अशोक आणि अमिन

रेहमानपाडा हा मुंबईतला मिश्र लोकवस्तीचा भाग.रेल्वेलाईनच्या कडेकडेने अजगरासारखा पसरलेला.

नोकरी मिळेल,रोजगार मिळेल,पोटाची टिचभर खळगी भरेल ह्या आशेने भारतातल्या अनेक भागातून कामसू, जिद्दी माणसं मुंबईत येतात. आणि मग, अगदी अडचणीच्या ठिकाणी पण झोपडी बांधून राहतात.दिवस-रात्र कष्ट उपसतात. थकल्यावर अंग टाकायला घराचा सहारा घेतात. रेहमानपाडा पण असाच वाढत गेलेला.

इथे अनेक वाकडे तिकडे गल्लीबोळ.त्यात दाटीवाटीने झोपड्या,बैठी घरं, दवाखाने, दुकानं,पानाच्या-चहाच्या टपऱ्या,वेगवेगळी देवळं,गोदामं आणि छोटे-छोटे कारखाने.त्यातूनच वाहणारी उघडी गटारं. घरात, दुकानात जायचं म्हणजे,गटार ओलांडूनच जावं लागतं. रेहमानपाड्यात एका कोपऱ्यात एका बाजूला एक मोठी कचरा कुंडी आहे.त्याच्या बाजूलाच एका रांगेत,सतरा सार्वजनिक संडास.विशेषत: बायका, मुलं, आजारी आणि वृध्द माणसं ह्याचा वापर करतात. पुरुषमंडळी दिवस उजाडण्या आधीच रेल्वे लाईनचा आसरा घेतात.

रेहमानपाड्यात हिंदू, मुसलमान, बौध्द, शीख, मल्याळी, कानडी, बंगाली असली अनेक जाती, जमाती, धर्माची विविध माणसं एकत्र राहातात. अधे-मधे छोटी मोठी भांडणं होतात, पाण्यावरून तंटे होतात,पण ते तेव्हढ्यापूरतंच. दुसऱ्या दिवशी पुन्हा सारे एक!. रेहमानपाडा म्हणजे कष्टकरी लोकांचं एक विशाल कुटूंबच आहे! त्यांच्यात एकोपा आहे. त्यांचा एकमेकांवर विश्वास आहे आणि म्हणूनच ते गुण्या गोविंदाने एकत्र नांदतात. आपला धर्म आणि आपला देव आपापल्या घरातच ठेवतात.

ही गोष्ट आहे 1993 सालातली.

मुंबईत पेटलेल्या दंगली नुकत्याच थंडावल्या होत्या.
रेहमान पाड्यातील सर्वधर्मीयांनी मिळून,एक शांतता समिती बनविली होती. त्यामुळे रेहमानपाड्यात अजून तरी काही अनुचित प्रकार घडला नव्हता. पण तरीही सगळेच घाबरलेले. मनातून धास्तावलेले.

रेल्वे लाईनच्या पलीकडे जी वस्ती होती,त्याठिकाणी विशिष्ट जमातीची माणसे अधिक प्रमाणात राहात होती. आणि तिथे ही शांतता होती.काही गडबड नव्हती.
इकडच्या वस्तीत रोज निरनिराळ्या अफवा ऐकू येत. कधी,'काही माणसं आपल्या वस्तीवर हल्ला करणार.' तर कधी,'समोरच्या म्हणजे रेल्वे लाईन पलीकडच्या वस्तीतली माणसं,आपल्या घरांवर पेट्रोल बॉम्ब फेकून आपली घरे जाळून टाकणार. आपली वस्ती बेचिराख करणार!' काही अफवा ह्याहूनही भयंकर!!
त्यामुळे,कधीही काहीही होईल ही प्रत्येकालाच धास्ती!

मुलांचा आरडाओरडा, दंगामस्ती, खेळणं, बायकांची भांडणं, चहा टपरीवर सदासर्वकाळ चालणारा कल्ला, गोदामातील-कारखान्यातील धावपळ हे सगळं आपोआप बंद झालेलं.

जो तो भेदरलेला. जबरदस्त घाबरलेला. संध्याकाळी सहा वाजले की दुकानं, कारखाने,चहाच्या टपऱ्या बंद होत. सर्वजण आपापल्या घरात दारं खिडक्या बंद करून चिडीचूप! संध्याकाळी सहा वाजताच सगळीकडे शांतता! रस्त्यावर शुकशुकाट. जणू काही,संचारबंदीच जारी केली आहे. घराघरात प्रचंड तणाव आणि रस्त्यावर भितीदायक सन्नाटा!!

ह्याच दिवसातली ही गोष्ट आहे.

रात्रीची वेळ होती.
आकाश ढगाळ झालं होतं. गार झोंबरा वारा भणाणत होता.
रेल्वे लाईन जवळच्या पिंपळाची सळसळ ऐकू येत होती. रस्त्यावर सामसूम होती. म्युनसिपालटीच्या दिव्यातून फिकट पिवळा प्रकाश झिरपत होता.सगळीकडे भयाण शांतता; आणि ही शांतता कापत जाणारा, धडाडत जाणाऱ्या रेल्वेचा आवाज. त्याचवेळी एका घरातले दिवे बंद झाले.

दार उघडलं.
एक मुलगा घरातून बाहेर आला.
दाराला कुलूप लावलं. किल्ली खिशात टाकली. अंधारातून लपतछपत, घरांचा आडोसा घेत, तो मुलगा, कचरा कुंडीच्या दिशेने निघाला.

चालताना पायाचा आवाज होऊ नये म्हणून तो झपाझप चवड्यावर चालत होता. उड्या मारत, उघडी गटारं ओलांडत होता. चार-पाच वळणं घेत, तो एका घराजवळ आला.
त्याने दारावर हलकेच तीन टिचक्या मारल्या. हळू आवाजात त्याने हाक मारली, “अम्मीऽऽऽऽ,अम्मीऽऽ”

अमिन आणि अमिनची आई अम्मी,अशोकची वाटच पाहात होते.
दार उघडत अम्मी म्हणाली, “आ,अशोक अंदर आ. अशोक बेटे खाना खाया?”
अशोकने फक्त होकारार्थी मान हलवली.
अमिनच्या खिडकीतून ती कचरा कुंडी आणि ते संडास दिसायचे. दिवे बंद करुन, अशोक आणि अमिन खिडकीला डोळे लावून बसले.
अम्मी अंधारात जपमाळ घेऊन बसली. अशोक आणि अमिन आता घरातच असल्याने ती आता निश्चिंत होती.

अमिन आणि अशोक लहानपणापासून एकाच वर्गात होते.
वर्गातसुध्दा एकाच बाकावर बसायचे. मधल्यासुटीत दोघे मिळून एकत्र डबा खायचे. एकच डबा खायचे! दोघे एकमेकांचे खास दोस्त!
दोघांना एकमेकाशिवाय अजिबात करमत नसे. जिथे अशोक तिथे अमिन असे!
अशोकचे आई वडील कोकणात असत. अशोक त्याच्या काकांकडे राही. घरात अशोक आणि काका, दोघंच. काका सकाळी गिरणीत कामाला जात. संध्याकाळी अशोक काकांना स्वयंपाक करायला मदत करी. काकांना रात्रपाळी असली की, अशोक अमिनकडे झोपायला जाई.
अशोकचा मधल्यावेळचा डबा अमिनच आणत असे. अशोकचा अभ्यास, त्याचं आजारपण,त्याला काय हवं? काय नको? हे सुध्दा अम्मीच पाहात असे.
अम्मी नेहमी म्हणत असे, “मुझे ये दो प्यारे बच्चे है अशोक और अमिन! अशोक मेरा सबसे लाडला है!!”

उन्हाळ्याच्या सुटीत अमिन, अशोक बरोबर कोकणात जाई.
त्यावेळी, अशोकची आई, अमिनची 'मां'होत असे, अमिनची अम्मी होत असे! ती कौतुकाने अमिनची प्रत्येक गोष्ट ऐकायची. त्याचे भारी लाड करायची.
महिनाभर अशोक आणि अमिन मजा करत.
सकाळी नदीत डुंबणं, दिवसभर भटकणं, खेळणं,गोष्टींची पुस्तकं वाचणं, आंबे-फणस मटकावणं, झाडावर चढून जांभळे खाणं असा कार्यक्रम.
अशोकच्या घरी अमिनची चंगळ असे.
सुटी संपूच नये असं त्यांना वाटे.

अमिन आणि अशोक खिडकीतून पाहून-पाहून कंटाळले.
अंधारात पाहायचं म्हणजे,डोळे ताणून पाहावं लागतं. खूप सावध असावं लागतं. अगदी बारीक सारीक आवाज सुध्दा कानाने टिपावे लागतात.
पण कुठेच काही घडेना.
अमिन वैतागून म्हणाला, “अशोक कुठे रे काय?तुला उगाच संशय.
तस्सं काही नसणारंच रे.”
“नही यार.माझा अंदाज चुकणार नाही.” अमिनच्या खांद्यावर हात ठेवत,अशोक हलकेच पुढे बोलू लागला; “अरे कालपण माझ्या काकांना रात्रपाळी होती. काल काकांनी कामावर जाताना पाहिलं की,'चार-पाच माणसं खांद्यावर पोती घेऊन कचरा कुंडीत टाकत होती.' एव्हढ्या रात्री अचानक इतका कचरा कुठून आला? म्हणजे, नक्कीच तो कचरा नसणार...!...”
अमिन पुढे सरकत भीत-भीत म्हणाला, “हाय अल्ला! मग काय असेल त्यात? काही भयानक तर नसेल ना?
आणि हे तुला सगळं कधी समजलं?
कुणी सांगितलं?
तो फिर मैं क्या करू?”
“आधी माझं ऐक सारं. आज सकाळी मला काकांनी सांगितलं. हे सगळं ऐकल्यावर मला संशय आला. मी सकाळी उगाचच कचरा कुंडी जवळ फेरी मारली. तर तिथे फक्त कचराच! पण...........” अशोक बोलता-बोलता गप्प झाला.
अमिन अशोक कडे रोखून पाहात म्हणाला, “पण?....पण... काय अशोक? कुछ दगा फटका तर नाही ना?”
ठअजून तरी नक्की सांगता येत नाही.
पण,सकाळी एक गोष्ट माझ्या लक्षात आली. “आज शेवटच्या तीन संडासांना कुलुपं लावली होती. आणि त्याच्या बाहेर दोन अनोळखी माणसं पाहारा करत बसली होती.”
मी कचरा कुंडी जवळ उगाचच घुटमळतो आहे हे लक्षात आल्यावर, त्यातल्या एकाने मला दटावलं. उगाचच आवाज चढवून झापलं. त्यामुळे अमिन, माझी खात्रीच झालीय की, आज रात्री काही तरी होणार!!
काहीतरी भयानक घटना घडणार!
आपण अतिशय सावध राहायला हवं.ठ
अशोकं बोलणं ऐकून,अमिन कापऱ्या आवाजात म्हणाला, “आज....आज.. अब्बाजान असते तर बरं झालं असतं रे! पण ते तर चार दिवसापूर्वीच लखनौला गेलेत. तिकडे दादाजी खूप आजारी आहेत ना.
आता...आात आपण काय करायचं रे अशोक? मला थोडीशी भीती वाटतेय.. आणि मला काही सूचत पण नाहिए रे.”
अमिनला समजावत अशोक म्हणाला, “घाबरू नकोस. आत्ता मी जे तुला सांगिन, ते तू अम्मीला सांगू नकोस. मला भिती वाटते, एखादवेळेस अम्मी घाबरेल.
आणि एक लक्षात ठेव, “तू एकटा नाहीस, आपण दोघे आहोत! आपण दोघे मिळून कुठलही कठीण काम सहजी करू शकतो!”
तोच, कचरा कुंडी जवळ त्यांना काही हालचाल दिसू लागली.
काळे कपडे घातलेली ती सात-आठ माणसं होती. काहींनी तोंडावर रुमाल बांधले होते.
दोघांनी कुंडीतला कचरा खणायला सुरुवात केली.
थोड्याच वेळात त्यांनी कुंडीतून चार पोती आणि दोन पेट्या बाहेर काढल्या. त्याचवेळी अंधारातून लपत छपत आणखी चार माणसं आली. त्यांच्या खांद्यावर जड पोती होती.
एकाने झटकन पुढे होऊन,शेवटून तिसऱ्या संडासाचे कुलुप उघडले.
ती जड पोती संडासात ठेवली. पुन्हा दाराला कुलुप लावले.
मग एकाने सावकाश पेटी उघडली.
दुसऱ्याने बॅटरी पेटवली.
चार दिशांना चार माणसे पाळत ठेवून होती.
बाकीचे सारे पेटीच्या सभोवार उभे राहिले.
बॅटरीच्या प्रकाशात काहीतरी खुडबूड-कूडबूड सुरू झाले. बाटलीवर बाटली आपटल्याचे आवाज अधून मधून ऐकू येऊ लागले. फनेल घेऊन बाटलीत काहीतरी भरलं जातंय, इतकंच कळत होतं.
इतक्यात,बाटली फुटल्याचा खळकन आवाज आला!
आणि त्यापाठोपाठ फाडकन कानफटात मारल्याचा आवाज घुमला!!
क्षणभर काम थांबलं.
लागोपाठच्या ह्या दोन खतरनाक आवाजांनी,खिडकीतून लपून पाहणाऱ्या 'त्या दोघांच्या' अंगावर भितीने सरसरून काटा आला.
ते दोघे खिडकीपासून क्षणभर लांब झाले. त्यांनी दचकून अम्मीकडे पाहिलं.
पण अम्मी एकाग्रपणे जपमाळ घेऊन जप करत होती.

थांबलेलं काम पुन्हा सुरू झालं.
अशोक आणि अमिनला त्या माणसांचे चेहरे दिसत नव्हते.ती माणसं ओळखीची आहेत की अनोळखी आहेत हे पण समजत नव्हतं.
पण ते सगळे गुंड आहेत, मवाली आहेत आणि त्यांचं आता जे काही चाललं आहे ते भयानक आहे,हे मात्र त्या दोघांना समजत होतं.
ह्यामुळे फक्त आपल्यालाच नव्हे तर,साऱ्या रेहमानपाड्यालाच धोका आहे,हे ही त्यांनी ओळखलं होतं.
आता काहीतरी करायलाच हवं होतं!!

अमिन अशोकला कही बोलणार, तोच....... अशोकने अमिनचा हात घट्ट धरला आणि कुजबूजला, “मला कळतंय सारं! आपण बाहेर जाऊन पोलिसांना ह्याची खबर देऊ.
आपण हा रेहमानपाडा वाचवलाच पाहिजे!
ह्या गुंडांना धडा शिकवलाच पाहिजे!!”
“खरंय तुझं! पण.... एव्हढ्या रात्री, अम्मी आपल्याला घराबाहेर एकटं पाठवणार नाही.
आणि....
आपल्याला का जायचंय त्याचं खरं कारण आपण अम्मीला सांगू पण शकत नाही.
बाहेर जाण्यासाठी काहीतरी आयडीया करावीच लागेल. मुझे जरा सोचने दो यार. “अमिन भराभर एव्हढं बोलला. पण केव्हाच त्याच्या डोक्यात विचार चक्र फिरू लागली होती.
अशोक पण आपलं डोकं चालवत होता. पण छे! अम्मीला पटेल असं कारण त्याला काहीकेल्या सूचत नव्हतं.तो अगदी अस्वस्थ झाला होता.
एकदा खिडकीतून बाहेर तर एकदा अमिनकडे तो हताशपणे पाहात होता. हाताच्या मुठी वळत तो रागाने थरतरत होता.
तोच अमिन म्हणाला, “जय भारत! मिळाली आयडीया!!
अरे यार,आपण अम्मीला सांगूया की,तू घर बंद करून येताना,घरातले दिवे बंद करायला विसरला आहेस. आपण दोघे जाऊ आणि दिवे बंद करून पटकन परत येऊ. क्या...? कैसी है ये थाप..?”
“थाप तो अच्छी ही है! लेकीन अमिन, आपल्याला अम्मीशी खोटं बोलायला लागणार रे. मला त्याचं वाईट वाटतंय.
आपण खोटं बोललो, हे कळल्यावर तिला काय वाटेल?
कुछ दुसरी आयडीया नही क्या? तुम जरा फिरसे सोचो तो.....?” अशोकने असं म्हणताच अमिन सावरला.
अशोककडे रोखून पाहात, अत्यंत विश्वासाने अमिन म्हणाला, “नही अशोक! अब वेळ खूप कमी आहे.
आता थोडा जरी उशीर झाला, तरी हा रेहमानपाडा पेटेल.
इथे दंगल उसळेल.
माणसांची कत्तल होईल.
गरीबांची घरं बेचिराख होतील.
आपण काही अम्मीला फसवत नाही. आपण आल्यावर तिला नीट समजावून सांगू की.
तिची माफी ही मागू.
पण अभी........
अभी हम मजबूर है अशोक!!
आता एक क्षण ही वाया घालवून चालणार नाही. प्लीज मेरी बात मान जाओ अशोक.”
अशोकने मान हलवली. अम्मीला थाप मारून अमिन आणि अशोक निघाले.

“नीट जा. उगाच इकडे तिकडे जाऊ नका. मला काळजी करायला लावू नका. झटकन जा,पटकन या.” असं त्यांना पुन्हा-पुन्हा बजावत अम्मीने अशोकला बॅटरी दिली.
बाहेर परिस्थिती काय आहे? कितीशी गंभीर आहे? ह्याची नीटशी कल्पना तिला नव्हती. “आता दंगल थांबली आहे. वातावरण निवळले आहे; असाच तिचा समज होता.
नाहीतर अम्मीने ह्या दोघांना असं एकटं पाठवलंच नसतं. ती स्वत: त्या दोघांबरोबर गेली असती. अम्मी काही डरपोक नव्हती. अम्मी मोठी धीराची बाई होती!

अलगदपणे दार उघडून अमिन अशोक बाहेर आले. दार बंद केलं.
पावलांचा आवाज न करता,सावकाश चालत, त्यांनी दोन गटारं ओलांडली.
एका घराजवळ ते आडोशाला थांबले.
त्यावेळी भयाण शांतता त्रासदायक वाटत होती.
अशोक अमिनच्या कानात म्हणाला, “हे बघ अमिन,तू इथेच थांब. इथे म्हणजे, ह्या भिंतीला चिकटूनच उभा राहा. अजिबात हालचाल करायची नाहीस तू.
हे गुंडलोक त्या मोठ्या पेट्या,पोती कुठं ठेवतात? हे तू पाहायचंस. त्यांचं बोलणं ऐकू आलं तर, कान देऊन ऐकायचं,लक्षात ठेवायचं. हे गुंड जर कुठे निघाले, तर त्यांचा हळूच पाठलाग करायचा. आणि जर... ...
त्या गुंडांनी, आत्ताच काही घातक प्रकार करायला, हिंसक गोष्टी करायला, आगी लावायला सुरूवात केली........
तर...... ही बॅटरी घेऊन तू दगडी भिंती जवळ सरळ यायचंस. आणि पोलीस चौकीच्या दिशेने, बॅटरी सतत चालू-बंद करून, तू मला सिग्नल द्यायचा!
मी आता सरळ स्स्त्याने जाणार नाही.
बाजूची गटारं ओलांडून मी त्या दगडी भिंतीजवळ जाईन. भिंतीवर चढून रेल्वे लाईनमधे उडी मारीन. तिथून धावतच, रेल्वे लाईन क्रॉस करून समोरच्या पोलीस चौकीत जाईन.
तू दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ इथे थांबू नकोस. अतिशय सावध राहा. उगाच हालचाल करू नकोस.
त्या गुंडांनी चुकून जरी तुला पाहिलं, तरी ते तुला जीवंत सोडणार नाहीत!!
माझी वाट पाहू नकोस. माझ्या अम्मीला सांभाळ.
जगलोच तर पुन्हा भेटू.
खुदा हाफिज!”
अमिनला काही एक बोलू न देता, अशोकने त्याच्या डोळ्यातलं पाणी टिपलं. त्याने प्रेमाने, मायेने त्याचा हात क्षणभर गच्च धरला.
आणि क्षणांत, दगडी भिंतीच्या दिशेने अशोक सुसाट धावत सुटला.
काळोखात मिसळून गेला. दिसेनासा झाला.

अमिन रडवेला होऊन तसाच भिंतीजवळ उभा होता.
अशोकचं बोलणं ऐकून तो सुन्नं झाला होता!
गुंडांचं काम जोरात सुरू होतं.
बाटलीत पेट्रोल भरुन,बुचात वात बसवून त्यांनी पेट्रोल बॉम्ब तयार केले.
काचेच्या नळकांड्यात अॅसीड आणि इतर विषारी रसायनं ओतून, त्यांनी अॅसीड बॉम्ब तयार केले.
हे बॉम्ब त्यांनी व्यवस्थित पेटीत ठेवले.
एका पोत्यात अत्याधुनिक स्वयंचलित रायफली होत्या.
दोघा गुंडांनी दोन रायफली खांद्यावर लटकवल्या. काहींच्या हातात तलवारी आणि चॉपर होते.
अॅसीड बॉम्ब तयार करून ते पेटीत व्यवस्थित ठेवण्याचे काम,जोरात सुरू होते. अॅसीड आणि पेट्रोल मुळे तयार झालेला विचित्र चरचरीत-जळजळीत वास सगळीकडे पसरला होता.
अमिन श्वास रोखून हे सारं पाहात होता. अशोकचं बोलणं त्याच्या डोक्यात घुमत होतं. अम्मीची काळजी वाटत होती.
त्याची छाती धडधडत होती.
भितीने त्याच्या पोटात गोळा आला होता.
पाय लटलटू लागले होते.
नाकाला झोंबणाऱ्या अॅसीडच्या वासाने तो अस्वस्थ झाला.
त्याच्या घशाला कोरड पडली.
आवंढा गिळताना त्रास होऊ लागला.
त्याचे तळहात गारठले. घामाने चिप्प भिजले आणि.............
आणि जे होऊ नये तेच झाले!!
अमिनच्या हातातली बॅटरी धपकन जमिनीवर पडली.
बॅटरी सुरू झाली...!
आणि.....
बॅटरीचा झगझगीत प्रकाश झोत गुंडांच्या अंगावर पडला!!!

क्षणभर गुंड घाबरले!

त्यांना वाटलं पोलीसच आले.
त्यांनी वळून पाहिलं तर...... अमिन थरथरत भिंती जवळ उभा होता.
अमिनने प्रसंगावधान राखले. त्याने भीत-भीत डाव्या हाताची मूठ बंद करून, करंगळी वर केली. त्याचा चेहरा पांढराफटक पडला होता.
तरीपण एका गुंडाने त्याला दरडावले.
हातातल्या तलवारीनेच त्याने अमिनला घरी जाण्याची खूण केली.
बॅटरीच्या झोतात,ती तळपणारी तलवार आणि तोंडावर बांधलेल्या रुमालामागून डोकावणारे त्या गुंडाचे तांबरलेले डोळे पाहून अमिन भीतीने गारठलाच.
बॅटरी बंद करून अमिन निमूटपणे घरी गेला.

अम्मी घरी वाटच पाहात होती. अमिन एकटाच आलेला पाहून,अम्मीचे डोळे मोठे झाले. 'अशोक किधर है?' असं तिने खुणेनेच विचारलं.
अम्मीला काय सांगावं हेच त्याला सूचेना.
भितीने त्याची बोबडी वळली. अमिन काही बोलूच शकला नाही.
त्याने तोंड फिरवलं आणि उगाचच हवेत हात फिरवला.
अम्मीला निटसं काही कळलंच नाही. अमिन घाबरलाय हे ही तिला समजलं नाही.
अमिनने बॅटरी गादीवर फेकली आणि तो अम्मीला बिलगला.
अम्मी अमिनला थोपटत विचार करू लागली.
अशोक येण्याचा कानोसा घेऊ लागली.

गुंडांचं खूपसं काम आटोपलं होतं.
आता त्यांना, त्यातल्या दोन पेट्या आणि काही हत्यारे घेऊन, रेल्वे लाईनच्या पलीकडे असणाऱ्या वस्तीवर हल्ला करण्यासाठी जायचं होतं.
पेट्रोल बॉम्ब फेकून आगी लावणं आणि अॅसिड बॉम्बने माणसांना जखमी करणं, असा त्यांचा बेत होता.

ते पूर्ण तयारीनिशी, सावधपणे दगडी भिंतीच्या दिशेने सरकत होते.
काही जण मागे राहून, हातात तलवारी, चॅापर घेऊन पहारा करत होते.
काहीजण बंद संडासाच्या पायरीवर बसून होते.
समोरच्या वस्तीत आगी लागल्या की पुढच्या गोष्टींचा पुरवठा करण्याची जवाबदारी ह्यांच्यावर होती.

अशोक पोलीस चौकीत गेला तेव्हा इन्स्पेक्टर प्रधान तिथे होते. त्यांनी अशोकचं बोलणं काळजीपूर्वक ऐकलं.
अशोकचं धाडस आणि धडाडी पाहून इन्स.प्रधान क्षणभर चकित झाले!
इन्स.प्रधानांनी ताबडतोब राज्य राखीव पोलीस दलाशी संपर्क साधला. आणि...“आतापासून फक्त पंधरा मिनिटात आम्ही तेथे पोहोचतो. संपूर्ण रेहमानपाड्याला आम्ही वेढा घालतो.
आमच्या सोबत आठशे बंदूकधारी जवान आहेत. ओव्हर.” असा संदेश त्यांना बिनतारी संदेशवाहकावर मिळाला.
त्याबरोबर इन्स.प्रधान जीप मधे बसले.
एक हवालदार अशोकला शोधू लागला.
'अम्मी काळजी करतेय, मला गेलंच पाहिजे' असं म्हणत एक मुलगा आत्ताच पळाला, असं दारावरचा हवालदार म्हणाला.
इन्सपेक्टर प्रधानांनी सोबत चार हवालदार घेतले.
अंधार कापत जीप रेहमानपाड्याच्या दिशेने सुसाट निघाली.

इन्स.प्रधान विचार करू लागले की, “अशोक तसा हुशार चुणचुणीत मुलगा वाटला. पण मग तो, खबर देऊन पळाला का?
अम्मी काळजी करेल म्हणजे काय?
ही अम्मी म्हणजे अमिनची आई असू शकेल का?
अशोकने सांगितल्याप्रमाणे, अमिन अजून तिथेच उभा असेल? की त्याच्यावरच हल्ला झाला असेल?
आपण राज्य राखीव दलाशी संपर्क तर साधला आहेच,
पण......... ही खबरच जर खोटी निघाली तर...?”
असे एक ना अनेक प्रश्न इन्स.प्रधानांच्या डोक्यात थैमान घालू लागले.
रेहमानपाड्यापासून थोड्या अंतरावर जीप थांबली.
काळोखातून लपत-छपत इन्स.प्रधान आणि हवालदार कचरा कुंडीच्या जवळ आले. तिथेच अंधारात आडोशाला दबा धरून बसले.
इन्स.प्रधान अस्वस्थपणे हातातल्या पिस्तुलाशी चाळा करत होते.पंधरा मिनिटात येणाऱ्या मदतीची ते वाट पाहात होते.
वेळ संपता संपत नव्हता.

पोलीसांना गुंगारा देऊन, अशोक पोलीस चौकीतून पळाला. तो दगडी भिंतीच्या दिशेने धावत निघाला. पोलीसांनी अशोकला शोधण्याचा प्रयत्न केला,पण व्यर्थ!
अंधारात एका दगडावर अशोक चांगलाच ठेचकाळला.
त्याच्या उजव्या पायाच्या ढोपराला सणकून मार लागला. मस्तकात कळ गेली. ढोपर खरचटलं. रक्त भळभळू लागलं.
त्यावेळी डाव्या पायावर तोल सावरण्याच्या प्रयत्नात, डावा पाय ही मुरगळला.
अशोकने खिशातून रुमाल काढून, उजव्या ढोपराला गच्च बांधला. सावकाश उजव्या पायावर उभं राहात, त्याने डावा पाय दोन-तीनदा झटकला.
लंगडत-लंगडत, उड्या मारत, पायातल्या वेदना सहन करत,वाटेतले दगड-खड्डे चुकवत अशोक धावण्याचा प्रयत्न करत होता.
उजव्या पायाचा रक्ताने भिजलेला रुमाल धावताना थांबून तो घट्ट करत होता.
'अम्मी काळजी करत असेल. अम्मी घाबरेल.
अमिनचं काय झालं असेल?
गुंडांनी अमिनला पाहिलं तर नसेल ना?
आणि.... ....
आणि अम्मी आम्हाला शोधायला बाहेर पडली तर...?' असे अनेक विचार अशोकच्या डोक्यात घोळत होते.
अशोक, अमिन आणि अम्मीच्या काळजीने बेचैन झाला होता.

अशोक दगडी भिंतीजवळ पोहोचला.
दुखऱ्या पायाने त्याला भिंतीवर चढता येईना. सैल झालेला रुमाल त्याने घट्ट बांधला.
डावा पाय दगडावर घट्ट रोवला. एक खोल श्वास घेऊन, दोन्ही हाताने, ताकदीने त्याने आपलं शरीर वर उचललं. हवेतच कोलांटी उडी मारून, त्याने रेहमानपाड्यात धाडकन उडी मारली!!
पेट्रोल बॉम्ब, अॅसीड बॉम्ब आणि हत्यारं घेऊन रेहमानपाड्यातून काही गुंड,त्याचवेळी दगडी भिंतीवर चढण्याच्या प्रयत्नात होते.
अशोक दाणकन त्यांच्या अंगावरच पडला!!!

काळोखात, हे काय झालं? हे कुणालाच नीटसं समजलं नाही.
पण अशोक सावध होता. तो टुणकन उठला.
तोच,एका गुंडाने सुरा सरसावत त्याचा हात धरला!
पण अशोक काही भ्याड नव्हता. तो ताठ उभा राहीला.
एकंदर काय प्रकार झालाय हे त्याच्या लक्षात आलं. त्याने सावधपणे आजूबाजूला पाहिलं.परिस्थितीचा अंदाज घेतला.
अशोक जरा जोरातच म्हणाला, “मला माझ्या अम्मीकडे जाऊदे. ती काळजीत असेल. चला,बाजूला व्हा...”
तोच तो गुंड, अशोकला दरडावून म्हणाला,“एऽऽऽऽ गप्प बस रे पोरट्या. एव्हढ्या रात्री कुठे गेला होतास?
खरं सांग...... नाहीतर आत्ताच कापून टाकीन!”
“पोलीस चौकीत गेलो होतो, तुमचे हे उद्योग सांगायला” असं म्हणत,अशोकने एकच सणसणीत ठोसा, त्या बेसावध गुंडाच्या पोटात हाणला.
त्याबरोबर ठऊऽऽऽफ,ऊंऽऽऽऽ ऊंफ...ठकरत तो गुंड विव्हळला. त्याच्या हातातला सुरा खाली पडला.
त्या गुंडाचा हात झटकून, लंगडत-उड्या मारत अशोक अंधारात पळाला.
ते सगळेच गुंड आता अशोकचा पाठलाग करू लागले.

अशोकला पळताना गुडघ्यात वेदना होत होत्या.
डावा पाय चांगलाच ठणकत होता.
रक्ताने भिजलेला रूमाल खाली घसरत होता.
प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने त्याच्या डोळ्यासमोर अंधारी येत होती.
तरीही अशोक लंगडत धावत होता.

अशोकला गुंडांची भिती वाटत नव्हती तर त्याला अम्मीची काळजी वाटत होती.
पाठलाग करणारे गुंड काही रेहमानपाड्यातले नव्हते. त्यामुळे गटारे ओलांडताना, वळचणीतून पळताना, अधे-मधे वळताना त्यांची तारांबळ होई.
पण,
“कुछ भी करके,हम उस बच्चेको खलास करेंगे,काट डालेंगे” असं ओरडत, ते अशोकच्या पाठी सुरे सरसावर, तलवारी उगारत धावत होते.
त्या गुंडांची डोकी फिरली होती.
ते बेभान झाले होते.
वेड्यासारखं वागणं त्यांना शहाणपणाचं वाटत होतं.
हातात शस्त्र घेऊन ते मतीमंद झाले होते.

अम्मीचं घर जवळ येताच,एका वळणावर,अशोकने त्यागुंडांना चकवलं.
खाली वाकत,दुखऱ्या पायावर थोडा जोर देत,अशोक वेगात पळाला;आणि अम्मीच्या दारावर जाऊन जोरात धडकला!
तिथेच कोसळला.
झटक्यात अम्मी उठली.
तिने दरवाजा उघडला.
अशोकला उचलून घरात घेतलं.
अशोकला पोटाशी धरलं. त्याला मायेने कुरवाळलं.
अमिनही आनंदाने अशोकपाशी आला. त्याच्या शेजारी बसला.

दार मात्र तसंच उघडं राहीलं!!

काळे कपडे घातलेले,तोंडावर रुमाल बांधलेले आणि हातात तलवारी,सुरे व चॉपर घेतलेले गुंड ,सताड उघड्या दारातून धाडकन आत घुसले.
गळ्यात ताईत घातलेला त्या गुंडांचा बॉस, एक पाऊल पुढे आला.
खोलीभर नजर फिरवत त्याने अंदाज घेतला.
घोगऱ्या आवाजात,तांबरलेल्या डोळ्यांनी अशोककडे पाहात तो अम्मीला म्हणाला, “दे दो उसे! ये सालेको हम काट डालेंगे! बहुत होशियार समझता है खुदको. एक चॉपर की फटकसे पूरी होशीयारी खतम हो जाएगी.”

एका गुंडाने, तलवारीने खिडकीची काच उगाचच फोडली.
काच खळकन फुटली!
भयाण शांततेवर ह्या आवाजाने चरा उमटला!!
वातावरणात विचित्र तणाव निर्माण झाला.

आता कुठल्या क्षणी काय होईल ते सांगता येत नव्हतं!!
त्या गुंडांना, नव्हे, त्या जनावरांना लहान मुलाच्या रक्ताची तहान लागली होती. त्यांच्या हातातल्या तलवारी, चॉपर, सुरे रक्तासाठी आसुसले होते.
खून.... आणि केवळ खून!! इतकंच त्यांना त्यावेळी समजत होतं.

अशोक आणि अमिन,अम्मीच्या मागे घाबरून न लपता, हातात हात धरून ते ताठपणे, त्या गुंडांसमोर उभे राहीले.
त्या गुंडांच्या बॉसने तर तलवार हवेत उगारून धरली होती.
अमिन त्या बॉसला ठणकावून म्हणाला, “एक पाऊल मागे व्हा. हा माझ्या आजोबांचा फोटो आहे.”

अमिनचे आजोबा म्हणजे अम्मीचे वडील.
ते स्वातंत्र्य सैनिक होते.
भारतासाठी लढताना त्यांना प्राण गमवावा लागला होता.

त्या खतरनाक गुंडांचा तो बॉस गुरकावला, “चूप्प बस बे. हमे उनसे क्या मतलब? ये लडका कौन है? ये तुम्हारे धरम का नही है! छोड दो उसका हाथ, वरना..., तुम भी उसके साथ मरोगे. हा हा हाऽऽऽ़”
दुसरा गुंड मधेच केकाटला, “तुम्हारा भी फोटो लगेगा उधर. ही ही हीऽऽ...”
त्यांच बोलणं ऐकून अम्मी संतापली, भयंकर चिडली. मुलांना मागे ढकलत, त्वेशाने बोलली, “उसकाही क्या,हम तिनोंका फोटो भी उधर लगने दो! हमे कोई दिक्कत नही!!
याद रखो, वो फोटो कोई फालतू फिल्म स्टार का फोटो नही.
ते माझे वडील आहेत.
गांधीजींच्या दांडी यात्रेत असताना त्यांनी आनंदाने, अभिमानाने डोक्यावर लाठ्या झेलल्यात!
स्वातंत्र्य युध्दात भाग घेऊन, त्यांनी हसत-हसत इंग्रजांच्या गोळ्या खाल्यात!!
मी त्यांची मुलगी आहे; आणि ही दोन माझी मुले आहेत.
मरणाला भिणारी भेकड माणसं, आम्ही नाही!
खुशाल तुमच्या तलवारी आमच्यावर चालवा; पण.... ....
पण, तुम्ही धर्माचं बोललात म्हणून एक सांगते, माझे वडील देशासाठी लढले, ते भारतीय होते म्हणून! फळणी नंतर आम्ही इथेच राहीलो, कारण आम्ही भारतीय आहोत म्हणून!
निळ्या, भगव्या किंवा हिरव्या झेंड्यापेक्षा आम्हाला प्रिय आहे तिरंगा झेंडा! कारण आम्ही भारतीय आहोत म्हणून!!
आणि,
आम्हा तिघांचाच काय पण सर्व राष्ट्रप्रेमींचा धर्म एकच आहे, तो म्हणजे भारतीय आणि भारतीयच!!
करा..... करा तुकडे आमचे! करून टाका खांडोळी.
ह्या तुमच्या तलवारी,चॉपरना आमचं भारतीय रक्त लागू दे.
तुमच्यासारख्या चक्रम गुंडांना भिऊन पळणारा, भारतीय नाही, हे ही तुम्हाला समजू दे.
आणि...... .......
नि:शस्त्रावर तलवारी घेऊन हल्ला करणाऱ्या तुझा.... आणि ह्या जमावाचा धर्म तरी कुठला आहे, हे मला समजू दे.....
अशोक आणि अमिन पुढे येत म्हणाले, “हे शुरांनो, आम्ही भारतीय असणं हा जर गुन्हा असेल, तर आम्ही आनंदाने मरायला तयार आहोत.”

अम्मी रागाने,त्वेषाने थरथरत होती.
तिचे डोळे आग ओकत होते.
दोन मुलांच्या ”खांद्याव आपले दोन हात ठेवून ती निर्भीडपणे ताठ उभी होती.

तिचा हा चंडीका अवतार पाहून, ते आक्रमक बेभान गुंड थिजून गेले. वार करण्याचं बळ त्यांच्यात राहीलं नाही.
आपला धर्म कुठला? हे सांगण्याचं साहस त्यांना झालं नाही.
ते अवाक होऊन पुतळ्यासारखे उभेच होते.
बॉस अस्वस्थपणे अम्मीची नजर चुकवू लागला.
नकळत त्यांच्या डोक्यात प्रकाश पडत होता. त्यांच्यातली माणूसकी जागी होत होती.

अम्मी मृदू आवाजात, त्या गुंडांना आणि हातात तलवार घेतलेल्या त्या गुंडांच्या बॉसला म्हणाली, “मुलांनो,एक लक्षात ठेवा; शस्त्र उगारून कधी प्रश्न सुटत नाही. तुम्ही मुळात चांगली माणसं आहात.
कुणीतरी तुमच्या डोक्यात भलतं-सलतं भरवलंय. आणि तुम्ही आपल्या मातृभूमीशी बेईमानी करत आहात.
तुम्ही चांगले असूनही, फार वाईट वागत आहात.
पण, तुम्हाला भडकवणारे मात्र समाजात उजळ माथ्याने फिरत आहेत. तुम्हाला पायदळी तुडवून,तुम्हाला बदनाम करून ते मजा करत आहेत.
एक सांगते,
आज सारा समाज तुम्हाला गुंड म्हणून, मवाली म्हणून ओळखतो. तुमची नफरत करतो.
इतकंच काय....... ...........
तुम्ही तुमच्या मुलाबाळांना सुध्दा नकोसे वाटता!!
“माझे वडील खूनी आहेत! माझे वडील गुंड आहेत,राष्ट्राशी गद्दारी करणारे आहेत” असं तुमच्या मुलांनी इतरांना सांगताना, त्यांची मान शरमेने खाली जाते! रागाने त्यांचा चेहरा लाल होतो.
त्यांना लाऽऽऽज वाटते तुमची!!
अरे, आम्ही घरी आलो की, मायेने-प्रेमाने मुलं आम्हाला धावत येऊन बिलगतात. पण, तुमची मुलं?....
...... तुमची मुलं तुम्हाला भिऊन दूर पळतात!
हो ना? काऽऽय.”
एक क्षणभरच अम्मी बोलायची थांबली.
दोन पावलं पुढे सरकली.
त्या गुंडांच्या बॉसच्या पाठीवर थोपटत म्हणाली, “तुम्हाला पटतंय की तुमचं चुकतंय. चूक कबूल करायला लाजू नका.
चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करा.
मी तुम्हाला मदत करीन. आपण सारे मिळून प्रयत्न करू.”

एक भयाण शांतता त्या खोलीत पसरली.

'त्या तिघांची खांडोळी करून तिथून पळणं...
अशोकचा खून करणं...
पेट्रोल ओतून ते घरंच पेटवून देणं...
किंवा... ...
शरण येणं....'
ह्यापैकी काहीही घडणं आता शक्यं होतं.
होय! काहीही घडणं!!

ते गुंड चुळबूळ करू लागले.
माना खाली घालून ते एकमेकांशी नजरेनेच बोलू लागले.
कमालीचे बेचैन झाले ते.
आता नेमकं काय करावं, हेच त्यांना कळेना.

त्या गुंडांचा तो खतरनाक बॉस प्रथम चाचरत म्हणाला, “अं... अं..।़ होय! आमचं चुकलंच काहीतरी.
होय आई, आम्ही गुंडच आहोत.
पण आता, आम्ही सुधारू शकतो? चांगला माणूस म्हणून जगू शकतो?

दुसरा गुंड म्हणाला,“सच.... सच... कहता हूँ माँ....हमने इतना कभी सोचा ही नही. लेकीन....
लेकीन..... हम अब गुंडे बन चुके है माँ!!
पहले हम भी अच्छे आदमी थे माँ.
लेकीन अब वहाँ वापस जानेका रास्ता नही है माँ..!
अब हम जिंदगीभर गुंडे ही रहेंगे.....”

तिसरा गुंड मधेच घाइघाईत म्हणाला, “हां हां माँ,ये बिलकूल सच कहा रहा है.
लेकीन.. .. क्या हम फिरसे अच्छे आदमी बन सकते है?
क्या सचमुच तुम हमे मदद करोगी?”

अम्मी प्रेमाने, त्या गुंडांना म्हणाली, “क्यों नही? मैं तुम्हे जरुर जरुर मदद करुंगी.
अभी भी मौका गया नही है.
अरे, आपण जर चूक कबूल केली, आणि चुकल्याबद्दल जर आनंदाने शिक्षा घेतली; तर.... तर ती चूक,चूक राहात नाही मुलांनो!

तुम्ही ही शस्त्र टाकून द्या.
पोलीसांच्या स्वाधीन व्हा. जेलमधे जाऊन शिक्षा भोगा.
जेव्हा तुम्ही सुटून परत याल, तेव्हा तुम्ही गुंड नसाल!
तेव्हा..
तुम्हाला जर कुणी काही बोललं, तर त्यांना मी ठणकावून सांगीन.
माझ्यावर विश्वास ठेवा.

क्षणभरच एक अनामिक शांतता घरभर पसरली.
गुंडांचा बॉस पुढे आला.....
त्याने आपली तलवार, अम्मीच्या पायाजवळ ठेवली......
आणि.............
तो गुडघ्यावर बसून ओक्साबोक्सी रडू लागला!!
त्याने अशोकला घट्ट मिठी मारली.
त्याच्या कपाळाचं चुंबन घेतलं.
डोळे पुसत तो अम्मीला म्हणाला, “मेरा....मेरा...लडका ऐसा ही है माँ! लेकीन अब...अब...वो मुझे गुंडादादा नही कहेगा ना माँ?
अपने दोस्तोंसे नही कहेगा ना, की मेरा बाप खूनी है.
नही कहेगा ना, की मैं गद्दार का लडका हूँ.
नही कहेगा ना की, मेरे हाथोंको किसी का खून लगा है.
मैं घर लौटने के बाद, आएगा ना मेरे पास?
नही भागेगा ना मुझसे दूर?
नही डरेगा ना मुझसे वो...?

माँऽऽ.....हम सब हमारे बच्चोंका प्यार वापस चाहते हैं माँ!
माँ....
हम सब अच्छे आदमी बनना चाहते है! तुम्हारे जैसे सच्चे भारतीय!!
माँ...
अब मैं जेल से लौटनेके बाद, मेरा बेटा मुझै गुंडादादा नही... ...
प्यारेदादा कहेगा! प्यारेदादा!!
हां माँ,
अब मैं सबका प्यारा-दादा होऊँगा.

माँ..माँ..सचमूच तुमने हमारी आँखे खोल दी.”
प्यारेदादाला इतकं गहिवरुन आलं की, त्याला पुढे बोलताच येईना.
त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू घळघळू लागले.

अम्मीला सुध्दा आपले आनंदाश्रू अनावर झाले.
तिच्या पायाशी ठेवलेली तलवार रक्ताने माखण्या ऐवजी आनंदाश्रूंनी चिंब भिजून गेली!!

प्यारेदादाने अम्मीच्या पायाला हात लावून नमस्कार केला.
अम्मीने त्याला आशीर्वाद दिला.
त्यावेळी दुसरा गुंड म्हणाला, ”माँ हम गलत रास्तेपर फस गए थे.
अब हम जान गये,इन्सानियत ही असली धरम है!”
“सही है मेरे बेटे!
आपण सारे भारतीय आहोत, आणि माणुसकी हाच आपला धर्म आहे.” अम्मी असं बोलत असतानाच, बाहेर पोलीसांच्या शिट्या वाजल्या.

इन्सपेक्टर प्रधान बाहेरूनच ओरडून म्हणाले, “खबरदार, हॅण्डस् अप, हात वर करा.
हातातली शस्त्र खाली टाका.
हालचाल केलीत तर गोळ्या घालू.
आम्ही तुमच्या बाहेरच्या साथीदारांना आधीच पकडलं आहे.”

पोलीस आले आहेत असं कळल्यावर,एक ही गुंड घाबरला नाही, कारण...
आता ते गुंड राहीलेच नव्हते.
आपली चूक सुधारण्यासाठी,चांगलं माणूस म्हणून जगण्यासाठी,ते खूशीने पोलीसांच्या स्वाधीन होणार होते.

इन्स.प्रधान हातात पिस्तूल घेऊनच धाडकन घरात आले.

आणि......त्यांचा, त्यांच्या डोळ्यावरच विश्वास बसेना!!...

'दगडा सारखं काळीज असणाऱ्या त्या गुंडांचे डोळे पाणावलेले होते.
त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेश नव्हता.
अम्मीच्या पायाजवळ, तलवारी आणि चॉपर पडले होते.
तर गुंडांचा खतरनाक बॉस,अशोकच्या जखमेवर स्वत:चा रुमाल बांधत होता!!'.......
हे दृश्य पाहताना इन्स.प्रधानांना क्षणभर वाटलं, आपण स्वप्नं तर पाहात नाही ना?
त्यांनी लगेचच स्वत:ला सावरलं आणि अम्मीला विचारलं, ”हा काय प्रकार आहे? काही दगा फटका तर नाही ना?”
अम्मी प्रसन्नपणे हसत म्हणाली, ”छे छे प्रधान साहेब, त्यांना पश्चाताप झालाय! आता त्यांना ह्या पुढे गुंड म्हणून नव्हे तर चांगला माणूस म्हणून जगायचं आहे.
प्रधान साहेब, ह्यांनी सुधारण्यासाठी, आपण सर्वांनीच त्यांना मदत करायला हवी, नाही का?”
इन्स.प्रधान खळखळून हसत म्हणाले, “निश्चितच!! ह्यांना कमी शिक्षा व्हावी ह्यासाठी मी प्रयत्न करीन. त्यात मला आनंदच आहे.

प्यारेदादा अम्मीला हात जोडून म्हणाला, “मी माझ्या मुलाची शपथ घेऊन सांगतो, पुन्हा कध्धी कध्धी आम्ही वाईट वागणार नाही.
मातृभूमीशी बेईमानी करणार नाही.
माणूसकी विसरणार नाही.
तुमच्या सारखाच आम्हाला ही अभिमान आहे की आम्ही भारतीय आहोत!
पण अम्मी... ...
ही आमची गोष्ट तू इतर मुलांना सांग. म्हणजे,आम्ही जसे चुकलो,तशी चूक ही मुले करणार नाहीत. आम्ही जसे फसलो, तसे ही मुले फसणार नाहीत.
आणि अम्मी.. .. ..
माझं आणखी एक छोटं काम कर,
माझ्या मुलाला सांग, मला एकदाच माफ कर.
मैं घर लौटूंगा प्यारेदादा बनकर.......”

प्यारेदादाला पुढे बोलणंच अशक्य झालं.
त्याला भरून आलं.
त्याला आवंढा गिळताना ही त्रास होऊ लागला.
त्याचे डोळे आनंदाश्रूंनी डबडबले.
इन्स.प्रधानांसोबत सगळेच हसत आणि निश्चिंत मनाने जेलकडे रवाना झाले.

खरं म्हणजे, जेलमधे जाण्या अगोदरच,
फक्त गुंडादादाच काय...तर, त्याचे साथीदार सुध्दा,
सगळ्यांचेच......
प्या रे दा दा झाले होते!!

-- राजीव तांबे.



पोलीसांना गुंगारा देऊन, अशोक पोलीस चौकीतून पळाला. तो दगडी भिंतीच्या दिशेने धावत निघाला. पोलीसांनी अशोकला शोधण्याचा प्रयत्न केला,पण व्यर्थ!
अंधारात एका दगडावर अशोक चांगलाच ठेचकाळला.
त्याच्या उजव्या पायाच्या ढोपराला सणकून मार लागला. मस्तकात कळ गेली. ढोपर खरचटलं. रक्त भळभळू लागलं.
त्यावेळी डाव्या पायावर तोल सावरण्याच्या प्रयत्नात, डावा पाय ही मुरगळला.
अशोकने खिशातून रुमाल काढून, उजव्या ढोपराला गच्च बांधला. सावकाश उजव्या पायावर उभं राहात, त्याने डावा पाय दोन-तीनदा झटकला.
लंगडत-लंगडत, उड्या मारत, पायातल्या वेदना सहन करत,वाटेतले दगड-खड्डे चुकवत अशोक धावण्याचा प्रयत्न करत होता.
उजव्या पायाचा रक्ताने भिजलेला रुमाल धावताना थांबून तो घट्ट करत होता.
‘अम्मी काळजी करत असेल. अम्मी घाबरेल.
अमिनचं काय झालं असेल?
गुंडांनी अमिनला पाहिलं तर नसेल ना?
आणि…. ….
आणि अम्मी आम्हाला शोधायला बाहेर पडली तर…?’ असे अनेक विचार अशोकच्या डोक्यात घोळत होते.
अशोक, अमिन आणि अम्मीच्या काळजीने बेचैन झाला होता.

अशोक दगडी भिंतीजवळ पोहोचला.
दुखऱ्या पायाने त्याला भिंतीवर चढता येईना. सैल झालेला रुमाल त्याने घट्ट बांधला.
डावा पाय दगडावर घट्ट रोवला. एक खोल श्वास घेऊन, दोन्ही हाताने, ताकदीने त्याने आपलं शरीर वर उचललं. हवेतच कोलांटी उडी मारून, त्याने रेहमानपाड्यात धाडकन उडी मारली!!
पेट्रोल बॉम्ब, अॅसीड बॉम्ब आणि हत्यारं घेऊन रेहमानपाड्यातून काही गुंड,त्याचवेळी दगडी भिंतीवर चढण्याच्या प्रयत्नात होते.
अशोक दाणकन त्यांच्या अंगावरच पडला!!!

काळोखात, हे काय झालं? हे कुणालाच नीटसं समजलं नाही.
पण अशोक सावध होता. तो टुणकन उठला.
तोच,एका गुंडाने सुरा सरसावत त्याचा हात धरला!
पण अशोक काही भ्याड नव्हता. तो ताठ उभा राहीला.
एकंदर काय प्रकार झालाय हे त्याच्या लक्षात आलं. त्याने सावधपणे आजूबाजूला पाहिलं.परिस्थितीचा अंदाज घेतला.
अशोक जरा जोरातच म्हणाला, “मला माझ्या अम्मीकडे जाऊदे. ती काळजीत असेल. चला,बाजूला व्हा…”
तोच तो गुंड, अशोकला दरडावून म्हणाला,“एऽऽऽऽ गप्प बस रे पोरट्या. एव्हढ्या रात्री कुठे गेला होतास?
खरं सांग…… नाहीतर आत्ताच कापून टाकीन!”
“पोलीस चौकीत गेलो होतो, तुमचे हे उद्योग सांगायला” असं म्हणत,अशोकने एकच सणसणीत ठोसा, त्या बेसावध गुंडाच्या पोटात हाणला.
त्याबरोबर ठऊऽऽऽफ,ऊंऽऽऽऽ ऊंफ…ठकरत तो गुंड विव्हळला. त्याच्या हातातला सुरा खाली पडला.
त्या गुंडाचा हात झटकून, लंगडत-उड्या मारत अशोक अंधारात पळाला.
ते सगळेच गुंड आता अशोकचा पाठलाग करू लागले.

अशोकला पळताना गुडघ्यात वेदना होत होत्या.
डावा पाय चांगलाच ठणकत होता.
रक्ताने भिजलेला रूमाल खाली घसरत होता.
प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने त्याच्या डोळ्यासमोर अंधारी येत होती.
तरीही अशोक लंगडत धावत होता.

अशोकला गुंडांची भिती वाटत नव्हती तर त्याला अम्मीची काळजी वाटत होती.
पाठलाग करणारे गुंड काही रेहमानपाड्यातले नव्हते. त्यामुळे गटारे ओलांडताना, वळचणीतून पळताना, अधे-मधे वळताना त्यांची तारांबळ होई.
पण,
“कुछ भी करके,हम उस बच्चेको खलास करेंगे,काट डालेंगे” असं ओरडत, ते अशोकच्या पाठी सुरे सरसावर, तलवारी उगारत धावत होते.
त्या गुंडांची डोकी फिरली होती.
ते बेभान झाले होते.
वेड्यासारखं वागणं त्यांना शहाणपणाचं वाटत होतं.
हातात शस्त्र घेऊन ते मतीमंद झाले होते.

अम्मीचं घर जवळ येताच,एका वळणावर,अशोकने त्यागुंडांना चकवलं.
खाली वाकत,दुखऱ्या पायावर थोडा जोर देत,अशोक वेगात पळाला;आणि अम्मीच्या दारावर जाऊन जोरात धडकला!
तिथेच कोसळला.
झटक्यात अम्मी उठली.
तिने दरवाजा उघडला.
अशोकला उचलून घरात घेतलं.
अशोकला पोटाशी धरलं. त्याला मायेने कुरवाळलं.
अमिनही आनंदाने अशोकपाशी आला. त्याच्या शेजारी बसला.

दार मात्र तसंच उघडं राहीलं!!

काळे कपडे घातलेले,तोंडावर रुमाल बांधलेले आणि हातात तलवारी,सुरे व चॉपर घेतलेले गुंड ,सताड उघड्या दारातून धाडकन आत घुसले.
गळ्यात ताईत घातलेला त्या गुंडांचा बॉस, एक पाऊल पुढे आला.
खोलीभर नजर फिरवत त्याने अंदाज घेतला.
घोगऱ्या आवाजात,तांबरलेल्या डोळ्यांनी अशोककडे पाहात तो अम्मीला म्हणाला, “दे दो उसे! ये सालेको हम काट डालेंगे! बहुत होशियार समझता है खुदको. एक चॉपर की फटकसे पूरी होशीयारी खतम हो जाएगी.”

एका गुंडाने, तलवारीने खिडकीची काच उगाचच फोडली.
काच खळकन फुटली!
भयाण शांततेवर ह्या आवाजाने चरा उमटला!!
वातावरणात विचित्र तणाव निर्माण झाला.

Author