स्वतःची इच्छा अपुरी राहिली,
म्हणून व्याकुळ होणारे अनेक भेटतात.
स्वप्नांच्या तुटलेल्या काचांवर
दररोज पाय ठेवत जगतात.
पण दुसऱ्याच्या डोळ्यांतील अपेक्षा
पूर्ण करता आली नाही म्हणून
मनात वेदना साठवणारा,
क्वचितच एखादा सापडतो.
स्वतःसाठी जगणे सोपे असते,
स्वतःच्या जखमा मोजणेही सहज.
पण दुसऱ्याच्या अश्रूंचे ओझे
आपल्या हृदयात वाहणं,
हीच खरी माणुसकी असते.
इच्छा, आकांक्षा, स्वप्नं
सगळ्यांनाच असतात.
पण दुसऱ्याच्या गरजेपुढे
स्वतःला विसरणारा
माणूसच खऱ्या अर्थाने मोठा ठरतो.
कारण,
स्वतःच्या अपूर्णतेने अस्वस्थ होणारे
जगात असंख्य असतात,
दुसऱ्याची इच्छा आणि गरज
पुरी करता आली नाही म्हणून
रात्रभर जागणारा…
एखादाच असतो.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212