एकाद्या दिवशी घडलेल्या विविध घटना, जगभरात साजरे होणारे वेववेगळे दिवस, यांची माहिती देणारा विभाग.. अजून बरंच काही येतेय इथे
तंबाखूमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून; एकटया मुंबईत हे प्रमाण 25.4 टक्के आहे. याशिवाय लहान मुलांतही धूम्रपान करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जागतिक तंबाखूविरोधी दिना’निमित्त प्रबोधनावर भर दिला जात आहे.
May 31, 2022
इंग्रज १९४७ मध्ये भारतातून बाहेर गेले. पण पोर्तुगीज त्यांच्या ताब्यातील प्रदेश सोडत नव्हते. अखेर भारतीय लष्कराने दमण, दीव आणि गोवा हा प्रदेश ‘ऑपरेशन विजय’ अंतर्गत १९ डिसेंबर १९६१ रोजी जिंकला आणि भारतात विलीन केला. केंद्र सरकारने त्यावेळी दमण, दीव आणि गोवा यांना केंद्रशासीत प्रदेशाचा दर्जा दिला. नंतर ३० मे १९८७ रोजी गोवा या केंद्रशासीत प्रदेशाला भारताच्या घटक राज्याचा दर्जा देण्यात आला पण दमण आणि दीव यांचा केंद्रशासीत प्रदेशाचा दर्जा कायम ठेवण्यात आला. यामुळे १९ डिसेंबर हा गोवा मुक्ती संग्राम दिन आणि ३० मे हा गोवा राज्य स्थापना दिन म्हणून साजरा करतात.
May 30, 2022
२४ फेब्रुवारी १९४४ रोजी केंद्रीय उत्पादन शुल्क व नमक कायदा लागू केल्यामुळे सेंट्रल एक्साइज (केंद्रीय कस्टम आणि उत्पादन शुल्क) (Central Board of Excise and Custom – CBEC) दिवस २४ फेब्रुवारीला साजरा केला जातो.
March 1, 2024
शाकाहारी आहारांमध्ये संपूर्ण धान्य, शेंगदाणे, फळे आणि भाज्या समाविष्ट आहेत, जे फायबर, अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे तसेच आवश्यक खनिजे पुरवतात.
October 1, 2021
दरवर्षी १० ऑगस्ट रोजी जगभरातील सिंह प्रेमी सिंहाच्या घटत्या लोकसंख्येस जागरूकता देण्यासाठी या दिवसाचा वापर करतात. याव्यतिरिक्त, ते सिंहांच्या वस्तीच्या संरक्षणास मदत कशी करता येईल त्या पद्धतींबद्दल शिकण्याचे सुचवितात.
August 10, 2020
एका मोठ्या एकत्र कुटुंब पद्धतीने राहत असलेल्या घरात रघु (राजेश खन्ना) नोकर म्हणून येतो आणि त्या घरातील सगळा माहौलच बदलून टाकतो. हसतखेळत काही कौटुंबिक समस्या सोडवतो. संपूर्ण चित्रपटभर राजेश खन्नाची छान बकबक आहे. अमिताभ बच्चनच्या निवेदनाने या चित्रपटाची सुरुवात होते. तपन सिन्हा दिग्दर्शित ‘Galpo Holeo Satti’ (१९६६) या बंगाली चित्रपटावर आधारित हा चित्रपट आहे.
July 7, 2021
७ जून १९७५ रोजी पहिल्या क्रिकेट विश्वचषकास क्रिकेटची पंढरी लॉर्ड्स येथे सुरुवात झाली. पहिलाच सामना भारत आणि इंग्लंड दरम्यान खेळवण्यात आला. ७ जून ते २१ जून १९७५ दरम्यान खेळल्या गेलेल्या विश्वचषकाच्या मालिकेला मुळात नाव ‘प्रुडेन्शियल कप’ असे देण्यात आले होते. या पहिल्यावहिल्या विश्वचषकात केवळ आठ संघांचा समावेश होता.
June 7, 2021
१९४० मध्ये पुण्यातील पुणे गायन समाज ही जुनी संस्था आणि भारत गायन समाज यांचे एकत्रीकरण झाले. पुणे भारत गायन समाज असे संस्थेचे नामकरण रूढ झाले.
September 1, 2021
चौदाव्या शतकात कॅमेरा आबस्कुरा किंवा कॅमेरा ल्युसिडा हा कॅमेरा लिओनार्दा दा विंची याने वापरला, हे सर्वज्ञातच आहे. पुढे अठराव्या शतकात कॅमेरा आबस्कुराचा उपयोग त्यावेळचे चित्रकार देखावे चित्रित करण्यासाठी करत असत.
August 19, 2021
डेस्कटॉप पॉवर मॅनेजमेंट या प्रभावी उपायामुळे संगणक सुरू असेल, परंतु त्याचा प्रत्यक्ष वापर चालू नसेल अशा काळात त्यामधील समाविष्ट सॉफ्टवेअरद्वारे ऊर्जाबचतीचे उपाय केले जातात. उदा. वापर थांबल्यावर काही सेकंदांनी पडदा (स्क्रीन वा मॉनिटर) बंद झाल्याने विजेची भरपूर बचत होते.
December 14, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti