जिथे ईश्वरालाही सोडून दिलं जातं.

जिथे ईश्वरालाही सोडून दिलं जातं,
तिथे माणसांनी साथ द्यावी अशी अपेक्षा कशाला?

दुःखात ज्याच्या दारी धाव घेतात,
सुखात त्यालाच मागे सोडून जातात,
जे ईश्वराशीही नातं निभावू शकत नाहीत,
त्यांच्याकडून कायमच्या सोबतीची अपेक्षा तरी कशाला?

इथे नात्यांनाही ऋतू असतात,
कधी फुलांसारखी बहरतात,
तर कधी पानांसारखी गळून जातात,
आणि काही चेहरे...
गरज संपताच अनोळखी होऊन जातात.

ज्यांना आपलं समजून जपलं,
तेच कधी दूर निघून गेले,
काही जखमा शब्दांनी दिल्या,
तर काही निःशब्द अंतरांनी दिल्या.

पण म्हणून तुटून जाऊ नका,
स्वतःला कुणासाठी हरवू नका,
कारण जिथे ईश्वरालाही सोडून दिलं जातं,
तिथे स्वतःची किंमत कमी लेखू नका.

एक दिवस आरशात स्वतःकडे पाहाल,
डोळ्यांत अनुभवांची चमक असेल,
आणि ओठांवर एक शांत हसू...
कारण सगळे सोडून गेले तरी,
तुम्ही स्वतःची साथ कधी सोडली नसेल.

•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212



जिथे ईश्वरालाही सोडून दिलं जातं,
तिथे माणसांनी साथ द्यावी अशी अपेक्षा कशाला?

दुःखात ज्याच्या दारी धाव घेतात,
सुखात त्यालाच मागे सोडून जातात,
जे ईश्वराशीही नातं निभावू शकत नाहीत,
त्यांच्याकडून कायमच्या सोबतीची अपेक्षा तरी कशाला?

इथे नात्यांनाही ऋतू असतात,
कधी फुलांसारखी बहरतात,
तर कधी पानांसारखी गळून जातात,
आणि काही चेहरे…
गरज संपताच अनोळखी होऊन जातात.

ज्यांना आपलं समजून जपलं,
तेच कधी दूर निघून गेले,
काही जखमा शब्दांनी दिल्या,
तर काही निःशब्द अंतरांनी दिल्या.

पण म्हणून तुटून जाऊ नका,
स्वतःला कुणासाठी हरवू नका,
कारण जिथे ईश्वरालाही सोडून दिलं जातं,
तिथे स्वतःची किंमत कमी लेखू नका.

एक दिवस आरशात स्वतःकडे पाहाल,
डोळ्यांत अनुभवांची चमक असेल,
आणि ओठांवर एक शांत हसू…
कारण सगळे सोडून गेले तरी,
तुम्ही स्वतःची साथ कधी सोडली नसेल.

•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212

Author