ज्वारी व कापूस ही जिल्ह्यातील प्रमुख पिके असून काही भागात केळीचे पीकदेखील घेतले जाते. प्रामुख्याने किनवट तालुक्यातील जंगलांत बांबूची वने आहेत. नांदेड येथे कापूस संशोधन केंद्र आहे. जिल्ह्यात काळी कसदार मृदा मोठ्या प्रमाणात आढळते. या मातीत कॅल्शियम व नायट्रेटचे प्रमाण तसेच ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता जास्त असते.जिल्ह्यातील डोंगराळ भागात हलकी माती आढळते.
Author
Post Views: 12