आजचा विषय घोसाळे

घोसाळे ही भाजी फार प्राचीन असून मूळची भारतातीलच आहे. घोसाळ्याला गिलके असेही म्हणतात.
गर्द हिरव्या रंगाची त्वचेवर काळसर ठिपके असलेली आकाराने लांबट गोल असलेली घोसाळे ही भाजी आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहे. संपूर्ण जगभरात हिचे उत्पन्न घेतले जाते. भारत, इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाइन्स व कॅरिबियन बेटे, अमेरिका या सर्व देशांमध्ये घोसाळ्याची लागवड पुष्कळ प्रमाणात केली जाते. घोसाळे हे पीक घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची जमीन चालते. घोसाळे वेलीवर येतात. हा वेल खूप पसरतो म्हणून तो मांडवावर चढवतात. मांडवावर चढवल्यामुळे घोसाळी चांगली येतात. मराठीत घोसाळे, इंग्रजीत र्श्ीषषर (लुफा), संस्कृतमध्ये स्वादुकोष्टकी तर शास्त्रीय भाषेत झरेंश्रर किंवा कुकुमिस एॅक्युफगुंलसलिन या नावाने ओळखले जाते.
घोसाळ्याचे औषधी गुणधर्म
घोसाळ्यामध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, आद्र्रता ब व क जीवनसत्त्व, पिष्टमय व तंतूमय पदार्थ, कॅरोटीन, रिबोफ्लेविन, नायसिन, प्रथिने, खनिजे भरपूर प्रमाणात असतात. आयुर्वेदानुसार घोसाळे ही अग्नीदीपक, शीतल, मधुर गुणात्मक व कफकारक असतात.
घोसाळ्यामध्ये कमी उष्मांक असल्याने लठ्ठपणा असणाऱ्या व्यक्तींनी आहारामध्ये घोसाळ्याची भाजी भरपूर वापरावी यामुळे पोट भरल्याची भावनाही होते व वजन आटोक्यात राहते.
रक्तदाब, हाय कोलेस्टोरॉल, हृदयरोग, मधुमेह हे विकार असणाऱ्या रुग्णांनी आहारामध्ये घोसाळे आवर्जून वापरावे. कारण उष्मांक कमी व तंतूयुक्त पदार्थ जास्त असल्यामुळे वरील सर्व आजार आटोक्यात राहतात. म्हणून घोसाळ्याचा आयुर्वेदामध्ये पथ्यकर भाजी म्हणून उल्लेख केला जातो.
अंगाचा दाह होत असेल तर घोसाळ्याचा रस त्वचेला लावावा. त्वचेला थंडावा निर्माण होऊन दाह कमी होतो. अपचन, आम्लपित्त या विकारांमध्ये घोसाळ्याची भाजी खावी. सांध्याच्या ठिकाणी सूज आली असेल किंवा पाय, हात मुरगळला असेल तर घोसाळ्याच्या पानांचा कल्क करून त्यात थोडे गोमूत्र घालून पुरचुंडी बांधावी व ही पुरचुंडी गरम करून दुखावलेल्या भागावर बांधावी. असे केल्याने त्या ठिकाणाची सूज ओसरते.
घोसाळ्याच्या पानाचा कल्क करून त्यात पाणी टाकून स्वरस काढावा व हा स्वरस साजूक तूपात घालून ते तूप स्वरस आटेपर्यंत शिजवावे व त्यानंतर गाळून डब्यात भरून ठेवावे व हे तूप अंगावरील जुन्या जखमा, फुटलेले बेंड, उष्णता वाढून झालेल्या जखमा, तोंड येणे या सर्व विकारांवर लावावे. यामुळे जखमा लवकर भरून येतात.
जुलाब होत असतील तर घोसाळ्याच्या बिया ५-१ ग्रॅम घेऊन ताकामध्ये बारीक करून ते ताक प्यावे घोसाळ्याच्या ताज्या पानांचा २ थेंब रस डोळे आले असल्यास डोळ्यात घालावा यामुळे डोळ्यांची उष्णता कमी होऊन आग थांबते.
घोसाळी, जास्वंद, ब्राह्मी, माका, वडाच्या पारब्या घालून खोबरेल व तीळ तेल उकळावे. यामधून तयार झालेले खोबरेल तेल केसांच्या मुळाशी लावल्यास केस पिकणे व गळणे थांबते.
परिपक्व झालेल्या घोसाळ्याचा आतील रेषायुक्त जाळीदार भाग हा अंघोळीसाठी तसेच भांडी घासण्यासाठी, सफाई करण्यासाठी वापरता येतो. सावधानता घोसाळी ही अग्नीदीपक पाचक असल्याने सहसा शरद ऋतूत जास्त प्रमाणात खाऊ नयेत. कारण त्याच्या सेवनाने अधिकच पित्त प्रकोप होऊ शकतो.
घोसाळ्याचे काही पदार्थ.
घोसाळ्याचे भरीत
साहित्य. ४-५ घोसाळी, एक कांदा,५-६ लसणाच्या पाकळ्या ,चवीनुसार २-३ हिरव्या मिरच्या ,हळद, चवीनुसार मिठ, आल्याचा छोटा तुकडा,७-८ कढीपत्त्याची पाने,फोडणीसाठी चिमूटभर हिंग, छोटा चमचा मोहरी, दोन चमचे दाण्याचे कुट.
कृती. प्रथम घोसाळी स्वच्छ धूऊन स्वच्छ पुसून वाफवून घ्यावीत. वाफवलेली घोसाळी गार झाल्यावर ती भरताच्या वांग्याप्रमाणे रगडून आवडी नुसार मिठ टाकून एक जिव करून घ्यावीत आणि त्यात एक ही गाठ राहणार नाही ह्याची दक्षता घ्यावी म्हणजे दाताखाली घोसाल्याची गाठ येणार नाही.
हिरव्या मिर्चा, लसुण, आणि आल्याचा तुकडा कढीपत्त्याची पाने ह्याची मिक्सर मधून बारिक पेस्ट करून घ्यावी, कांदा बारीक चिरून घ्यावा. गॅस वर कढईत फोडणीसाठी तेल टाकून तेल तापू द्यावे. त्यात कढिपत्त्ता तेल तापल्यावर प्रथम टाकावा , मग फोडणीचे सर्व जिन्नस (मोहरी, हिंग) टाकावे . तडतडत मोहरी फुटली की त्यात मिरची लसणाची पेस्ट टाकावी तीचा थोडा रंग बदलल्यावर कांदा घालावा. कांदा परततांना थोडाच लालसर होऊ द्यावा, हळद टाकावी, मग त्यात घोसाळ्याचा रगडा व दाण्याचे कुट घालून व्यवस्थित खाली वर परतून घ्यावे. गॅस कमी करून मंद आचेअवर ५ ते १ मिनिट ठेवावे (झाकण ठेवू नये). थोडी कोथिंबिर भुरभुरून खायला पोळी बरोबर अथवा पराठ्या बरोबर खायला घ्यावे.
खानदेशी घोसाळ्याचं भरीत
साहित्य. १/४ किलो घोसाळी, ४-५ हिरव्या मिरच्या, ४-५ लसूणपाकळ्या, अर्धी वाटी
चिरलेली कोथिंबीर, अर्धी वाटी चिरलेला कांदा, थोडी कांदापात, मीठ, तेल.
कृती. घोसाळ्याचे काप करून थोडया तेलावर वाफवून घ्यावेत. गरम असतानाच त्यात मीठ घालावं
व पळीनं हातून त्याचा लगदा करावा. लसूण व मिरची ठेचून बारीक करावी. कढईत तेल तापवून
मिरचीचा ठेचा व कांदा त्यात परतावा. त्यावर घोसाळ्याचा गर, कोथिंबीर व कांदापात घालून वाफ
येईपर्यंत परतावे.
घोसाळ्याची भजी
साहित्य. २ मोठी घोसाळी, २ वाटय़ा डाळीचे पीठ, १ डाव तांदळाचे पीठ, तिखट, मीठ, हळद, हिंग, २ ग्रम तेल.
कृती. घोसाळ्याचे गोल जरा जाडसर काप करावेत. डाळीच्या पिठात तांदळाचे पीठ, तिखट, मीठ, हळद, हिंग व डाव तेल गरम करून घालावे. पीठ पातळ किंवा दाट आवडीप्रमाणे करून घोसाळ्याचे काप त्यात बुडवून भजी तळावीत व गरम गरम खावीत.
भरलेले घोसाळे
साहित्य. मध्यम आकाराचे घोसाळे ४, शेंगदाण्याचा कूट-दीड वाटी, लाल तिखट-२ टी स्पून, हळद-१/२ टी स्पून, धनेपूड-१ टी स्पून, जिरे पूड-१/२ टी स्पून, चवीनुसार मीठ, गरजेनुसार तेल, चवीनुसार मीठ.
कृती. प्रथम एका बाउलमध्ये शेंगदाण्याचा कूट, लाल तिखट, हळद, धनेपूड, जिरेपूड व चवीनुसार मीठ एकत्र करून घ्यावे पुढे हाच मसाला आपल्याला वापरायचा आहे. आता एका घोसाळ्याचे ३ ते ४ असे सर्व घोसाळ्याचे तुकडे करून घ्यावेत व त्याना मधून काप द्यावेत म्हणजे त्यात मसाला नीट भरता येईल. वरील तयार मसाला ह्या घोसाळ्याच्या तुकड्यात नीट दाबून दाबून भरून घ्यावा ,मसाला भरतांना गीलक्याचे तुकडे तुटणार नाही याची काळजी घ्यावी. एक कढई तापत ठेवावी ,कढई तापली कि त्यात मसाला भरलेले घोसाळ्याचे तुकडे ठेवावेत यात वरून तेल टाकावे म्हणजे तेल मसाल्याताही जाईल व उलटताना मसाला खाली सांडणार नाही. यानंतर त्यावर पाण्याचा हबका मारून झाकण लावून ठेवावे ,साधारण ५ मिनिटांत पुन्हा एकदा पाण्याचा हबका मारून झाकण लावून ठेवावे व काही वेळाने हे तुकडे हलकेच उलटून घ्यावे व मंद आचेवर ५ ते ७ मिनिटे राहू द्यावे व आच बंद करावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३१७३३

Author