जेव्हा सगळेच हात सोडून जातात,
तेव्हा न बोलता सोबत उभा राहणारा हवा.
डोळ्यांतल्या न सांगितलेल्या अश्रूंना,
शब्दांविना समजून घेणारा हवा.
मनातल्या प्रत्येक जखमेवर,
मायेचा हलकासा स्पर्श करणारा हवा.
सुखाचे सोबती खूप भेटतात,
पण दुःखात सावली बनून राहणारा हवा.
जगाने पाठ फिरवली तरी,
“मी आहे” एवढंच सांगाणारा हवा.
जीवनाच्या कुरुक्षेत्रात जेव्हा
स्वतःशीच लढाई सुरू असते,
तेव्हा गीतेचा एक श्लोक बनून
मनात धैर्य जागवणारा हवा.
कधी मित्र बनून हसवणारा,
कधी गुरु बनून घडवणारा,
कधी आईच्या मायेचा स्पर्श,
तर कधी वडिलांच्या आधारासारखा वाटणारा हवा.
प्रेम म्हणजे फक्त मिळवणं नसतं,
हे अलगद समजवणारा हवा
स्वतःपेक्षा दुसऱ्याच्या आनंदात,
खरं सुख शोधायला शिकवणारा हवा.
म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यात,
एक कृष्ण नक्की भेटायला हवा…
जो नशिबात असो वा नसो,
पण हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात
विश्वास बनून कायम राहायला हवा.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212