गडचिरोली जिल्ह्याची भौगोलिक माहिती

गडचिरोली जिल्हा २६ ऑगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला. सध्या गडचिरोलीचे १२ तालुके आहेत, पण विभाजनापूर्वी या भागात गडचिरोली व सिरोंचा हे दोनच मोठे तालुके अस्तित्वात होते. अगदी अलीकडच्या काळापर्यंत हा भाग चंद्रपूरमध्येच समाविष्ट होता.



गडचिरोली जिल्हा २६ ऑगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला. सध्या गडचिरोलीचे १२ तालुके आहेत, पण विभाजनापूर्वी या भागात गडचिरोली व सिरोंचा हे दोनच मोठे तालुके अस्तित्वात होते. अगदी अलीकडच्या काळापर्यंत हा भाग चंद्रपूरमध्येच समाविष्ट होता. गडचिरोली जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या उत्तर-पूर्वेस असून आंध्र प्रदेश व छत्तीसगड राज्यांच्या सीमेलगत आहे. हा जिल्हा नक्षलग्रस्त आहे.
जिल्ह्याचे क्षेत्रफळ १४४१४ चौ.कि.मी आहे. या जिल्ह्याची लोकसंख्या ९,७०,२९४ आहे. जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी ७९.३६% भाग वनांनी व्यापला आहे. जिल्ह्यात कडक उन्हाळे व हिवाळे असतात.

Author