जग काय म्हणेल...
या एका विचाराने,
कितीतरी स्वप्नं जन्माआधीच मरून जातात...
कितीतरी हसू,
ओठांपर्यंत येऊन परत फिरतं...
कितीतरी मनं,
स्वतःसाठी जगायचं विसरून जातात...
सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करताना,
स्वतःच्या इच्छा मात्र
नेहमीच अपूर्ण राहतात...
पण एक प्रश्न स्वतःला नक्की विचार...
तू शेवटचं स्वतःसाठी कधी जगलास?
कधी मनसोक्त हसलास?
कधी आवडीचं गाणं ऐकत
वेळेचं भान विसरलास?
कधी स्वतःच्या मनाचा
एखादा छोटासा हट्ट पूर्ण केलास?
जर उत्तर "आठवत नाही..." असं असेल,
तर आता वेळ आली आहे...
स्वतःला पुन्हा भेटण्याची...
स्वतःवर पुन्हा प्रेम करण्याची...
आणि मनाला पुन्हा मुक्तपणे जगू देण्याची...
कारण...
आयुष्य फक्त जबाबदाऱ्या पेलण्यासाठी नसतं...
ते आनंद शोधण्यासाठीही असतं.
आयुष्य फक्त इतरांना खुश करण्यासाठी नसतं...
ते स्वतःच्या चेहऱ्यावरचं हसू जपण्यासाठीही असतं.
आयुष्य फक्त श्वास घेण्याचं नाव नाही...
तर प्रत्येक क्षण मनापासून जगण्याचं नाव आहे.
म्हणून...
लोक बोलतील...
आजही बोलतील...
उद्याही बोलतील...
पण ते तुमचं आयुष्य जगणार नाहीत.
मग त्यांच्या शब्दांचं ओझं
आपल्या स्वप्नांवर का ठेवायचं?
स्वतःसाठी जगा...
स्वतःवर प्रेम करा...
स्वतःचं मन जपा...
कारण...
जगाचं काय...?
ते कालही बोलत होतं...
आजही बोलतंय...
उद्याही बोलणारच...
पण तुमचं आयुष्य...
ते फक्त एकदाच मिळणार आहे.
म्हणून...
जग काय म्हणेल यापेक्षा,
तुमचं मन काय म्हणतंय ते ऐका...
कारण मनापासून जगलेलं आयुष्यच,
खऱ्या अर्थाने सुंदर आयुष्य असतं...
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
जग काय म्हणेल…
या एका विचाराने,
कितीतरी स्वप्नं जन्माआधीच मरून जातात…
कितीतरी हसू,
ओठांपर्यंत येऊन परत फिरतं…
कितीतरी मनं,
स्वतःसाठी जगायचं विसरून जातात…
सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करताना,
स्वतःच्या इच्छा मात्र
नेहमीच अपूर्ण राहतात…
पण एक प्रश्न स्वतःला नक्की विचार…
तू शेवटचं स्वतःसाठी कधी जगलास?
कधी मनसोक्त हसलास?
कधी आवडीचं गाणं ऐकत
वेळेचं भान विसरलास?
कधी स्वतःच्या मनाचा
एखादा छोटासा हट्ट पूर्ण केलास?
जर उत्तर “आठवत नाही…” असं असेल,
तर आता वेळ आली आहे…
स्वतःला पुन्हा भेटण्याची…
स्वतःवर पुन्हा प्रेम करण्याची…
आणि मनाला पुन्हा मुक्तपणे जगू देण्याची…
कारण…
आयुष्य फक्त जबाबदाऱ्या पेलण्यासाठी नसतं…
ते आनंद शोधण्यासाठीही असतं.
आयुष्य फक्त इतरांना खुश करण्यासाठी नसतं…
ते स्वतःच्या चेहऱ्यावरचं हसू जपण्यासाठीही असतं.
आयुष्य फक्त श्वास घेण्याचं नाव नाही…
तर प्रत्येक क्षण मनापासून जगण्याचं नाव आहे.
म्हणून…
लोक बोलतील…
आजही बोलतील…
उद्याही बोलतील…
पण ते तुमचं आयुष्य जगणार नाहीत.
मग त्यांच्या शब्दांचं ओझं
आपल्या स्वप्नांवर का ठेवायचं?
स्वतःसाठी जगा…
स्वतःवर प्रेम करा…
स्वतःचं मन जपा…
कारण…
जगाचं काय…?
ते कालही बोलत होतं…
आजही बोलतंय…
उद्याही बोलणारच…
पण तुमचं आयुष्य…
ते फक्त एकदाच मिळणार आहे.
म्हणून…
जग काय म्हणेल यापेक्षा,
तुमचं मन काय म्हणतंय ते ऐका…
कारण मनापासून जगलेलं आयुष्यच,
खऱ्या अर्थाने सुंदर आयुष्य असतं…
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
Post Views: 3