औरंगाबाद हा कृषिप्रधान जिल्हा आहे. जिल्ह्यातले एकूण ६,८९,८०० हेक्टर क्षेत्र लागवडीखाली येते, त्यातील जिरायती ५,३७,३०० हेक्टर आहे व १,५२,५०० हेक्टर क्षेत्र बागायती आहे.
बाजरी हे जिल्ह्यातील प्रमुख पीक असून ऊस हे ओलिताखालील महत्त्वाचे पीक आहे. याशिवाय कापूस, मूग, तूर, उडीद,सूर्यफूल व सोयाबीन ही पीकेदेखील घेतली जातात. त्याचबरोबर गहू, हरभरा, ज्वारी व सूर्यफूल ही पिके रब्बी हंगामात घेतली जातात.दौलताबाद येथील पेरू व सीताफळे महाराष्ट्रात प्रसिध्द आहेत.
जिल्ह्यात औरंगाबाद येथे फळ संशोधन केंद्र असून वैजापूर येथे ऊस संशोधन केंद्र आहे.