मी तुझ्यात रे गुंतले
विसरले सारे काही…
तूच रे या मनमंदिरी
तुलाच भुलले नाही…
हा दैवयोग भाळीचा
कुठलाच संदेह नाही…
श्वासात गंधाळ तुझा
दरवळणे संपले नाही…
ही तृप्ती ओंजळीतली
आता कधी संपु नाही…
रचना क्र. ८९
२८/७/२०२३
-वि.ग.सातपुते.(भावकवी )
9766544908
Author
Post Views: 14