निवड क्षणाची, आवड आयुष्यभराची

निवडीचं बदलता येतं, आवडीचं जपायचं असतं...

निवडीचं बदलता येतं,
आवडीचं जपायचं असतं.
मनाच्या ओंजळीतलं स्वप्न,
जिवापाड फुलवायचं असतं.

रस्ते नवे, दिशा नव्या,
प्रवासही बदलत जातो.
पण मनाला भावलेला सहवास,
श्वासांतून जपला जातो.

काळ बदलतो, माणसं बदलतात,
परिस्थितीही नवी होते.
पण प्रेमाच्या त्या निरागस भावना,
कधीच जुन्या होत नाहीत.

संपत्तीचा हिशोब ठेवताना,
नात्यांचं मोल विसरू नये.
विश्वासाच्या एका धाग्याला,
स्वार्थासाठी तोडू नये.

निवड ही बुद्धीची असते,
आवड ही हृदयाची भाषा.
दोघांचा मेळ जिथे जमतो,
तिथेच फुलते सुखाची आशा.

म्हणून निवडी बदलल्या तरी,
मन कधी बदलू देऊ नका.
आवडलेल्या माणसांना आणि स्वप्नांना,
शेवटच्या श्वासापर्यंत जपा.

•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212



निवडीचं बदलता येतं, आवडीचं जपायचं असतं…

निवडीचं बदलता येतं,
आवडीचं जपायचं असतं.
मनाच्या ओंजळीतलं स्वप्न,
जिवापाड फुलवायचं असतं.

रस्ते नवे, दिशा नव्या,
प्रवासही बदलत जातो.
पण मनाला भावलेला सहवास,
श्वासांतून जपला जातो.

काळ बदलतो, माणसं बदलतात,
परिस्थितीही नवी होते.
पण प्रेमाच्या त्या निरागस भावना,
कधीच जुन्या होत नाहीत.

संपत्तीचा हिशोब ठेवताना,
नात्यांचं मोल विसरू नये.
विश्वासाच्या एका धाग्याला,
स्वार्थासाठी तोडू नये.

निवड ही बुद्धीची असते,
आवड ही हृदयाची भाषा.
दोघांचा मेळ जिथे जमतो,
तिथेच फुलते सुखाची आशा.

म्हणून निवडी बदलल्या तरी,
मन कधी बदलू देऊ नका.
आवडलेल्या माणसांना आणि स्वप्नांना,
शेवटच्या श्वासापर्यंत जपा.

•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212

Author