भारताची पहिली ‘वॉल’ विजय हजारे

विजय हजारे यांची कसोटी कारकीर्द काहीशी उशिरा म्हणजे ३१व्या वर्षी सुरू झाली. त्यामुळे त्यांच्या वाटयाला ३० कसोटी सामनेच आले. तरीही त्यांनी छाप पाडली.



भारताची पहिली ‘वॉल’ विजय हजारे यांचा जन्म ११ मार्च १९१५ रोजी झाला.

दुसऱ्या महायुद्धामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काही काळ खंड पडला होता. त्यामुळे विजय हजारे यांची कसोटी कारकीर्द काहीशी उशिरा म्हणजे ३१व्या वर्षी सुरू झाली. त्यामुळे त्यांच्या वाटयाला ३० कसोटी सामनेच आले. तरीही त्यांनी छाप पाडली.

विजय हजारे हे सी. के. नृायडू यांचे शिष्य होते. १९५१ ते १९५३ ते भारतीय क्रिकेट टीमचे कप्तान राहिले होते. ॲ‍डीलेड येथे १९४८ मध्ये डॉन ब्रॅडमन यांच्या संघासमोर त्यांनी दोन्ही डावांत शतके झळकवण्याचा पराक्रम केला. मिलर, लिंडवॉल, जॉन्सन यांच्या माऱ्यासमोर ही कामगिरी निश्चितच कौतुकास्पद होती. दोन्ही डावांत शतके झळकवणारे ते पहिलेच भारतीय फलंदाज आणि लागोपाठच्या दिवशी शतके झळकवणारे एकमेव फलंदाज! याही स्थितीत विजय हजारे यांनी ४७ची सरासरी दिली हे विशेष.

विजय हजारे यांचे १८ डिसेंबर २००४ रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

Author