आळंदी हे पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, संत ज्ञानेश्वर यांचे समाधिस्थान आहे. या गावाला देवाची आळंदी असेही म्हणतात. हे शहर इंद्रायणी नदीच्या किनाऱ्यावर वसलेले असून, येथील ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर प्रेक्षणीय आहे. या मंदिराच्या मागील बाजूस असलेला घाट खूपच सुंदर आहे. १२९८ साली ज्ञानेश्वरांनी येथे जिवंत समाधी घेतली.
Author
Post Views: 62