(User Level: User is not logged in.)

दिनविशेष

एकाद्या दिवशी घडलेल्या विविध घटना, जगभरात साजरे होणारे वेववेगळे दिवस, यांची माहिती देणारा विभाग.. अजून बरंच काही येतेय इ‌थे

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • जागतिक शाकाहारी दिवस

    शाकाहारी आहारांमध्ये संपूर्ण धान्य, शेंगदाणे, फळे आणि भाज्या समाविष्ट आहेत, जे फायबर, अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे तसेच आवश्यक खनिजे पुरवतात.

      October 1, 2021


  • दुबईमधील बुर्ज खलिफा

    बुर्ज खलिफाच्या बांधकामासाठी ९७ अब्ज रुपये खर्च आला. याचे प्रायमरी स्ट्रक्चर मजबूत सिमेंटपासून तयार केले आहे. बुर्ज खलिफा साठी ३३०००० क्युबिक मीटर सिमेंट आणि ५५००० टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे.

      January 4, 2022


  • छोटी सी बात चित्रपट

    अमोल पालेकर, विद्या सिन्हा यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट अमोल पालेकर यांच्या चित्रपट कारकिर्दीला कलाटणी देणारा ठरला. चित्रपटाचा नायक हा लहानपणापासून आपल्या आई-वडिलांच्या छायेत वाढलेला असतो.

      March 4, 2025


  • हनुमान जयंती

    हनुमान आणि रुद्र : हनुमानाला रुद्राचा अवतार मानतात. पुराणकाळात हे नाते विकसित झाले. स्कंद पुराण (अवंतीखंड ८४), ब्रह्मवैवर्त पुराण (कृष्णजन्मखंड ६२), नारदपुराण (पूर्वखंड ७९), शिवपुराण (शातारुद्रसंहिता २०), भविष्यपुराण (प्रतिसर्ग पर्व १३०), महाभागावात्पुरण (३७) इ.ठिकाणी रुद्र व हनुमान हे नाते स्पष्ट केले आहे. हनुमानाची एकादश रुद्रांत गणना होते. भीम हे एकादश रुद्रांतील एक नाव आहे. म्हणूनच समर्थानी त्याला भीमरूपी महारुद्र म्हटले आहे. हनुमानच्या पंचमुखी मूíत रुद्रशिवाच्या पंचमुखी प्रभावातून आली आहे.

      April 16, 2022


  • आणि नायगारा ठणठणीत कोरडा पडला…

    आणि नायगारा ठणठणीत कोरडा पडला…

    निसर्गराजाने एकदाच… फक्त एकदाच…. असा चमत्कार केला होता, जो पाहून -ऐकून लाखो लोक आश्चर्यचकित झाले होते ! अमेरिकेच्या उत्तरेस असलेल्या आणि अमेरिका-कॅनडा देशांच्या सरहद्दीवर हजारो वर्षे अष्टौप्रहर कोसळत असलेल्या अतिप्रचंड जलप्रपाताचे, नायगारा धबधब्याचे कोसळणे २९ मार्च १८४८ रोजी अचानक थांबले आणि तब्बल तीस तास त्यातून पाणी आलेच नाही. नायगारा ठणठणीत कोरडा पडला होता !

      March 29, 2022


  • राजा केळकर संग्रहालय जनतेसाठी खुले करण्यात आले

    केळकर संग्रहालय पाहण्यासाठी तास-दोन तासांची सवड काढूनच जावे लागते. तेथे दिवे, अडकित्ते, वस्त्रप्रावरणे, दौती-कलमदाने, दरवाजे, स्त्रियांची सौंदर्यप्रसाधने, वाद्ये, शस्त्रास्त्रे, धातूंची भांडी, बैठे खेळ, पेटिंग्ज, कातडी बाहुल्या, लाकडी कोरीवकाम अशा पारंपरिक वस्तूंचा मोठा संग्रह आहे. त्या वस्तूंचे वर्गीकरण करून, तेथील पंधरा दालनांमध्ये त्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहेत.

      March 19, 2022


  • जागतिक वारसा सप्ताह

    कोरीव मंदिरे, लेणी, तेथील दगडात कोरलेली शिल्पे आणि त्यांचे सौदर्य यांचा अभ्यास भारतीय विद्या या शाखेत केला जातो. निसर्ग आणि मानव हे एकमेकांच्या साह्चार्याने राहतात त्यामुळे वन्य जीव, पशु आणि पक्षी, निसर्गातील वैविध्य यांची काळजी घेणे यासातही अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्याने यांचे महत्व अविवाद्य आहे.

      November 19, 2021


  • जागतिक शाईपेन दिवस

    १८५० पासून असे पेन बाजारात आले. अशा शाईच्या पेनमध्ये धातूची निब असते. या निबमध्ये मधोमध एक भेग असते व त्याच्या मुळाशी एक भोक असते. शाई साठवण्यासाठी निबच्या विरुद्ध बाजूस नळीत द्रवरूप शाई भरलेली असते. कागदावर निब ठेवली असता शाई गुरुत्वाकर्षणाने निबकडे येते.

      November 5, 2021


  • सुवर्णतुला नाटकाचा पहिला प्रयोग

    या नाटकाचे कथानक श्रीकृष्ण चरित्रातील एका लोकप्रिय प्रसंगावर आधारलेले आहे. नारद हा या कथानकातील सूत्रधार असल्याने संगीतानुकूल वातावरण आपोआपच निर्माण होते.

      October 10, 2021


  • महाराष्ट्र टाइम्स’ वृत्तपत्राचा ६० वा वर्धापन दिन

    यशवंतराव चव्हाण म्हणाले होते की,”टाइम्सने मराठी वृत्तपत्र काढावे अशी सूचना मी केली होती, हे खरे आहे. कारण मराठी वृत्तपत्राद्वारे टाइम्सला मराठी मन समजून घ्यावे लागेल.मराठी वृत्तपत्राच्या सततच्या सान्निध्यामुळे महाराष्ट्रातील नव्या पुरोगामी विचारांची त्यांना ओळख होईल आणि टाइम्स व इतर पत्रांच्या द्वारे हा विचार महाराष्ट्राबाहेर असलेल्यांना कळेल, असा यात दोघांचा फायदा होणार आहे.” ही माहिती ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या अंकात प्रसिद्ध करण्यात आली.

      June 18, 2022