शेतकऱ्याची आत्महत्या

शेतकऱ्याने आत्महत्या केली

सरकार दफ्तरात तो
एक 'आंकड़ा' झाला.

विरोधी पक्ष नेत्यांसाठी तो
विधानसभेत 'गोंधळाचा' विषय झाला.

मुख्यमंत्र्यांसाठी तो
मुआवजेची 'घोषणा' झाला.

वृतपत्र - वाहिनीं साठी तो
एक 'ज्वलंत समस्या' झाला.

माझा सारख्या कवींसाठी तो
कवितेचा 'कच्चामाल' झाला.

पण त्या बळीराजासाठी
एक अश्रु
कुणी ही नाही गाळला.

-- विवेक पटाईत



शेतकऱ्याने आत्महत्या केली

सरकार दफ्तरात तो
एक ‘आंकड़ा’ झाला.

विरोधी पक्ष नेत्यांसाठी तो
विधानसभेत ‘गोंधळाचा’ विषय झाला.

मुख्यमंत्र्यांसाठी तो
मुआवजेची ‘घोषणा’ झाला.

वृतपत्र – वाहिनीं साठी तो
एक ‘ज्वलंत समस्या’ झाला.

माझा सारख्या कवींसाठी तो
कवितेचा ‘कच्चामाल’ झाला.

पण त्या बळीराजासाठी
एक अश्रु
कुणी ही नाही गाळला.

— विवेक पटाईत

Author