स्वामींना 21व्या शतकात भरतवर्षात सरकार नामक एक विचित्र यंत्रणा उभी होईल आणि मूर्खपणाच्या व्याख्याच ही यंत्रणा बदलून टाकेल, अशी शक्यता वाटण्याचे काहीच कारण नव्हते. तशी पुसटशी शंका जरी त्यांना आली असती तर त्यांनी आपली पढतमूर्खांची इतर सर्व लक्षणे बाद करीत केवळ, ‘तो येक महामूर्ख, जो असे प्रामाणिक’ हेच एक लक्षण कायम ठेवले असते.
October 6, 2002
मोहन धारियांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या कर्जमुत्त*ीसाठी नुकतेच आंदोलन करण्यात आले. कोरडवाहू अल्पभूधारक शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुत्त*ी मिळावी, ही या आंदोलनातील एक ठळक मागणी होती. इतरही काही मागण्या होत्या आणि त्या सगळ्या मागण्यांचा उद्देश एकच होता, तो म्हणजे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात होत असलेल्या दुर्दैवी आत्महत्या रोखणे.
November 26, 2006
युग संगणकाचे युग म्हणून ओळखले जाते. सगळ्याच गोष्टी कशा संगणकाच्या वेगाने होऊ लागल्या आहेत. तसे पाहिले तर वेगाचे हे अप्रूप मानवासाठी नवे नाही.
January 18, 2009
राळेगणसिद्धीचे समाजसेवक अण्णा हजारे आतां सगळ्या देशाचे गांधीवादी युगपुरुष झाले आहेत . ते भ्रष्टाचाराविरुद्ध लढत आहेत आणि त्यांचा लढा आता सगळ्या देशाचा झालाआहे.
August 19, 2011
शरीर हे क्षणभंगूर आहे , मृत्यूनंतर सारे नष्ट होते. मात्र अवयरुपी जिवंत रहायचे असेल तर ‘ अवयव दान ‘ करा. मृत्यूपश्चात एक देह सात जणांच्या आयुष्यात एक आशेचा किरण ठरू शकतो. तर 35 लोकांच्या आयुष्याचा दर्जा सुधारू शकतो. मात्र आपल्या समाजात अवयवदानाविषयी फारशी जागृती नसल्याने कित्येक रुग्ण वर्षांनुववर्ष प्रतिक्षेत आहेत. अवयव दान हे केवळ डोळे किंवा किडनी पुरता मर्यादित नसून शरिराचे सुमारे 10 विविध अवयव आपण दान करू शकतो. फक्त त्यासाठी पाहिजे पुरेशी माहिती व तुमची इच्छा…
गेल्या २० वर्षात फक्त ७५४ लोकांनीच अवयवदान करून इतरांना जीवनदान दिलेले आहे. या आकड्यावरूनच अवयवदानासंबंधी किती मोठ्या प्रमाणात जागृतीची गरज आहे, हे लक्षात येईल.
मनुष्य देहातून प्राण निघून गेल्यावर त्या पार्थिवाला पंचतत्वात विलीन करण्याच्या प्रत्येक धर्माच्या आपापल्या पद्धती आहेत. पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी यात मानवी शरीरासोबत, त्याच्या शरीरातील वेगवेगळे अवयवसुद्धा नष्ट होतात. या शरीरातील काही अवयव आजच्या अत्याधुनिक वैद्यकीय प्रगत शास्त्रामुळे दुसऱ्या रुग्णांमध्ये प्रत्यरोपीत करून त्याला जीवनदान देता येते. अर्थात ही प्रक्रिया सोपी मुळीच नाही. प्रथमत: समाजात जागृती निर्माण होणे, नंतर उच्च वैद्यकीय सुविधा उपलब्ध असणे, तज्ज्ञ डॉक्टर्स, प्रशासनाचे सहकार्य अशा अनेक गोष्टींच्या सहकार्यानेच अवयव प्रत्यारोपण प्रत्यक्षात शक्य होते. आपण संक्षेपमध्ये देहदान अवयवदानबाबत माहिती करून घेऊयात.
देहदान : यात व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर संपूर्ण देहाचेच दान करण्यात येते. देहदान हे मेडिकल कॉलेजमध्येच केले जाते. या देहाचा उपयोग शिकाऊ डॉक्टर यांना प्रशिक्षण देण्यासाठी होतो. यातूनच चांगले डॉक्टर्स तयार होतात याच डॉक्टरला समाज पुढे देवासमान मानतो.
मेडिकल कॉलेजमध्ये मृतदेहाची उपयोगिता संपल्यावर सन्मानाने तो देह पंचतत्वात विलीन केला जातो. देहदानाचे फॉर्म मेडिकल कॉलेज या क्षेत्रात काम करणाऱ्या समाजसेवी संस्थांकडे उपलब्ध आहेत. नागरिकांनी फॉर्म भरून जवळच्या नातेवाईकांची सही घेतल्यास तुमची इच्छा त्यांच्याही लक्षात येईल ती व्यक्ती मृत झाल्यास देहदान करणे सोपे जाईल. फॉर्म भरला म्हणजे देहदान होईलच, असे नाही. जर जवळच्या नातवाईकांनी नकार दिला तर देहदान होऊ शकत नाही. आणि फॉर्म भरला नसेल मृत्यूनंतर जर जवळच्या नातेवाईकांनी देहदान करण्याची इच्छा व्यक्त केली तर देहदान होऊ शकेल. देहदान करण्यासाठी जवळच्या मेडिकल कॉलेज अथवा सामाजिक संस्थेला फोन करणे एवढेच पुरेसे आहे. देहदान हे जास्तीत जास्त ५-६ तासांत होणे गरजेचे आहे.
अवयवदान : मनुष्य काही कारणाने अती कोमात जातो मेंदू मृत (brain dead) झाल्यावरच अवयवदान करता येते. डॉक्टरांचे सर्व प्रयत्न थकतात रुग्ण कोमातून बाहेर येण्याची शक्यता संपते रुग्ण कृत्रिम श्वासोच्छवासावर जिवंत असतो. अशा परिस्थितीत काही अवयवांचे दान करता येते.
आपल्याला डोळे, त्वचा, यकृत, हृदय, मूत्रपिंड, प्लीहा यासारख्या अवयवांची अमुल्य भेट मिळालेली आहे. निसर्गाने दिलेली ही भेट आपल्या मृत्यूनंतर इतर गरजू रूग्णांना तुम्ही दान देऊ शकता. या अवयवदानाने मृत्यूच्या उंबरठयावर उभ्या असलेल्या रूग्णांना दुसरे जीवन जगण्याची संधी मिळते व मृत्यूनंतरही आपण दुसर्याच्या शरीरात जिवंत राहू शकतो. अवयवदानाच्या उदात्त कार्याला जाती-धर्माचे, दर्जाचे अथवा लिंगाचे बंधन नाही. सद्य परिस्थितीत देशात सुमारे 5 लाख मूत्रपिंड, 50 हजार यकृत, 2000 हून अधिक हृदय विकारांनी ग्रस्त रूग्ण असून या रूग्णांना अवयवांची गरज आहे. मूत्रपिंड विकारावर कृत्रिम रक्त शुद्धिकरण हा पर्याय आहे. परंतु यकृत, हृदय, फुप्फुस विकारांनी त्रस्त रूग्णांना असा कोणताही मार्ग उपलब्ध नाही. त्यांच्यासाठी नवीन अवयव प्रत्यारोपण हाच एकमेव मार्ग आहे. जागतिक पातळीवर विचार करता मृत्यूनंतर अवयवदान करण्याचे प्रमाण भारतात अत्यल्प आहे. सामाजिक व कौटुंबिक जनजागृतीच हा बदल घडवून आणू शकेल.
श्री.संजीव, वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
January 2, 2017
भारतात न्यायव्यवस्था आहे, या व्यवस्थेत प्रत्येक आरोपीला आपले निर्दोषत्व सिद्ध करण्याची पूर्ण संधी दिली जाते; परंतु ती सुविधा केवळ भारतीय नागरिकांसाठी आहे, हे या दहशतवाद्यांना सांगायचे असेल तर पकडलेल्या दोन-चार दहशतवाद्यांना गोळ्या घालणे गरजेचे आहे. इथे देशद्रोह्याला चिरडलेच जाते, हा देश स्वाभिमान आणि सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करायला तयार नाही, असा संदेश जोपर्यंत दहशतवाद्यांपर्यंत पोहचत नाही तोपर्यंत इथल्या दहशतवादी कारवायांना लगाम बसणार नाही आणि तोपर्यंत आमच्या स्वातंत्र्यालाही पूर्णत्व येणार नाही. भीत-भीत जगायला लावणारे हे स्वातंत्र्य काय कामाचे?
August 14, 2011
रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टर्स तसेच रुग्णालयातील इतर कर्मचारी वर्गाला मारहाण होण्याचे प्रकार अलीकडील काळात खूप वाढले आहेत. या घटना बहुधा सरकारी इस्पितळाच्या संदर्भातच असतात. अशी एखादी घटना घडली की लगेच त्या इस्पितळात असतील नसतील तेवढे सगळे कर्मचारी काम बंद आंदोलन करतात.
March 8, 2009
सध्या देशात विशेषत: महाराष्ट्रात, बर्ड फ्लूचा आतंक माजला आहे. या रोगाला आटोक्यात आणण्यासाठी सरकारी स्तरावर प्रचंड धावपळ सुरू आहे. लाखोंच्या संख्येने कोंबड्या मारल्या जात आहेत.
February 26, 2006
आपण निस्वार्थी प्रेम करून, जर इतरांच्या जीवनात थोडासाही आनंद निर्माण होण्यासाठी प्रयत्न केले तर आपल्या जीवनात आनंदाचे लक्ष लक्ष क्षण येतील.
काडीकचऱ्यात सडून नष्ट होण्यापेक्षा स्वतः जळून दुसऱ्यांना उब देता आली पाहिजे.
March 22, 2011
Copyright © 2025 | Marathisrushti