पर्यायांच्या चमकत्या दुनियेत

ज्यांच्या वाटेला अनेक चेहरे येतात,
त्यांना एका चेहऱ्याची ओढ नसते,
सहज मिळणाऱ्या सहवासामध्ये,
मनापासून जपणाऱ्यांची आठवण नसते.

ज्यांनी प्रत्येक दुःखात हात दिला,
त्यांच्याकडेच दुर्लक्ष होत जाते,
कारण पर्यायांच्या चमकत्या दुनियेत,
निस्वार्थ प्रेम हरवत जाते.

पण काळ सगळ्यांना शिकवतो,
गर्दी कायमची सोबत नसते,
लोक बदलतात, वाटा वळतात,
आणि माणसंही दूर निघून जातात.

मग उरतात काही आठवणी,
काही शब्द, काही हळवे क्षण,
आणि शोध सुरू होतो त्यांचा,
जे होते मनापासून आपले.

नाती ही पर्यायांनी नव्हे,
तर विश्वासाने जपायची असतात,
कारण जीव लावणारी माणसं
नशिबानेच भेटत असतात.

पर्यायांची गर्दी उद्या ओसरून जाईल,
वैभवाचाही रंग फिका पडेल,
पण प्रेमाने धरलेला एक हात,
शेवटपर्यंत साथ देत राहील.

•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212



ज्यांच्या वाटेला अनेक चेहरे येतात,
त्यांना एका चेहऱ्याची ओढ नसते,
सहज मिळणाऱ्या सहवासामध्ये,
मनापासून जपणाऱ्यांची आठवण नसते.

ज्यांनी प्रत्येक दुःखात हात दिला,
त्यांच्याकडेच दुर्लक्ष होत जाते,
कारण पर्यायांच्या चमकत्या दुनियेत,
निस्वार्थ प्रेम हरवत जाते.

पण काळ सगळ्यांना शिकवतो,
गर्दी कायमची सोबत नसते,
लोक बदलतात, वाटा वळतात,
आणि माणसंही दूर निघून जातात.

मग उरतात काही आठवणी,
काही शब्द, काही हळवे क्षण,
आणि शोध सुरू होतो त्यांचा,
जे होते मनापासून आपले.

नाती ही पर्यायांनी नव्हे,
तर विश्वासाने जपायची असतात,
कारण जीव लावणारी माणसं
नशिबानेच भेटत असतात.

पर्यायांची गर्दी उद्या ओसरून जाईल,
वैभवाचाही रंग फिका पडेल,
पण प्रेमाने धरलेला एक हात,
शेवटपर्यंत साथ देत राहील.

•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212

Author