कथा

भयभीत झालेले ऑफिस

Category:

 

1978 पासून रेल्वे मध्ये काम करीत असताना अनेक गमतीजमती झाल्या होत्या. खरंतर जवळून पाहिलेली रेल्वे या विषयावर काही कथा लिहिल्या आहेत. काही जण म्हणतातवाचलयशिवायलिहीतायेतनाही. हे अगदी खरे आहे परंतु रेल्वे मध्ये काम करीत असताना समोर घडलेली गोष्ट.

तुमको न भूल पाएँगे – रफ़ी साहेब
लेखसंग्रह

तुमको न भूल पाएँगे – रफ़ी साहेब

Category:

 

आजपासून ४३ वर्षांपूर्वी….. ३१ जुलै २०२३ या दिवशी एक अशुभ वार्ता रात्री देणारी सकाळ उगवली होती….. लहान मुलासारखं निर्व्याज हसू असणारा एक उत्कृष्ट चेहेरा तितक्याच उत्कृष्ट आवाजासह शांत झाला ! मुझको मेरे बाद ज़माना ढूँढेगा म्हणणारा रफ़ी शांत झाला !

लेखसंग्रह

इशारोंको अगर समझो , राज़को राज़ रहने दो

Category:

 

दिल्लीतील बल्लीमारान भाग म्हणजे एक गजबजलेलं उपनगर.तिथे लाला केवलकिशन सिकंद हे एक सिव्हिल इंजिनिअर आपल्या पत्नी रामेश्वरीसह रहात असत.ते मूळचे पंजाबातील होशियारपूरजवळच्या भारोवाल गावचे.सैलाखुर्द स्टेशनवर उतरून ७ किलोमीटर दूरवर हे गाव

लेखसंग्रह

पर्यावरणस्नेही लाकूड!

Category:

 

आजच्या औद्योगिक युगातली एक महत्त्वाची गरज म्हणजे कागद. लिखाणासाठी किंवा छपाईसाठी वापरला जाणारा कागद, वेष्टणासाठी वापरला जाणारा कागद, नॅपकिन म्हणून वापरला जाणारा कागद… अशा वेगवेगळ्या स्वरूपात कागदाचा वापर केला जातो. मात्र या कागदनिर्मितीच्या प्रक्रियेदरम्यान, लाकडाच्या लगद्यातील काही पदार्थ वेगळे करून काढून टाकावे लागतात.

लेखसंग्रह

सापाचे कान!

Category:

 

साप या प्राण्याची गणना सरीसृपांच्या गटात होते. तरीही साप हे इतर सरीसृपांपेक्षा वेगळी वैशिष्ट्यं बाळगून आहेत. उदाहरणार्थ, त्यांचा लांबलचक आकार, पायांसारख्या अवयवांचा अभाव, स्वररज्जूंचा अभाव, इत्यादी. सापांना स्वररज्जू नसल्यानं त्यांना स्पष्ट स्वरूपाचे आवाज काढता येत नाहीत. मात्र तोंडानं हवा सोडून केलेल्या ‘हिस्स’ अशा आवाजाद्वारे ते इतर प्राण्यांना घाबरवू शकतात. आवाजाशी संबंधित त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना कान नाहीत. त्यांना कान नसले तरी, ऐकू मात्र येतं. याचं कारण म्हणजे त्यांना, बाहेरून दिसू शकणारा कानाचा भाग नसला तरी, त्यांच्या त्वचेच्या आतल्या भागात श्रवणसंस्थेसारखी रचना आहे.

लेखसंग्रह

चकाकणारा बाह्यग्रह

Category:

 

आपल्या सूर्याला जशी ग्रहमाला आहे, तशाच ग्रहमाला इतर अनेक ताऱ्यांनाही आहेत. आतापर्यंत अशा हजारो ग्रहमाला आणि त्यातील ग्रह शोधले गेले आहेत. इतर ताऱ्यांभोवतालचे हे ग्रह ‘बाह्यग्रह’ या नावानं ओळखले जातात. हजारोंच्या संख्येत आढळलेल्या या बाह्यग्रहांपैकी अनेक बाह्यग्रह स्वतःची वेगवेगळी वैशिष्ट्यं बाळगून आहेत.

लेखसंग्रह

नॅटुफिअन बासऱ्या

Category:

 

वाद्यांना विविध मानवी संस्कृतींत महत्त्वाचं स्थान आहे. वाद्यांचा उपयोग हा वेगवेगळ्या कारणांसाठी केला जातो – करमणूक म्हणून, संदेश पाठवण्यासाठी, वातावरण निर्मितीसाठी, वगैरे. वाद्यांचा असा उपयोग आजच नव्हे, तर प्राचीन काळीही केला जात असे. त्यामुळे प्राचीन काळी कोणत्या संस्कृतींत कोणती वाद्यं वापरात होती, हा अभ्यासकांच्या दृष्टीनं एक उत्सुकतेचा विषय आहे.

जिंदगी का सफर
मनोरंजन

जिंदगी का सफर

Category:

 

जीवन…..म्हणजे नक्की काय? कुणी जाणलंय?कुणाला कळलंय?सगळंच अतर्क्य! चौऱ्याऐशी दशलक्ष योनीतून एकदाच हा जन्म मिळतो.त्यापासून शोध घ्यावा की बोध? सारंच अनभिज्ञ!अकल्पित! जीवनाचा हा प्रवास की प्रवाह?……हे फक्त “आपले आयुष्य आपण वाहून नेण्यात की वाहवून जाण्यात” पणाला लावतोय,यावर ठरत असतं.गंध उगाळल्याशिवाय पाजळत नाही,हेच खरं!वाट्याला आलेलं आयुष्य कल्याणकारी होण्यासाठी त्यावर मेहनतीचा अखंड अभिषेक केल्याशिवाय पर्याय नाही.त्यातून फलनिष्पत्ती होईल की नाही,हे कर्मावर सोपवावं. निस्वार्थ परोपकारी वाटचालीतून परमार् प्रगट होतो. त्यासाठी लाभार्थी कोण? हे ठरवणंही आपल्या हातात नसतं.

लेखसंग्रह

पृथ्वी झुकते आहे

Category:

 

पृथ्वी झुकते आहे… खरं तर, पृथ्वी साडेतेवीस अंशांनी अगोदरच  झुकली असल्याचं सर्वज्ञात आहे. पण ती आणखी झुकते आहे… पृथ्वी ज्या अक्षाभोवती फिरते आहे, तो अक्ष आणखी कलतो आहे. परिणामी, पृथ्वीचे ध्रुव बिंदूही सरकत आहेत. अक्षाच्या दिशेतला हा बदल पृथ्वीवर होत असलेल्या बदलांमुळे होत आहे. नैसर्गिक कारणांमुळे असे बदल घडून येत असले, तरी या कारणांना अनेकवेळा अप्रत्यक्षपणे मानवी हातभारही लागलेला असतो.