समाधानाचा प्रसाद

देवदारी जे काही मिळे,
प्रसाद समजुनी हृदयी ठेवावे रे…

नको हाव अधिकाची कधी,
विश्वासातच सुख शोधावे रे…

ओंजळीतील ते थोडे दाणे,
कृपेचे खजिने जाणावे रे…

गोड-कडू हे जीवन सारे,
त्याचेच देणं मानावे रे…

डोळ्यांत येती कृतज्ञ अश्रू,
“हेच पुरे” मन म्हणावे रे…

समाधानाची ज्योत अंतरी,
नावात त्याच्या हरवावे रे…

•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212



देवदारी जे काही मिळे,
प्रसाद समजुनी हृदयी ठेवावे रे…

नको हाव अधिकाची कधी,
विश्वासातच सुख शोधावे रे…

ओंजळीतील ते थोडे दाणे,
कृपेचे खजिने जाणावे रे…

गोड-कडू हे जीवन सारे,
त्याचेच देणं मानावे रे…

डोळ्यांत येती कृतज्ञ अश्रू,
“हेच पुरे” मन म्हणावे रे…

समाधानाची ज्योत अंतरी,
नावात त्याच्या हरवावे रे…

•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212

Author