भारताची अंतर्गत सुरक्षा इतिहास आव्हाने कश्मीर, बागलादेशी घुसखोरी, दहशतवाद, आव्हाने चिंता ,उपाययोजना बॉर्डर सिक्युरिटी फोर्स भारत बंगलादेश सीमेचे रक्षण कसे करते? बंगलादेशी रोहिग्यांना अवैध मार्गाने जन्म प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांबरोबर आणि दलाला विरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. 5-6 कोटी बंगलादेशी भारतात घुसले आहेत आणी त्या करता अर्ध सैनिक दल बीएसएफ जबाबदार आहे.
काटेरी कुंपण तोडले जाणेः घुसखोर/तस्करांनी त्यांच्या कारवायांना अडथळा करणार्या सुरक्षा दलांना हाताळण्याचे अतिशय मौलिक उपाय शोधून काढले आहेत. ते काटेरी कुंपण काही ठिकाणी कापतात. लांबलचक काटेरी कुंपण काही ठिकाणी, सुरक्षा दलांच्या थेट निगराणीखाली नसलेल्या निर्मनुष्य भागांतूनही ते जात असते, आणि काटेरी तारेचे कुंपण कापले गेल्यास सुरक्षा दलांवर कारवाई केली जाते. अशामुळे सुरक्षादलांना एकतर तस्करांशी जुळवून घ्यावे लागते किंवा कर्तव्यात कुचराई केल्याखातरच्या कारवाईस तोंड द्यावे लागते.
गुन्हेगार-प्रशासन-पोलीस ह्यांच्यातील संगनमतः सीमावर्ती भागांत सीमापारची गुन्हेगारी; गुन्हेगार-प्रशासन-पोलीस ह्या त्रयींतील संगनमताचे आधारे फोफावत असते. अनधिकृत स्थलांतरित भारतात प्रवेश करण्यापूर्वीच काही महत्त्वाची कागदपत्रे जसे की रेशनकार्ड, गॅस कनेक्शनपत्र इत्यादी तयार करून त्यांच्या सुपूर्त केली गेलेली असतात; ज्यामुळे ते भारतीय नागरिक असल्याचे भासवले जाते आणि सीमेवर घेतल्या जाणार्या शोधातून ते सुटू शकतात. अशा अनधिकृत स्थलांतरितांना मग देशाच्या कुठल्याही भागात पोहोचण्यास मदत केली जाते. अशा प्रकारच्या संगनमताचे एक ठळक उदाहरण, भारतातून तस्करीने बांगलादेशात नेली जाणारी गुरे, बांगलादेश सीमेपर्यंत, पार मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, ओरिसा इत्यादी राज्यांतून आलेली असतात. नकली कागदपत्रांच्या आधारे आणि संबंधित तपासचौक्यांवरील कर्मचार्यांना लाच देऊन हे साधले जात असते. सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे साखर, गहू, तांदूळ तस्करीने सीमापार -भारताच्या बाजूच्या सीमाभागात सार्वजनिक वितरण व्यवस्था आहे. जिच्या द्वारे साखर, गहू, तांदूळ इत्यादी वस्तू गावकर्यांना सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिल्या जातात. सार्वजनिक वितरण व्यवस्थेची दुकाने सीमेपासून दूर, आतल्या भागांत असतात. गावकर्यांना ह्या वस्तू मात्र, गावातील लोकसंख्येनुसार, एकतर गोदामांतून किंवा स्थानिक विक्रेत्यांकरवी सीमेनजीकच्या गावांत आणून, विकल्या जात असतात. वाहतूक करणार्या विक्रेत्यास सीमा-सुरक्षा-दलास आवश्यकता पडल्यास; एक चिठ्ठी दाखवावी लागते, जिच्यात त्या सामानाचे वजन लिहिलेले असते.हे विक्रेते दिवसभरात अशा अनेक फेर्या करत असतात. गावातील लोकसंख्येला लागेल त्याहून कितीतरी अधिक शिधा ते कुंपणाच्या पलीकडे घेउन जातात. अशा प्रकारे वाहून नेलेले अतिरिक्त धान्य हे रात्रीच्या वेळी किंवा संधी मिळेल तसे, तस्करीने सीमापार नेले जात असते.
सीमापारचे नातेवाईक व नातेसंबंधः सिमा रक्षणाच्या शैथिल्यामुळे, सीमापारचे नातेसंबंध लग्नसंबंधांत परिणत होत असत आणि मग संबंधी आसामात, स्थिरस्थावर होतात. सीमाभागात कडक तपासणी सुरू झाल्यावर हे उत्तरोत्तर अवघड होत गेले. तरी आजही सीमापार जाऊन नातेवाईकांना भेटण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. भूमीचे कायदे लागू करण्यास पडणार्या मर्यादाः गुरेढोरे पळवणे, दरोडेखोरी, माणसे पळवणे, गुन्हेगारांना पळायला मदत करणे, स्त्रिया व मुलांचा व्यापार करणे इत्यादी, सीमापार येऊन केले जाणारे गुन्हे हे एक वास्तव आणि उपजीविकेचा भाग झालेले आहे.सीमेपार पळून जाणे सोपे असते.गुन्हा करून पळून जातात आणि कायद्याचा दबाव नाहीसा होईपर्यंत,बंगलादेशात सहानुभूतीदारांपाशी व नातेवाईकांपाशी आश्रय घेतात.
नैसर्गिक साधनसंपत्तीचे अपहरणः दोन्हीही देशांतील नागरिक, लाकूड, बांबू, चुनखडी इत्यादी, सीमाभागातील सीमापारच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचे अपहरण करत असतात. बांगलादेशात बांधकामांकरता दगड मिळत नाही. भारतात मिळतात. म्हणून त्यांची बांगलादेशात तस्करी केली जाते.
सीमेवरील गहाळ झालेले स्तंभः सीमेवर खुणेकरता प्रमुख, छोटे आणि किरकोळ स्तंभ उभारलेले असतात. सीमेवर तणाव निर्माण करण्याच्या उद्देशाने, गुन्हेगारी टोळ्यांकडून, काही वेळेला तेच चोरले जातात. ईशान्य भारतात गुन्हेगार, स्त्रिया आणि मुलांचा उपयोग तस्करीकरता, टेहळणीकरता, करत असतात. सीमेवर महिला पोलीस उपलब्धच नसतात. त्यामुळे स्त्रिया आणि मुलांना अटक केली जाऊ शकत नाही. गुन्हेगार लोक, ह्याचाच पुरा लाभ उठवत असतात. स्त्रियांना गैर-वर्तणुक दिली असे आढळून आल्यास सुरक्षा रक्षकांविरुद्ध कठोर कारवाई केली जाते. त्याचा स्त्रियाही गैरफायदा घेतांना दिसतात. त्या सुरक्षा दलांविरुद्ध खोट्या तक्रारीही करत असतात. त्यामुळे सुरक्षा रक्षक, स्त्रिया व मुलांना पकडण्यास नाखूश असतात. तक्रारींपश्चात दीर्घकाळ चालणार्या चौकशा, सुरक्षा दलांकरता प्रचंड तणावाचा स्त्रोत ठरतात.ईशान्य भारतातील सीमाभागांत महिलांची अर्ध सैनिक दलांत संख्या कमीत कमी ३०-३५% असली पाहीजे.
अमेरिका आणि मेकसिको यामधे इलेक्ट्रोनिक्स सर्वेलन्स फ़ेन्स(कुंपण) लावले आहे.असेचकुंपण बांगलादेश सीमेवर नदी आणि इतर सीमेवर जिथे घुसखोरी थांबवणे कठिण आहे त्यासीमेवर लावले पाहीजे. आज भारतामध्ये घुसखोरीच्या समस्येविरुद्ध लोकांना ज्ञान देण्याबाबत मोठे अभियान चालवण्याची गरज आहे. याखेरीज घुसखोरांविरुद्ध प्रचार करून नागरिकांना जागरूक करण्याची गरज आहे. प्रत्येक महिन्यात प्रत्येक गावात एक दिवस घुसखोरीविरुद्ध अभियान चालवले गेले पाहिजे.