शास्त्रीबुवा
Category:
कथा साहित्य - ललितएका गृहस्थांना त्यांनी नोकरी करू नकोस, कांही धंदा कर त्यात तुला नक्की यश मिळेल असं सांगितलं होतं व त्याने त्याप्रमाणे आलेल्या चांगल्या नोकऱ्या लाथाडून धंदा केला होता व कांही वर्षांतच तो लखपती झाला होता. तेव्हां श्रीमंताला लखपती म्हणत, आतांसारखं करोडपती नाही. त्यांनी पत्रिका जुळवल्यामुळे कोणा कोणाचे विवाह यशस्वी झाले होते. कुणाला त्यांनी भविष्य वर्तवल्याप्रमाणे कन्या झाली होती तर कोणी परदेशीही गेले होते. त्यामुळे शास्त्रीबुवांकडची गर्दी हटत नव्हती. एखाद दुसऱ्याचं भविष्य बरोबर नव्हतं आलं पण अशी माणसे स्वत:ला दोष देत गप्प बसत असत.