हिंदोळा

सुमनांजली या काव्यसंग्रहातून….. 



दिवस तुझे आलेरे आतां,
बाळा, दिवस तुझे आले रे. आतां,
झोपाळ्यावरी झुलायचे ।
झुलतां, झुलतां,
स्मृतींना सार्‍या स्मरायचे ।।धृ।।

बाल्य बाळाचे, सरले सारे सिन्नर ग्रामीं,
साधल्या सार्‍या, संधी-सुवर्ण, तेथेही नामी ।
वाणीनं लघवी, सकलां जवळ केले,
साथींत तयाच्या, मनीं, चांदणं फुले ।।
दिन कष्टाचे ते, सरले आतां,
आले क्षण, हसत-खेळत रमायचे ।।१।।

केलास तू, आटा-नि-पिटा, सार्‍या जिवाचा,
मार्ग शोधला, कष्टुनिया, चिरसौख्याचा ।
“मंगल”, मांगल्य, उभ्या जीवनीं लाभतां,
अमंगल सारे, दूर, दूर ते सरती ।।
शल्य हृदयी, न कसले आतां,
घेऊनि घटिका आल्या, क्षण सुखाचे ।।२।।

प्रेमभरे, विचारपूस, सार्‍यांची करुनि,
दिसा नि रातीं, मदतीसाठी, जाई धांवुनि ।
सकलांशी तो, अपुलाच “बाळ” वाटला,
हृदय-कोंदणी, हिरो कायम ठसला ।।
मार्ग श्रमांचा तो, सरला आतां,
आले दिनहे, हलके खिळायचे ।।३।।

गंध-गुलाब, येथे लाविले,
आप्त, तोषिले मनीं, अतुल-परिमळे ।
लाभो बाळां या आयु शतका शतकांचे,
बोल ठरविले खरे, या दास-गुरुचे ।।
काळ कांळा, बाळा, सरला आतां,
उरले दिन, सौख्य-सागरी डुंबायचे ।।४।।

-गुरुदास / सुरेश नाईक
१ डिसेंबर २००८
२०, काशिनाथ, घंटाळी, ठाणे

— सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास

Author