भारताचे माजी सरन्यायाधीश यशवंत विष्णू चंद्रचूड

१९६१ साली त्यांची मुंबईच्या उच्च न्यायाधीशपदावर नियुक्ती झाली होती. २८ ऑगस्ट १९७२ रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशपदी यांची नेमणूक झाली.



भारताचे माजी सरन्यायाधीश यशवंत विष्णू चंद्रचूड यांचा जन्म १२ जुलै १९२० रोजी पुणे येथे झाला.

यशवंत विष्णू चंद्रचूड हे पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या कनेरसर गावचे. त्याचं शिक्षण पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात झालं. त्यानंतर त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्ट कॉलेजमधून पदवीचा अभ्यासक्रम पुर्ण केला. १९४२ साली ते पुण्याच्या ILS कॉलेजमधून LLB झाले.

१९६१ साली त्यांची मुंबईच्या उच्च न्यायाधीशपदावर नियुक्ती झाली होती. २८ ऑगस्ट १९७२ रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशपदी यांची नेमणूक झाली. यशवंत विष्णू चंद्रचूड यांनी सर्वाधिक काळ म्हणजे २२ फेब्रुवारी १९७८ पासून ११ जुलै १९८५ रोजी निवृत्त होईपर्यंत ७ वर्षे व ४ महिने सरन्यायाधीशपद भूषविले.

यशवंत विष्णू चंद्रचूड यांचे १४ जुलै २००८ रोजी निधन झाले.

Author