नवलकोल ही भाजी ब्रॅसिकेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव ब्रॅसिका ओलेरॅसिया प्रकार कॉलोरॅपा आहे. ती दिसायला कोबीसारखी दिसते. मात्र तिच्यावर कोबीप्रमाणे पाने नसतात. कोबीप्रमाणेच ही भाजी वन्य कोबीपासून (ब्रॅसिका ओलेरॅसिया) कृत्रिम निवडीतून तयार झालेली आहे. ही वर्षायू वनस्पती मूळची यूरोपातील असून आता तिचा प्रसार सर्वत्र झालेला आहे. नवलकोल कोलराबी हे नाव जर्मन भाषेतील असून त्याचा अर्थ कॅबेज-टर्निप म्हणजे सलगम (टर्निप) सारखी चव व आकार असलेला कोबी असा आहे. या वनस्पतीचे खोड सलगमसारखे दिसते म्हणून या प्रकाराला कोलराबी हे नाव दिले गेले आहे. भारतात नवलकोलची लागवड विशेष करून महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब व आसाम येथे होते. पावसाळय़ात व हिवाळय़ात नवलकोलचे पीक चांगल्यापैकी उत्पन्न मिळवून देते. त्याबरोबर कोबी व फुलकोबीपेक्षा हे पीक कणखर असते. भाजीबरोबरच सॅलॅड व पाल्याचा उपयोग जनावरांच्या खाण्यासाठी केला जातो. नवलकोलचे खोड (गड्डा), गोलाकार मांसल असून सफरचंदाच्या आकाराचे असते. पाने साधी, मोठी, लांब देठाची व फिकट पांढरी असून तळाशी रुंद असतात. नवलकोलच्या खोडापासून क जीवनसत्त्व मिळते. ते कच्चे किंवा भाजी म्हणून शिजवून खातात. महाराष्ट्रात हे पीक कोबी आणि फुलकोबी यांच्या पिकांत मिश्र पीक म्हणून घेतात. इट व्हिएन्ना, किंग ऑफ मार्केट, परपल टॉप, परपल व्हिएन्ना, अर्ली व्हाइट या सुधारित जाती असून व्हाइट व्हिएन्ना ही जात आपल्याकडे जास्ती दिसते. याचे गड्डे लांब, गोलाकार व फिकट हिरव्या रंगाचे असतात. कोवळा नवलकोल ही उत्तम भाजी असून गुणाने शीत असून पित्तशामक व पथ्थकर आहे. नवलकोलाची भाजी वेगवेगळे पदार्थ घालून करता येते. मटारचे दाणे, ओले चवळी दाणे, ओला हरभरा, मोडाची मटकी, वालाचे दाणे, बटाट्याच्या फोडी घालून भाजी होवू शकते. तसेच तुरीच्या डाळीचे वरण, मसुराच्या डाळीचे वरण घालूनसुद्धा, बेताचा रसा ठेवून भाजी होवु शकते. नवलकोलाच्या फोडी वाफवून, नंतर फोडणीला टाकून शिजवून, वरून डाळीचे पीठ किंवा भाजणी पेरून सुद्धा सुकी भाजी होवू शकते
नवलकोलच्या पाल्याच्या खुसखुशीत वड्या
साहित्य : तीन वाट्या नवलकोलचा पाला, अर्धी वाटी बेसन पीठ,एक टेबलस्पून भाजलेले पांढरे तीळ , धने-जिरे पावडर, हळद,हिंग, लाल मिरचीचे तिखट, मीठ, आमचूर पावडर, चाट मसाला,काळा मसाला,तेल
कृती : आगोदर नवलकोलचा पाला स्वच्छ निवडून ,धुवून व बारीक चिरून घ्या. एका तसराळयात हा धुवून चिरलेला पाला,बेसन पीठ,तीळ,धने जिरे पावडर,हळद,हिंग,लाल मिरचीचे तिखट व मीठ घालून मिसळून एकजीव करून घ्यावे व त्यात थोडे पाणी घालून मळून घेऊन घट्ट गोळा बनवावा. त्याचे लाडवाच्या आकाराचे गोळे बनवून ते लाटून लांब वळकट्या (रोल्स) कराव्या व एका चाळणीत ठेऊन वाफवून घ्याव्यात. मग सुरीने त्यांच्या वड्या कापून ठेवाव्या.
गॅसवर एका कढईत तेल तापवून घेऊन त्यात या वड्या लालसर रंगावर तळून घ्या.
हिरव्या कोथिंबीर- खोबर्याटच्या चटणीसोबत गरम नवलकोलच्या खुसखुशीत वड्या सर्व्ह करा.
नवलकोलच्या पाल्याची पीठ पेरून भाजी.
साहित्य : तीन वाट्या नवलकोलचा पाला, अर्धी मूठ नवलकोलच्या बारीक चकत्या करून ,एक चमचा आले-लसूण पेस्ट, चवीनुसार साखर, लाल तिखट किंवा हिरव्या मिरच्यांचा ठेचा आणि मीठ,फोडणीसाठी दोन टेबलस्पून तेल,एक छोटा चमचा मोहरी,एक छोटा चमचा जिरे, छ्टा अर्धा चमचा हळद व चिमूटभर हिंग ,३ ते ४ चमचे बेसन पीठ,
कृती : प्रथम गॅसवर एका पातेल्यात पाणी गरम करत ठेवावे ,पाणी उकळले कि त्यात बारीक चिरलेला मुळ्याचा पाला व चकत्या घालाव्या व साधारण ५ ते ७ मिनिटे मध्यम आचेवर वाफवून घ्याव्या (ब्लांच करून घ्या).वाफावलेला पाला व चकत्या एका चाळणीत काढून घ्याव्या व त्यातील सर्व पाणी निथळू द्यावे. गॅसवर एका कढईत तेल गरम करत ठेवावे ,तेल गरम झाले कि त्यात जिरे-मोहोरी घालावी ,हिरव्या मिरच्या चा ठेचा किंवा लाल तिखट ,आलं-लसणाची पेस्ट घालावी व दोन मिनिटे परतून घेऊन त्यात हळद घालून पुन्हा एकदा परतून घेऊन मग वाफावलेला मुळ्याचा पाला व मुळ्याच्या चकत्या घालाव्या व परतून घ्यावे. परतत राहिल्यावर थोड्या वेळात भाजीला पाणी सुटेल ते पाणी पूर्णपणे आटून भाजी कोरडी झाल्यावर चवीनुसार मीठ घालावे व परतून घ्यावे. यात बेसनाचे पीठ घालून नीट परतून घ्यावे, बेसनाच्या गाठी होण्याची शक्यता असते तेव्हा काळजी घ्यावी व नीट एकजीव करून घ्यावे व हलवत रहावे नाहीतर बेसन खाली कढईच्या बुडाला चिकटते. साधारण ८ ते १० मिनिटांत आच बंद करावी व ही भाजी तोंडलावाणी म्हणून सर्व्ह करावी.
नवलकोलचे थालीपीठ
साहित्य. एक नवलकोलचा पाल्यासह गड्डा (कांदा), दोन वाट्या ज्वारीचे पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ,एक कांदा (चिरून) (ऐच्छिक ),चवीनुसार लाल तिखट व मीठ, हळद, हिंग व गरजेनुसार तेल.
कृती. प्रथम नवलकोलचा गड्डा किसणीवर किसून घ्या व त्यात चवीनुसार तिखट ,मीठ व थोडीशी हळद आणि हिंग घालून मुरत ठेवा. मग आता नवलकोलचा पाला बारीक चिरून व धुवून घ्या .
एका परातीत नवलकोलचा कीस व बारीक चिरून ठेवलेला पाला घ्या त्या ज्वारीचे व बेसन पीठ आणि एल टेबलस्पून तेल घाला व आवश्यक वाटल्यास थोडेसे पाणी घालून थालीपीठासाठी घट्ट पीठ भिजवून घेऊन भाकरीसाठी घेतो तेव्हाध्या आकाराचे गोळे करून ठेवा. एका तव्यावर एक चमचा तेल घालून त्यावर एक गोळा ठेवून हाताने ठापून थालीपीठ लावून घ्या त्यावर बोटाने मध्यभागी एक व थोड्या अंतरावर चार भोके पाधू घेऊन त्यात चांच्याने तेल सोडा. थालीपीठाच्या गोलाकार कडेने सुद्धा तेल सोडा व गॅसवर तवा ठेऊन वर ताटाने झाका. दोन मिनिटांनी झाकण काढून थाळीथ उलटून दुसरी बाजू भाजून घ्या. लोणी, दही किंवा खाराच्या मिरच्या अथवा आंब्याच्या लोणच्या सोबत सर्व्ह करा.
नवलकोलची भाजी
साहित्य. २ मध्यम आकाराचे नवलकोल, फोडणीसाठी: १ टेस्पून तेल, २ चिमटी मोहरी, २ चिमटी जिरे, १/४ टिस्पून हळद, २ ते ३ कढीपत्ता, २ हिरवी मिरची, २ टेस्पून ताजा नारळ, १/२ टिस्पून साखर किंवा चवीनुसार, चवीपुरते मीठ.
कृती. नवलकोल सोलून मध्यम आकाराचे चौकोनी तुकडे करावेत. पॅनमध्ये तेल गरम करून मोहरी, जिरे, हळद, कढीपत्ता व मिरची घालून फोडणी करावी. नवलकोल फोडणीस टाकावा आणि थोडे मिठ घालावे. झाकण ठेवून नवलकोल शिजू द्यावा. मधेमधे थोडे पाणी शिंपडावे म्हणजे नवलकोल शिजायला मदत होईल व करपणार नाही. किंवा पाण्याचे ताट पॅनवर ठेवून नवलकोल शिजवावा. नारळ आणि साखर घालून दोन मिनीटे परतावे. कोथिंबीरीने सजवून पोळीबरोबर सर्व्ह करावी.
टीप. पाणी थोडे थोडे शिंपडावे, एकदम खुप पाणी ओतू नये. चव बिघडते.
नवलकोलची भजी
साहित्य. नवलकोलचा एक गड्डा,तीन टेबलस्पून बेसन/चणा डाळीचे पीठ,चवीनुसार लाल मिरचीचे तिखट व मीठ,हिंग,हळद,जिरेपूड,आवडत असेल तर चिमूटभर ओवा,तळणीसाठी आवश्यक तेल
कृती. नवलकोलच्या गड्याचे पातळ काप काढून घेऊन ते मियहाच्या पाण्यात घालून मायक्रोवेव्हमध्ये ठेऊन वाफवून घ्या. एका तसराळयात बेसन/चणा डाळीचे पीठ घेऊन त्यात चवीनुसार लाल मिरचीचे तिखट व मीठ, हिंग, हळद, जिरेपूड, आवडत असेल तर चिमूटभर ओवा आणि थोडे थोडे पाणी घालत भज्याप्रमाणे पीठ हिजवून ठेवा. गॅसवर एका कढईत तेल तापत ठेवा. तेल तापल्यावर भाज्यांसाठी भिजवलेल्या बेसनच्या पिठात, मिठाच्या पाण्यात वाफावलेले नवलकोलचे काप टाकून सगळीकडे बेसन पीठ लागल्याची खात्री करून तापलेल्या तेलात टाकून सोनेरी रंगावर भाजी तळून काढा
नवलकोलाची पचडी
साहित्य. दोन मध्यम आकाराचे कोवळे नवलकोल, अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट, पाव वाटी ओले खोबरे, कोथिंबीर, एक चमचा मिरचीचा ठेचा, चवीला मीठ, साखर, एक मोठा चमचा लिंबाचा रस, फोडणीसाठी एक मोठा चमचा तेल, मोहरी, हिंग, हळद, चिमूटभर मेथी पावडर.
कृती. नवलकोल मधोमध कापून दोन भाग करावेत. आपण नारळाची वाटी खवतो तसा नवलकोल खवून घ्यावा. तेलाची फोडणी करावी. त्यात मिरचीचा ठेचा घालून परतून घ्यावा. फोडणी आणि इतर सर्व वस्तू एकत्र करून कालवाव्या.
नवकोलचे लोणचे
साहित्य. एक मोठा नवलकोलचा गड्डा , पाव वाटी लिंबाचा रस,तीन टेबलस्पून केप्र चा लोणचे मसाला,अर्धी वाटी मीठ,एक टेबलस्पून लाल मीराचीचे तिखट,दोन डाव तेल,मोहरी,जिरे,हिंग व हळद
कृती. एका परातीत नवलकोलची साले काढून तो एकदम बारीक चिरून घ्या,त्यात मीठ व तिखट घालून हाताने मिक्स करून घेऊन एका स्वच्छ कोरड्या काचेच्या बाटलीत भरून , त्यात लिंबाचा रस घालून चमच्याने हलवून मिक्स करून ठेवा. दुसर्याक दिवशी गॅसवर एका कढल्यात तेल तापवून घ्या व त्यात मोहरी,जिरे,हिंग व हळद घालून फोडणी तयार करून ठेवा व ती फोडणी थंड झाल्यावर बाटलीत भरलेल्या लोणच्यावर घालून चमच्याने मिक्स करा.
नवलकोलाचा काश्मिरी रस्सा
साहित्य. चार मध्यम आकाराचे कोवळे नवलकोल पाल्यासकट, तेल, हिंग, बडीशोप (भाजून बारीक केलेली) पूड १ चमचा, शहाजिरे पूड १/२ चमचा, दोन तीन लाल सुख्या मिरच्या, चवीला मीठ, एक मोठा टॉमटो बारीक चिरून.
कृती. चिमुटभर हिंग पाण्यात कालवून ठेवा. नवलकोलाची पाने बारीक चिरून घ्या.मुळाकडील भाग काढून नवलकोलाची साले काढून आतल्या गराचे आडवे पातळ तुकडे करून घ्या. कढईत एक चमचा तेल घाला,गरम झाल्यावर त्यात नवलकोलचे तुकडे लालसर होईपर्यंत परतून घ्या,नंतर बारीक चिरलेली नवलकोलाची पणे घालुन परता. मंद आच करून त्यात हिंगाचे पाणी, मिरच्या, बडीशोप पूड, मीठ घालून परत परता, बारीक चिररलेला टॉमटो व दोन कप पाणी घालुन मंद आचेवर पंधरा मिनीटे शिजवा. वाढताना वरून शहाजिरे पूड घालून वाढा. हा रस्सा भाताबरोबरच खायचा असतो.
नवलकोलचा हलवा
साहित्य. एक गड्डा कोवळा नवलकोल,साजूक तूप एक डाव,साखर एक वाटी, दूध एक कप,खवा १०० ग्रॅम,बेदाणे ,काजू पाकळ्या,केशराच्या चार काड्या.
कृती. नवलकोलची साले काढून किसून व मायक्रोवेवहमध्ये वाफवून घ्या. गॅसवर एका कढईत तूप तापवून घेऊन त्यात वाफावलेला नवलकोलचा कीस घालून सोनेरी रंगावर परतून घ्या व दूध घालून शिजवा. कीस शिजला की खवा घालून परता. आता साखर घालून परता. खवा व साखर एकजीव झाले व कीस घट्ट होत आला की त्यात केशर,काजू पाकळ्या व बेदाणे घालून उलथण्याने हालून एक वाफ काढून गॅस बंद करा.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
आजचा विषय नवलकोल