आजचा विषय केळफूल

केळफूल हे स्निग्ध, मधुर, तुरट, गुरू, कडसर, अग्निप्रदीपक, वातनाशक तसेच काही प्रमाणात उष्ण आहे. रक्तपित्त, कृमी, क्षय, कोड यावर ते गुणकारी आहे. आपल्या आहारात या केळफुलांचा वापर नक्कीच करू शकतो. बनाना फ्लॉवर म्हणजेच केळफूल आणून त्याची भाजी केली जाते. योग्य केळफूल निवडून चिरणे जरा किचकट व चिकित्सक काम आहे. परंतु, त्याचे पौष्टिक गुणधर्म जास्त महत्त्वाचे आहेत.

केळीचे रोप जेव्हा मोठे होते, तेव्हा त्याच्या मध्यभागातून एक दांडा फुटतो. या दांड्याच्या अग्रभागी लाल रंगाची फुले येतात व त्यांचे रूपांतर केळीत होते. केळ्याच्या एका घडात ३०० ते ४०० केळी तयार होतात. चंपाकदली, अमृतकदली, मर्त्यकदली, माणिक्यर कदली, लोटण, वेलची केळी, चंपाचिनी इत्यादी केळीच्या मुख्य जाती आढळतात. याशिवाय रंगभेदावरूनही केळीच्या जाती ठरतात.

केळफुलाचा उपयोग भाजी, कोशिंबिरीमध्ये, वाफवून किंवा कच्च्या स्वरूपातही खाल्ले जाते. केळफूल निवडताना ताजे, फॉर्म स्वरूपाचे निवडावे. केळफूल सोलताना हाताला तेल लावावे म्हणजे चिकटपणा व डाग राहत नाहीत. मोठ्या केळफुलांत लहान लहान फुलांच्या फण्या असतात. पूर्ण स्वरूपात या लहान फुलांचा वापर केला जातो. केळफुलाच्या बाहेरील जाड पाने काढून टाकतात. आतील लहान फुलांच्या फण्या बाहेर काढतात. प्रत्येक लहान फुलातील कडक दांडा व त्याच्या खालच्या बाजूला असलेला पांढरा पारदर्शक टोपीसारखा भाग काढून टाकतात; तो चिरला जात नाही व शिजत नाही. बाकी भाग स्वच्छ धुऊन चिरून घेतात. केळफुलातील गुणधर्मामुळे रक्त शुद्ध होते. केळफुलामुळे रक्तातील लोहाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. म्हणून ऍनिमियामध्ये उपयुक्त. इरिटेबल बॉवेल सिन्ड्रोमसारख्या आजारात केळफूल उपयुक्त असते. केळफुलामुळे प्रोजेस्टेरॉन हे संप्रेरक स्रवण्यास मदत होते. त्यामुळे मासिक पाळीमध्ये रक्तस्रावाचा जास्त त्रास होत नाही. जास्त रक्तस्राव होत असेल, तर केळफुले शिजवून दह्याबरोबर खाण्याचा सल्ला दिला जातो. केळफुलात जीवनसत्त्व "क,' "अ,' "ब,' "के' फॉस्फरस कॅल्शिअम व आयर्न भरपूर प्रमाणात आढळते. ब्रॉन्कायटिस व पेप्टिक अल्सरमध्ये केळफूल उपयोगी पडते. स्तनपान देणाऱ्या स्त्रियांमध्ये दूधनिर्मितीसाठी उपयोगी. चवीत बदल म्हणूनही केळफूल खावे. भरपूर तंतुयुक्त असल्याने मधुमेही लोकांनी केळफूल जरूर खावे. त्यामुळे पोटही भरते, चवीत बदल होतो व साखर लगेच वाढत नाही. आतड्यांचा, स्तनांचा कर्करोग टाळण्यासाठी आहारात केळफूल घ्यावे.

केळफुलाचा केशरयुक्त भाग कापून त्यात मिरपूड भरून ठेवावी व सकाळी ते केळफूल तुपात तळून खावे. त्याने श्वाूसविकार लवकर बरा होतो, असे वर्णन आयुर्वेदात केले आहे. सर्व वयोगटांसाठी केळफूल खाणे उत्तम. बलवृद्धीसाठी उपयुक्त.

केळफुलाची भाजी करतान केळफुलाची भाजी करताना केळफुलातील पुकेसर वेगळा काढून टाकावा. (फुलाच्या आजुबाजुचा फोलपटासारखा भाग व आतील जाडसर कावळा(केसर) काढून टाकावा.) केळ्फुल सोलून बारीक चिरावे. सोलताना हाताला थोडे तेल लावलं तर हात काळे होणार नाहीत. चिरताना सुरीला आणि हातालाही तेलाचे बोट लावा म्हणजे राप चढणार नाही. केळफूल चिरताना तुकडे आंबट ताकात टाकले तर त्यांचा रंग काळा पडत नाही. ( रात्रभर पाण्यात भिजवून ठेवले तर त्यातील चीक निघून जाईल.) केळफुलाच्या भाजीत काही जण डाळिंब्या, काळे वाटाणे, मुगाची डाळ पण घालतात.

केळफुलाचे काही पदार्थ
केळीच्या कालाची भाजी

(केळीच्या खुंटाची वरची सोपं काढून टाकल्यावर आत जो कोवळा गाभा राहतो, त्याला ‘काल’ असं म्हणतात. कालाची भाजी आयत्या वेळी करायला घेऊ नये. तसंच काल चिरताना आत दोर आहेत का पहावं. असल्यास ते काढून टाकावेत .)
साहित्य. केळीचा काल चार वाटया, भिजवलेली मुगाची डाळ अर्धी वाटी, तिखट अर्धा चमचा, गोडा मसाला, ओलं खोबरं, मीठ, गुळ, तेल, फोडणीचं साहित्य. कृती. केळीच्या आतला काल , गोल चकत्या काढून पुन्हा बारीक चिरावा. तो पाण्यात टाकावा. दोन-तीन वेळा पाण्यातून चांगला चोळून, धुवून घ्यावा. म्हणजे राप निघून जाईल. घट्ट पिळून त्याला हळद चोळून काही तास दाबून ठेवून द्यावं. त्यानंतर फोडणी करून त्यात भिजवलेली मुगाची डाळ व चिरलेला काल टाकून वाफ आणावी. गरज वाटल्यास पाण्याचा हबका मारून डाळ व भाजी नीट शिजू दयावी. त्यानंतर तिखट, गोडा मसाला, चवीनुसार गुळ, मीठ घालून एक-दोन वाफा आणाव्यात. वरून ओलं खोबरं घालावं.

केळफुलाचे कटलेट
साहित्य : केळफूल निवडून, बारीक चिरून, ५ चमचे तेल, १ मोठा बटाटा उकडून, अर्धा गाजर बारीक चिरून, गव्हाचा ब्रेड - २ स्लाईस, आले, लसूण, मिरची पेस्ट, धने, जिरे पूड, मीठ.

कृती : चिरलेल्या केळफुलाला कुकरमध्ये हळद व मीठ घालून छान वाफ आणावी. वाफवल्यावर पाणी काढून टाकावे. वाफवलेले केळफूल हाताने बारीक करून त्यात गाजर व उकडलेला बटाटा कुस्करून घालावा. आले, मिरची, लसूण पेस्ट, मीठ, धने-जिरे पूड घालावी. ब्रेडचा बारीक चुरा घालून मळून घ्यावे. गोल चपटे कटलेट तव्यावर तेल टाकून खमंग भाजावेत व गरम गरम सर्व्ह करावेत. बरोबर सॉस अथवा हिरवी चटणी छान लागते. चविष्ट , फायबरयुक्त, करण्यास सहज सोपा पदार्थ.

केळफुलाची भाजी
साहित्य : केळफूल निवडून चिरून, अर्धी वाटी बारीक चवळी ८ ते १० तास भिजवून, ओले खोबरे, कोथिंबीर, १ कांदा बारीक चिरून, चिंच, मीठ, धने-जिरे पूड, फोडणीसाठी तेल, मोहरी, लाल ओली मिरची २, लाल तिखट १ चमचा, काळा मसाला १ चमचा, गूळ चवीप्रमाणे.

कृती : केळफूल निवडून, धुऊन, बारीक चिरून घ्यावे. कुकरमध्ये २,३ चिंचेचे बुट्टके घालून केळफूल वाफवावे. भिजलेली चवळी कुकरमध्ये वेगळी वाफवावी. केळफुलातील पाणी काढून टाकावे. पातेल्यात फोडणी करून कांदा परतावा व लाल मिरची/ लाल तिखट घालावे. केळफूल व वाफवलेली चवळी घालून परतावे. चवीप्रमाणे धने-जिरे पूड, काळा मसाला, गूळ, मीठ, खोबरे, कोथिंबीर घालून परतावे. झाकण ठेवून एक वाफ आणावी.

केळफुलाचे अप्पे
साहित्य : १ वाटी बारीक चिरलेलं केळफूल, १ वाटी बारीक रवा, १ वाटी दही, १ मोठा चमचा बेसन, २ मोठे चमचे मोहरी, हिंग, हळद घातलेली तेलाची फोडणी, प्रत्येकी १ चमचा तीळ आणि लसूण-मिरची ठेचा, चवीला मीठ, साखर, पाव वाटी कोमट पाणी, १ चमचा इनो फ्रूट सॉल्ट. कृती : चिरलेलं केळफूल कुस्करावं. एक मोठा चमचा फोडणी वगळून इतर सर्व जिन्नस एकत्र करावेत, नॉन स्टीक अप्पेपात्रात थेंब थेंब चमचा फोडणी घालून त्यात पीठ घालावं, झाकण ठेवून ४ मिनिटांनी अप्पे उलटावे. परत थोडीथोडी फोडणी घालून दुसरी बाजू भाजावी.

केळफुलाचे वडे
साहित्य : बारीक चिरलेले एक वाटी केळफूल, एक वाटी तांदळाचे पीठ, एक वाटी कणिक, एक लहान पळी मोहनासाठी तेल, एक चमचा साखर, दोन चमचे धने-जिरे पावडर, एक चमचा लाल तिखट, तळण्यासाठी तेल. कृती : केळफूल वाफवून घ्यावे. सर्व साहित्य एकत्र करून पीठ मळावे व थापून वडे तळावेत. टीप : पीठ मळताना थोडे पाणी घालावे. पिठाचे प्रमाणे थोडे कमी-जास्त झाले तरी चालेल. संजीव वेलणकर पुणे
केळफुलाचे उपवासाचे कटलेट
साहित्य : बारीक चिरलेले व वाफवलेले एक वाटी केळफूल, दोन उकडलेले बटाटे, एक वाटी सुरणाचा वाफवलेला कीस, अर्धा चमचा जिरेपूड, एक चमचा साखर, एक चमचा लाल तिखट, शिंगाडय़ाचे पीठ एक वाटी, थोडेसे तेल किंवा तूप. कृती : सर्व साहित्य एकत्र करून पीठ मळावे व आवडीच्या आकाराचे कटलेट बनवून तव्यावर तेल किंवा तूप सोडून शॅलो फ्राय करावे
संजीव वेलणकर पुणे
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३

आजचा विषय केळफूल

केळफूल हे स्निग्ध, मधुर, तुरट, गुरू, कडसर, अग्निप्रदीपक, वातनाशक तसेच काही प्रमाणात उष्ण आहे. रक्तपित्त, कृमी, क्षय, कोड यावर ते गुणकारी आहे. आपल्या आहारात या केळफुलांचा वापर नक्कीच करू शकतो. बनाना फ्लॉवर म्हणजेच केळफूल आणून त्याची भाजी केली जाते. योग्य केळफूल निवडून चिरणे जरा किचकट व चिकित्सक काम आहे. परंतु, त्याचे पौष्टिक गुणधर्म जास्त महत्त्वाचे आहेत.

केळीचे रोप जेव्हा मोठे होते, तेव्हा त्याच्या मध्यभागातून एक दांडा फुटतो. या दांड्याच्या अग्रभागी लाल रंगाची फुले येतात व त्यांचे रूपांतर केळीत होते. केळ्याच्या एका घडात ३०० ते ४०० केळी तयार होतात. चंपाकदली, अमृतकदली, मर्त्यकदली, माणिक्यर कदली, लोटण, वेलची केळी, चंपाचिनी इत्यादी केळीच्या मुख्य जाती आढळतात. याशिवाय रंगभेदावरूनही केळीच्या जाती ठरतात.

केळफुलाचा उपयोग भाजी, कोशिंबिरीमध्ये, वाफवून किंवा कच्च्या स्वरूपातही खाल्ले जाते. केळफूल निवडताना ताजे, फॉर्म स्वरूपाचे निवडावे. केळफूल सोलताना हाताला तेल लावावे म्हणजे चिकटपणा व डाग राहत नाहीत. मोठ्या केळफुलांत लहान लहान फुलांच्या फण्या असतात. पूर्ण स्वरूपात या लहान फुलांचा वापर केला जातो. केळफुलाच्या बाहेरील जाड पाने काढून टाकतात. आतील लहान फुलांच्या फण्या बाहेर काढतात. प्रत्येक लहान फुलातील कडक दांडा व त्याच्या खालच्या बाजूला असलेला पांढरा पारदर्शक टोपीसारखा भाग काढून टाकतात; तो चिरला जात नाही व शिजत नाही. बाकी भाग स्वच्छ धुऊन चिरून घेतात. केळफुलातील गुणधर्मामुळे रक्त शुद्ध होते. केळफुलामुळे रक्तातील लोहाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. म्हणून ऍनिमियामध्ये उपयुक्त. इरिटेबल बॉवेल सिन्ड्रोमसारख्या आजारात केळफूल उपयुक्त असते. केळफुलामुळे प्रोजेस्टेरॉन हे संप्रेरक स्रवण्यास मदत होते. त्यामुळे मासिक पाळीमध्ये रक्तस्रावाचा जास्त त्रास होत नाही. जास्त रक्तस्राव होत असेल, तर केळफुले शिजवून दह्याबरोबर खाण्याचा सल्ला दिला जातो. केळफुलात जीवनसत्त्व “क,’ “अ,’ “ब,’ “के’ फॉस्फरस कॅल्शिअम व आयर्न भरपूर प्रमाणात आढळते. ब्रॉन्कायटिस व पेप्टिक अल्सरमध्ये केळफूल उपयोगी पडते. स्तनपान देणाऱ्या स्त्रियांमध्ये दूधनिर्मितीसाठी उपयोगी. चवीत बदल म्हणूनही केळफूल खावे. भरपूर तंतुयुक्त असल्याने मधुमेही लोकांनी केळफूल जरूर खावे. त्यामुळे पोटही भरते, चवीत बदल होतो व साखर लगेच वाढत नाही. आतड्यांचा, स्तनांचा कर्करोग टाळण्यासाठी आहारात केळफूल घ्यावे.

केळफुलाचा केशरयुक्त भाग कापून त्यात मिरपूड भरून ठेवावी व सकाळी ते केळफूल तुपात तळून खावे. त्याने श्वाूसविकार लवकर बरा होतो, असे वर्णन आयुर्वेदात केले आहे. सर्व वयोगटांसाठी केळफूल खाणे उत्तम. बलवृद्धीसाठी उपयुक्त.

केळफुलाची भाजी करतान केळफुलाची भाजी करताना केळफुलातील पुकेसर वेगळा काढून टाकावा. (फुलाच्या आजुबाजुचा फोलपटासारखा भाग व आतील जाडसर कावळा(केसर) काढून टाकावा.) केळ्फुल सोलून बारीक चिरावे. सोलताना हाताला थोडे तेल लावलं तर हात काळे होणार नाहीत. चिरताना सुरीला आणि हातालाही तेलाचे बोट लावा म्हणजे राप चढणार नाही. केळफूल चिरताना तुकडे आंबट ताकात टाकले तर त्यांचा रंग काळा पडत नाही. ( रात्रभर पाण्यात भिजवून ठेवले तर त्यातील चीक निघून जाईल.) केळफुलाच्या भाजीत काही जण डाळिंब्या, काळे वाटाणे, मुगाची डाळ पण घालतात.

केळफुलाचे काही पदार्थ
केळीच्या कालाची भाजी

(केळीच्या खुंटाची वरची सोपं काढून टाकल्यावर आत जो कोवळा गाभा राहतो, त्याला ‘काल’ असं म्हणतात. कालाची भाजी आयत्या वेळी करायला घेऊ नये. तसंच काल चिरताना आत दोर आहेत का पहावं. असल्यास ते काढून टाकावेत .)
साहित्य. केळीचा काल चार वाटया, भिजवलेली मुगाची डाळ अर्धी वाटी, तिखट अर्धा चमचा, गोडा मसाला, ओलं खोबरं, मीठ, गुळ, तेल, फोडणीचं साहित्य. कृती. केळीच्या आतला काल , गोल चकत्या काढून पुन्हा बारीक चिरावा. तो पाण्यात टाकावा. दोन-तीन वेळा पाण्यातून चांगला चोळून, धुवून घ्यावा. म्हणजे राप निघून जाईल. घट्ट पिळून त्याला हळद चोळून काही तास दाबून ठेवून द्यावं. त्यानंतर फोडणी करून त्यात भिजवलेली मुगाची डाळ व चिरलेला काल टाकून वाफ आणावी. गरज वाटल्यास पाण्याचा हबका मारून डाळ व भाजी नीट शिजू दयावी. त्यानंतर तिखट, गोडा मसाला, चवीनुसार गुळ, मीठ घालून एक-दोन वाफा आणाव्यात. वरून ओलं खोबरं घालावं.

केळफुलाचे कटलेट
साहित्य : केळफूल निवडून, बारीक चिरून, ५ चमचे तेल, १ मोठा बटाटा उकडून, अर्धा गाजर बारीक चिरून, गव्हाचा ब्रेड – २ स्लाईस, आले, लसूण, मिरची पेस्ट, धने, जिरे पूड, मीठ.

Author