हेल्मेट वापरण्याचा मुख्य उद्देश म्हणजे यात सामान्य नागरिकांच्या जीवनाचे धोक्याचे प्रमाण कमी होते. पण त्यासाठी सरकारानेच ‘प्रबोधन’ करायला पाहिजे असे म्हणणे हि मोठी शोकांतिका आहे. पुणेसारख्या शहरांमध्ये धर्माच्या नावाखाली हेल्मेट सक्तीला विरोध दर्शविण्यात आले. त्यांना एवढंच म्हणावे लागेल, “सर सलामत तो पगडी पचास”.
March 27, 2019
काही वृत्तपत्रात ज्या बातम्या झळकल्या आहेत त्या धक्कादायक आहेत. तसेही आजकाल वृत्तवाहिन्यांची अमाप पीक आल्यापासून धक्कादायक बातम्यांमध्ये जाण राहीली नाही.
September 5, 2010
(कथा आणि पात्र काल्पनिक आहे)
काल दुपारी कार्यालयात एक विशिष्ट फाईल वाचत होतो. फाईल वाचत असताना आपली दाढ दुखते आहे ही जाणीव होऊ लागली. काही वेळातच दाढेचे दुखणे वाढू लागले आणि त्या बरोबर वेदनाही. डोक्यात गरगर सुरु झाली. अखेर वैतागून मी फाईल वाचणे थांबविले. ती फाईल लाल फितीत व्यवस्थित बांधून अलमारीत ठेऊन दिली. संध्याकाळी घरी आलो, दाढेच्या दुखण्यामुळे रात्री व्यवस्थित जेवता ही आले नाही. गरम पाण्यात मीठ टाकून गुळणे केले, लवंग ही तोंडात ठेवली. पण काही फायदा झाला नाही. सारी रात्र दाढेच्या दुखण्यामुळे तळमळत काढली.
आज सकाळी ओळखीच्या दातांच्या डॉक्टरांकडे गेलो. पेशंटसाठी असलेल्या खुर्ची वर बसलो. डॉक्टरांनी दात तपासले आणि लगेच निर्णय ही सुनावला. दाढेला किडा लागला आहे, दाढ काढावी लागेल.
मी विचारले, डॉक्टर, दाढ न काढता, किड्याचा इलाज करता येईल का?
डॉक्टर मिस्कील हसले आणि म्हणाले, तुमच्या दाढेला साधा-सुद्धा नाही, जीवघेऊ अकलेचा किडा लागला आहे. त्वरित नाही काढला तर हा किडा मेंदूत शिरेल. तिथे जाऊन अकलेचे तारे तोडेल. त्याच्या परिणाम तुम्हाला भोगावा लागेल. तुमच्या पांढर्या शुभ्र वस्त्रांवर चिखलाचे डाग दिसू लागतील, काही दिवसांतच तुमचा चेहरा ही काळाठिक्कर पडेल. अवेळी सरकारी सेवेतून निवृत्त व्हावे लागेल. पेन्शन ही मिळणार नाही. पोंर ही तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवतील. आपल्या सौभाग्यवतीला घेऊन, भिक्षा मागत दारी-दारी फिरावे लागेल.
माझ्या डोळ्यांसमोर काजवे चमकले, खरोखरंच असेल घडले तर? ओम भिक्षां देही शब्द कानात घुमू लागले. घाबरून मी जवळपास ओरडलोच, डॉक्टर, काढून टाका ती दाढ, अकलेच्या किड्या सकट.
डॉक्टरांनी दाढेला सुन्न करण्यासाठी इंजेक्शन दिले आणि पकडीने एका झटक्यात दाढ उपटली. दाढ निघाल्यावर दुखणे ही थांबले. शरीर आणि मन शांत झाले. घरी जाऊन मस्त पैकी थंडगार पाण्याने स्नान केले. पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून, आरश्यासमोर उभा राहिलो.
आरश्यात मला माझा चेहरा काळाठिक्कर पडलेला का दिसत होता, हे मात्र मला समजले नाही.
(दात तोड डॉक्टर मित्रांकडून प्रतिसाद अपेक्षित)
June 3, 2015
छोट्या शेतकर्यांच्या समस्यांकडे सरकार जाणीवपूर्वक वागत आहे आणि त्यामुळे तर शेतकर्यांनी शेती सोडावी किंवा आत्महत्या करावी अशी परिस्थिती निर्माण करत आहे. कापसावरील निर्यातबंदीच्या आणि गरिबांना मोफत किंवा स्वस्तात धान्य या निर्णयाकडे त्या दृष्टीनेही पाहता येईल.
March 17, 2012
हा लेख तुम्ही वाचत असाल तोपर्यंत भारताच्या मा. राष्ट्रपतींचा देशातील पहिला नागरी सत्कार आटोपलेला असेल. त्यांच्या गृहनगरीला हा सत्कार घडवून आणण्याचा मान मिळत आहे.
October 14, 2007


प्रकाशन दिनांक :- 14/12/2003
आपला देश गरीब आहे, असे आपण म्हणतो, सगळेच म्हणतात. स्वत:च्या नाकर्तेपणाला गरिबीच्या गुळगुळीत आवरणाखाली झाकण्याचा आपला प्रयत्न असतो आणि त्यात आपण बऱ्याच प्रमाणात यशस्वीसुद्धा झालो आहोत. 'गरीब' या शब्दातून ध्वनित होणारा अर्थ हेच सांगतो की, एखाद्या विवशतेमुळे, बाह्य संकटामुळे आलेली ती एक अपरिहार्य अवस्था आहे.
December 14, 2003
प्रकाशन दिनांक :- 02/05/2004 ‘
निवडणुकीच्या पृष्ठभूमिवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी ‘दृष्टीपत्र’ (व्हिजन डॉक्युमेंट) प्रकाशित केले. या दृष्टीपत्राच्या माध्यमातून देशाच्या विकासाचे आकर्षक चित्र या पक्षांनी चितारले असले तरी या चित्रात रंग भरण्याची क्षमता आपल्याकडे आहे की नाही, हा चिंतनाचा प्रश्न ठरतो. राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी निवडणुकीच्या काळात बऱ्याच घोषणा करीत असतात.
May 2, 2004
मोक्षा रॉय यांना जगातील सर्वात तरुण वकील होण्याचा मान नुकताच मिळाला आहे. पुरस्कार मानवी जीवनाला चांगलं जीवन जगण्याची प्रेरणा देतात. पुस्तके वाचून अनेकांनी पुरस्कार मिळवले आहेत; पण पुस्तकांच्यापलीकडे जाऊनही त्याबद्दलही पुरस्कार मिळतात. आपलं भवताल आपल्याला घडवतं, बिघडवतं. आपल्या सभोवतालच्या गोष्टींची दखल घेतली नाही, तर आपलं अस्तित्वच धोक्यात येतं. ग्लोबल वॉर्मिंगमुळे दरडी कोसळणे, पूर येणे या घटना वारंवार घडत आहेत, तरीही सामूहिक जनजागृती होत नाही. मनातली जागृतीच असंख्य जणांना वाचवू शकते. शिक्षणाने मनात जाणीवजागृती निर्माण व्हायला हवी. शिक्षण म्हणजे केवळ पाठांतर करून माहिती लक्षात ठेवणं नाही. आपल्या शिक्षणामुळे आपलं व समाजाचं कल्याण कसं होईल? हा मनात विचार शिक्षणामुळे रुजायला हवा. मूल्यांची रुजवणूक पुस्तकातली मूल्यं पाठ करून होत नाही, तर त्यासंबंधीची जाणीव झाल्याने ती आपल्यात रुजतात.
June 2, 2026
06 रविवार,जानेवारी 2008
इंठाजी नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष सर्वदूर नुकताच धूमधडाक्यात पार पडला. सगळ्याच वयोगटातील लोकांनी आपापल्या परिने नवीन वर्षाचे स्वागत केले. तरूणांच्या उत्साहाला तर नुसते उधाण आले होते.
January 6, 2008
“अहम् ब्रम्ह असी”, “अहम् ब्रम्ह असी”, असं प्रत्येकजण म्हणताना आपण ऐकतोय. नव्या गतीने नव्या ईर्शेने जो तो धावताना आपण पाहतोय. कॉस्मोपॉलिटीन शहर असो किंवा आणखी कोणतंही क्षेत्र प्रत्येकजण मीच ब्रम्ह आहे असं म्हणवतोय.
February 4, 2011
Copyright © 2025 | Marathisrushti