(User Level: User is not logged in.)

वैचारिक लेखन

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आता उरले लुटण्यापुरते

    पृथ्वीचा फेरफटका मारताना एकदा आद्य वार्ताहर नारदमुनींना एक गलेलठ्ठ डुक्कर घाणीत/गटारात लोळताना दिसले. ईश्वरी अवताराचे महाभाग्य लाभलेल्या वराहाची ती अवस्था नारदाला पाहवली नाही. नारदमुनींनी लगेच त्या वराहाला स्वर्गसुखाची अनुभूती द्यायचे ठरवले आणि स्वत:बरोबर स्वर्गात येण्याची विनंती केली.

      July 7, 2002


  • कुठे मिळतो स्वाभिमान ?

    प्रकाशन दिनांक :- 13/03/2005

    इतरांना शहाणपण शिकविण्याची सवय बऱ्याच लोकांना असते. आपल्याला कळते तेवढे दुसऱ्या कुणालाच कळत नाही, त्यामुळे या दुसऱ्यांना शहाणपणाच्या चार गोष्टी सांगायचा आपल्याला अधिकार प्राप्त झाला आहे, अशा भ्रमात बरेच लोक वावरत असतात. वस्तुस्थिती मात्र अशी असते की, इतरांना शहाणपण शिकविणारे हे लोकच मुळात अज्ञानी असतात.

      March 13, 2005


  • अन्न हे पूर्ण ब्रह्म

    आज एका माजी सहकाऱ्याचे लग्न होते म्हणून सुट्टी घेतली होती..... जेवणाची कटकट मिटली म्हणून सौ. हि खुश होती .
    निखिल माझ्याच डिपार्टमेंटमध्ये ट्रेनी म्हणून जॉईन झाला होता. तीन वर्षात खूप काही शिकला. काम करता करता पुढे शिकत राहिला आणि मग हळू हळू एक एक जॉब बदलत आता मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर जाऊन बसला होता.
    गुरू म्हणून माझे नाव सर्वाना सांगायचा.

    अर्थात मी काही शिकवले नव्हते त्याला, पण वेळोवेळो मार्गदर्शन केले होते.आज त्याचेच लग्न होते. तीन वेळा फोन करून आठवण करून दिली म्हणून सपत्नीक जाण्याचे ठरविले.

    दादरमधील चांगल्या हॉलमध्ये लग्न होते.आम्ही तिथे पोचलो. तेव्हा सगळी मंडळी फेटे घालूनच वावरत होती. हॉलबाहेर नेहमीप्रमाणे फेरीवाले, दोन चार भिकाऱ्यांची गर्दी दिसत होती .....

    मला पाहून स्टेजवर धार्मिक विधीसाठी बसलेल्या निखिलने हात हलविला आणि शेजारच्याला खूण केली. ताबडतोब त्याचा मित्र आमच्या स्वागताला आला. मऊशार कोचावर बसून आम्ही सोहळा पाहत राहिलो .....
    त्यांच्या आदरातिथ्य्याने सौ. एकदम खुश झाली होती . मुलीकडची बाजू हि पैसेवाले दिसत होती . सरबत आणि स्नॅक्सचा आस्वाद घेत आम्ही कौतुकाने सर्व निरीक्षण करीत होतो .
    लग्न लागले आणि थोड्या वेळाने त्याचा मित्र येऊन म्हणाला "काका रिसेप्शनला वेळ आहे तो पर्यंत जेवून घ्या .
    वेगवेगळे स्नॅक्स आणि सतत सरबत पिऊन माझे पोट गच्च झाले होते.
    पण फार वेळ बसणे बरे दिसत नाही शिवाय उशीरहि झाला असता म्हणून उठलो आणि खाली आलो .......

    "अबब!!!, सौ कौतुकाने उद्गारली.....

    कारण तो थाटमाट पाहून थक्क झाली. जवळ जवळ वेगवेगळ्या पदार्थांचे 20 काउंटर मांडून ठेवले होते . स्वच्छ ,चकचकीत ड्रेस घातलेले वेटर इथे तिथे फिरत होते. युनिफॉर्म घातलेल्या सुंदर मुली पाहुण्यांची विचारपूस करीत फिरत होत्या .
    पंचपक्वाने म्हणजे काय ते आज कळले मला.... हातात डिश घेऊन मी सगळ्या काउंटर वरून फिरू लागलो.....

    तुम्हाला सांगतो राव एकही पदार्थ कधी घरी बनवून खाल्ला नव्हता असे सर्व पदार्थ होते .
    सौ. ने हात खेचत म्हटले "आहो जरा दमाने घ्या, मिळते म्हणून सर्व घेऊ नका, मग फेकून द्याल "
    मी लक्ष न देता माझी डिश पूर्ण भरून घेतली आणि कोपरा गाठत शांतपणे जेवायला सुरवात केली. थोडे खाल्ल्यानंतर माझे पोट गच्च झाले.......
    अधिक काही खाववेना. नाइलाजाने मी ती अर्धी भरलेली डिश फेकून द्यायला गेलो. रिकाम्या डब्याजवळ एक माणूस उभा होता........

    माझ्याकडे प्रसन्नपणे हसून पाहत हातातील डिश घेतली आणि म्हणाला
    "सर , रागावणार नसाल तर एक सांगू ??
    अतिशय सभ्य माणूस दिसत होता म्हणून मी होय म्हटले
    " हि तुमची डिश आहे ना ??
    " होय, मी परत उत्तरलो .
    " हे उरलेले जेवण मी तुम्हाला पार्सल करून देऊ का ?? म्हणजे तुम्ही घरी नेऊन संध्याकाळीहि जेवू शकाल "

    मी चकित झालो .थोडा राग हि आला. त्याच रागात बोललो
    "आहो थोडे राहिले अन्न ?
    काय हरकत आहे .
    नाही अंदाज आला.
    म्हणून काय घरी न्यायचं" ??

    "रागावू नका" तो गोड हसत म्हणाला.
    हे मोठ्यांच लग्न आहे. पैश्याची बिलकुल काळजी करू नका असे सांगितले आहे आम्हाला. हजार माणसांच्या जेवणाची ऑर्डर म्हणजे. बाराशे माणसांचे जेवण बनविले आम्ही. कितीतरी अन्न उरणार, मग बाहेर बसलेल्या पंधरावीस भिकाऱ्यांना देऊ .आमची 25 माणसे. पण तरीही अन्न उरणारच. आणि तुम्ही हे वाया घालवलेले अन्न!! त्याचे काय ?? राग मानू नका. पण आज हजार लोकांच्या जेवणासाठी गेले चार दिवस आम्ही मेहनत करतोय, उत्कृष्ट प्रतीची भाजी, मसाले खरेदी केले आज पहाटे चार वाजल्यापासून माझी माणसे तुम्हाला वेळेवर आणि उत्तमप्रतीचे चविष्ट जेवण देण्यासाठी राबतायत..
    होय, त्यासाठी आम्ही मागू तेव्हढे पैसे तुम्ही दिलेत हे मान्य आहे. पण सर्व गोष्टी अश्या पैशाने नाही मोजता येत. आज अशी अर्धवट भरलेली डिश डब्यात फेकून दिलेली पाहून जीव तुटतो आमचा .....

    म्हणून आम्ही हि शक्कल लढवली, हॉटेल मध्ये कसे तुम्ही डिशमधील अन्न पार्सल द्यायला सांगता".....

    का ???

    कारण तुम्ही पैसे मोजले असता मग इथे का नाही ?? कारण ते दुसऱ्यांने दिले म्हणून का ??
    " आणि हो, यातील काहीही यजमानांना माहित नाही.
    हे आम्हीच ठरविले आहे . त्यामुळे तुम्ही यजमानांना दोष देऊ नका. पटले तर तुमचे अन्न आणि अजून त्यात थोडी भर टाकून घरी घेऊन जा नाहीतर डिशमधील अन्न पूर्ण खा ." मला काही सुचेना काय बोलावे. थोडी लाज हि वाटली आणि पटतही होते .
    खरेच भारतात काय आज संपूर्ण जगात अन्नासाठी लोक भटकतायत आणि आपण इथे कोरड्या मनाने फेकून देतोय......

    इतक्यात सौ .म्हणाली "बरोबर बोलताय भाऊ , ह्यांना काय कळते किती मेहनत असते यामागे . हवे तसे घ्यायचे आणि उरलेले फेकून द्यायचे तेव्हा करण्याला किती वेदना होतात. द्या तुम्ही ते पार्सल आम्हाला. आता रात्रीचे जेवण होईल. मेहनत, इंधन सर्व काही वाचेल. थोड्या वेळाने आम्ही वर वधूला आशीर्वाद देऊन पार्सल घेऊन बाहेर पडलो .......

    (आता बोला आहे का तुमची असे वागण्याची मानसिकता..एक तर जेवढी भूक असते त्यापेक्षा कमीच पानात घ्यावे, अजून लागले तर ना नाहीच....पण भुभूक्षीतासारखे भसाभसा पान भरून घेवून दुसऱ्याच्या तोंडचे अन्न वाया घालवण्यासारखा माजोरडेपणा नाही...)

    मग एक तर ती भिकारी भोजन पद्धत बंद करून पाने वाढा अन्यथा अन्नावाचून, अन्न पिकवणारा आत्महत्या करतोय.......खाऊन माजावे, टाकून नाही......


    -- संकलन : अमित कुलकर्णी
    मला आवडलेले फेसबुक आणि WhatsApp वरचे पोस्ट मी शेअर करत असतो.. बर्‍याचदा या पोस्टमध्ये लेखकाचे नाव नसते. जर कोणा लेखकाचे हे साहित्य असेल तर कृपया मला कळवावे म्हणजे मी नक्की त्यांचे नाव देईन. आपण ही माहिती मला त्या-त्या पोस्टच्या कॉमेंटमध्ये देऊ शकता.

      June 14, 2017


  • कुठे गेले ते सौंदर्य?

    कोण होतास तू, काय झालास तू?’ हे चित्रपटगीत एकेकाळी खूप गाजले होते. आजही त्या गीताचे बोल कानाला सुखावून जातात आणि मनाला विचार करायला भाग पाडतात.

      September 9, 2007


  • आत्महत्या करण्याआधी

    राजनने मनाचा निश्चय केला की आता आत्महत्या करून मोकळे व्हायचे. जगताना अपार दुःख भोगावं लागतंय. इतक्या अडचणी, इतके प्रॉब्लेम्स आहेत. त्यावर एक सोपा उपाय आहे. आत्महत्या करून मोकळे व्हायचे. सगळ्यातून सुटायचे. धावत्या गाडीखाली शरीर झोकून द्यायचे की सगळे दुःख, यातना, प्रोबेल्म्स एका क्षणात संपून जातील.

      March 24, 2026


  • मोफत द्या, परंतु अटिंवर!

    25 रविवार, नोव्हेंबर 2007

    देशाची फाळणी धार्मिक आधारावर झाली. मुस्लिम बहुसंख्याक प्रदेश पाकिस्तानच्या रूपाने वेगळा झाला. त्या परिस्थितीत उर्वरित देश ‘हिंदुस्थान’ म्हणून ओळखला जाणे अपेक्षित होते, परंतु तसे झाले नाही.

      November 25, 2007


  • भगवान बुद्ध, राजू गाईड आणि ईरोम शर्मिला

    भारतीय प्रजातान्त्रिक व्यवस्थेवर विश्वास ठेऊन तिने निवडणूक लढविण्याचा निश्चय केला आहे. तिचा हा निर्णय निश्चितच योग्य आहे.

      August 14, 2016


  • नवे शुद्र!

    आता आर्थिक आधारावर नवे शूद्र आम्ही निर्माण करीत आहोत. जेव्हा हा आधार जातीगत होता तेव्हाही समाजातील एेंशी टक्के लोकांना शिक्षणाचा अधिकार नव्हता आणि आताही समाजातील एेंशी टक्के लोकांना उच्चशिक्षण नाकारले जात आहे. प्राथमिक शिक्षण मात्र सगळ्यांनाच उपलब्ध आहे, कारण प्राथमिक शिक्षणाची सोय सरकारतर्फे केली जाते.

      June 14, 2009


  • अ‍ॅडव्हर्सिटी कोशंट (प्रतिकूलता गुणांक)

    काही दिवसांपूर्वी माझ्या एका मानसोपचार तज्ञ असणाऱ्या मित्राने एक नवीन संज्ञेशी परिचय करून दिला ती म्हणजे AQ अर्थात Adversity Quotient जो प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करण्याच्या क्षमतेची कल्पना देतो. आपण त्याला प्रतिकूलता गुणांक म्हणू.

      June 23, 2020


  • कोरडेपणा नव्हे तर व्यवहार्यता!

    प्रकाशन दिनांक :- 19/12/2004

    अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा आहेत. या गरजा मुलभूत आहेत, याचाच अर्थ त्यांचे महत्त्व केवळ सामान्य पातळीवर, इतर साधारण प्राणी जगतात त्या पातळीवर जगण्यापुरते मर्यादित आहे. परंतु इतर प्राण्यांशी मानवाची तुलना करता येणार नाही. सर्वच बाबतीत मानव इतर प्राण्यांच्या तुलनेत सरस आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याची बौद्धिक, मानसिक क्षमता जशी उच्च कोटीची आहे, तशीच त्याची जगण्याची शैलीही वेगळी आहे. जगण्यासाठी त्याच्या पोटाला ज्याप्रमाणे चार घास आवश्यक आहेत त्याचप्रमाणे त्याच्या संवेदनशील मनाला जगण्याची उभारी येण्यासाठी, ती टिकण्यासाठी मायेची ऊब, निकटवर्तियांची सहानुभूती, प्रेम तितकेच आवश्यक ठरते. खरे तर मायेची ही ऊब, प्रेमाचा ओलावा हाच त्याच्या जगण्याचा आधार आहे. ज्यांना हा आधार मिळत नाही ती माणसं भौतिक सुखाची रेलचेल असूनही मनातून कायमची दु:खी असतात. प्रसंगी प्रचंड कर्तृत्त्ववान माणसांचे आयुष्यदेखील असा आधार न मिळाल्याने कोसळल्याचे दिसून येते. विशेषत: उतारवयात अशा मानसिक आधाराची नितांत गरज असते. हा आधार आई-वडील आपल्या मुलांमध्ये शोधतात. म्हातारपण म्हणजे दुसरे बालपणच असते. आपल्या मुलांची त्यांच्या बालपणी आपण जशी काळजी घेतली, त्यांना जसे प्रेम दिले, तशीच त्यांच्या कडून म्हाताऱ्या आई-वडिलांची अपेक्षा असते. परंतु मोजके भाग्यवान आई-वडील सोडले तर बहुतेकांच्या वाट्याला या संदर्भात निराशाच येते. मुलं आपल्याला विचारीत नाही, हाच बहुतेकांचा अनुभव असतो. ज्यांची मुले विदेशात आहेत, त्यांच्याकडे तर आपले देशी आई-वडील टिकूच शकत नाही. विदेशात मोठ्या पदावर नोकरीला असलेल्या अथवा मोठा उद्योग सांभाळणाऱ्या मुलांकडे आता उर्वरित आयुष्य निवांतपणे घालवावे या विचाराने गेलेले आई-वडील चार-सहा महिन्यातच हिरमुसले होऊन भारतात परततात. त्यांच्या निवांत जगण्याच्या कल्पनेतील मुलभूत गरज असते, ती प्रेमाच्या, सहानुभूतीच्या, आपुलकीच्या ओलाव्याची. नेमकी हीच गरज तिथे पुरविली जात नाही. केवळ विदेशात मुले असणाऱ्या आई-वडिलांनाच हा अनुभव येतो असे नाही. अलिकडील काळात भारतातील मोठ्या शहरात, 'मेट्रो सिटी'तदेखील या 'कोरडेपणाची' मोठ्या प्रमाणात लागण झाल्याचे दिसते.
    माणसं एकमेकांच्या अगदी जवळ राहात असूनही खूप दूर गेलेली दिसत आहेत. आपुलकीचा झरा आटल्यासारखा झाला आहे. प्रेमाच्या ओलाव्याला शहरी माणसांच्या जगात जागाच उरली नाही. माणसांची मने सिमेंट-काँक्रिटसारखीच दगडी झाली आहेत. इथे स्थान उरले आहे ते केवळ कोरड्या, रुक्ष व्यवहाराला. शहरे अशी माणुसकीला, परस्परांच्या आपुलकीला हळूहळू पारखी होत असली तरी ठाामीण भागात मात्र परस्पर सहकार्य, एकमेकांना समजून घेण्याची, सांभाळण्याची भावना अद्यापही बऱ्याच प्रमाणात टिकून आहे. केवळ माणसात आढळणारा माणुसकीचा गुण शहरातून हद्दपार झाला असला तरी खेड्यापाड्याच्या सांदी कोपऱ्यात अद्यापही माणूसकी टिकून आहे. झोपड्यांच्या भिंती सिमेंट काँक्रिटसारख्या दगडी झालेल्या नाहीत. माणुसकीचा ओलावा या भिंतीतून अद्यापही पाझरत आहे. जुन्या काळी गावात एखाद्याच्या घरी पाहुणा आला तर तो केवळ त्या घरापुरता पाहुणा नसायचा, तर तो संपूर्ण गावाचाच पाहुणा असायचा. गावातील एखाद्याचा जावई संपूर्ण गावाचा जावई ठरायचा. आज परिस्थिती अगदी तशी नसली तरी पाहुण्यांचे आदरातिथ्य आजही गावात व्यवस्थित केल्या जाते. माणसा-माणसातील सहबंध शहराच्या तुलनेत आजही गावाकडे टिकून आहेत. गावाकडची माणसं आजही अघळपघळ आहेत. त्यांच्याकडे निवांतपणे गप्पा मारायला वेळ आहे. एकमेकांना सांभाळून घेण्याची त्यांची वृत्ती आहे आणि ती त्यांची गरजसुद्धा आहे. ठाामीण भागातली जीवनशैलीच अशी आहे की खड्यातले प्रत्येक घर एकमेकांशी या ना त्या कारणाने जुळलेले असते. त्यामुळे ही माणसं जेव्हा शहरात येतात तेव्हा शहरी वातावरणाशी, तिथल्या जीवनशैलीशी त्यांना जुळवून घेता येत नाही. ज्याप्रमाणे नव्या आधुनिक पिढीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या आपल्या मुलांशी जुळवून घेणे आई-वडिलांना सहज शक्य होत नाही, त्याचप्रमाणे खेड्यातील लोकांनाही शहरी माणसं अतिशय कृत्रिम आणि कोरडे वाटतात. ही वस्तूस्थिती असली तरी नाण्याची दुसरी बाजूही समजून घेणे आवश्यक आहे.
    आज जग झपाट्याने बदलत आहे. जीवन अतिशय वेगवान झाले आहे. स्पर्धेचे युग आहे आणि ही स्पर्धा केवळ व्यवसाय, उद्योगधंदा किंवा प्रगतीशी संबंधित राहिलेली नाही. प्रत्यक्ष जगण्याची स्पर्धाही तितकीच तीप झाली आहे. शहरी माणसाजवळ निवांतपणा उरलेला नाही. थांबण्यासाठी त्याच्याजवळ वेळ नाही. 'जो थांबला तो संपला' अशी परिस्थिती आहे. या जीवघेण्या स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर ऊर फाटेस्तोवर कष्ट करण्याला निदान शहरात तरी पर्याय नाही. याचा अपरिहार्य परिणाम त्याच्या वागणुकीवर आणि जीवनशैलीवर दिसून येतो.
    शहरातली माणसे आज एकलकोंडी, अतिशय आत्मकेंद्रीत झाली असली तरी ती त्यांची अपरिहार्यताच आहे. शहरी संस्कृतीच्या नावाने बोटे मोडणाऱ्या खेड्यातील लोकांना किंवा आपल्या मुलांनी आपल्यासाठी निवांत वेळ द्यावा अशी अपेक्षा बाळगणाऱ्या आई-वडिलांना ही परिस्थिती समजून घ्यावी लागेल. बरेचदा खेड्यावरची एखादी व्यक्ती शहरातील नातेवाईकाकडे येते आणि त्याची अपेक्षा असते ती शहरातल्या या यजमानाने आपले साठासंगीत आदरातिथ्य करावे, आपल्यासाठी भरपूर वेळ द्यावा, हातातली सर्व कामे बाजूला ठेवून आपल्या कामासाठी त्याने धावपळ करावी. ही अपेक्षा अवास्तवच म्हणायला पाहिजे. खेड्यातला निवांतपणा शहरात शक्य नाही, ही वस्तुस्थिती समजून घ्यायला पाहिजे. आज ग्रामीण आणि शहरी असे संस्कृतीचे विभाजन झाले असले तरी हे विभाजन परिस्थितीशी समायोजन साधण्याच्या प्रयत्नातून झालेले आहे. शहरी जीवनाच्या धावपळीचा अपरिहार्य परिणाम हा व्यावहारिक रुक्षपणातून समोर येतो. हा बदल आम्हाला स्वीकारावाच लागेल. प्रत्येक गोष्ट स्वत:ला अनुकूल असण्याचा हट्ट प्राप्त परिस्थितीत तरी योग्य म्हणता येणार नाही. जिथे जिवंत राहणेच हे एक आव्हान ठरले आहे तिथे मानवी भावभावनांच्या अस्तित्वाला अशी कितीशी किंमत मिळणार? नाण्यांच्या या दोन्ही बाजुतून हेच स्पष्ट होते की, परिस्थितीशी झगडत स्वत:चे अस्तित्व टिकविताना अनेक चांगल्या गोष्टींचा बळी जातच असतो. जीवनचक्रात या न टाळता येणाऱ्या बाबी आहेत. त्या समजून घेऊनच त्यातून मार्ग काढता येईल.

    -- प्रकाश पोहरे

      December 19, 2004