प्रेम (5) / प्रेम द्रव्य

प्रेम बाहेर शोधून मिळणार नाही. अहंकाराने ग्रासलेल्या आपल्या हृदयांची बंद कपाटे आपल्याला उघडावी लागतील – तेन्ह्वाच आपल्याला दिसेल – संपूर्ण चराचर सृष्टीमधे व्याप्त आहे फक्त एकच प्रेम दृव्य.



 आयुष्यभर त्याने प्रेमाचा शोध घेतला,तरीही तो कोरडाच राहीला.वर्तुळाचे दुसरे टोक सापडले आहे का कधी कुणाला?मोह-माया व वासनेच्या भोवऱ्यातच दडलेला आहे,प्रेमाचा अथांग महासागर.गरज आहे फक्त अहंकाराने ग्रासलेल्या हृदयांतील बंद कपाटे उघडण्याची. प्रेमाच्या उजेडात दिसेल जल-थल-नभ व संपूर्ण चराचर सृष्टीत व्याप्त आहे फक्त एकच प्रेम दृव्य.

— विवेक पटाईत

Author