राहुरी हे अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. शहराचा साक्षरतेचा आलेख उल्लेखनीय आहे. सरासरी ७० टक्के लोक साक्षर आहेत. या शहरात असलेले महात्मा फुले कृषी विद्यापीठ देशभर प्रसिद्ध आहे. कृषी क्षेत्रातील अनेक गोष्टींवर येथे मोठ्या प्रमाणात संशोधन होते. देशभरातील अनेक विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात. प्रसिद्ध मुळा धरण येथून जवळ आहे.
Author
Post Views: 12