खेळण्यांच्या मार्केटमधील भारतीय खेळण्यांचा वाटा दहा ते बारा टक्के एवढाच होता. बहुसंख्य खेळणी आपण चीनमधून आयात करत होतो. गेली तीस वर्षे आपण हे मार्केट चीनला बहाल केले होते.स्वस्तातील चिनी खेळण्यांची आपल्याला भुरळ पडते. आपण ती कोणताही विचार न करता खरेदी करतो. हे थांबवणे आपल्याच हातात आहे. मुलांसाठी भारतीय खेळणीच विकत घ्यायची, असा निर्धार आपण केला पाहिजे. तसे करणे ही देशाच्या हिताची कृती ठरेल.
स्वस्त किमतीमुळे चिनी खेळण्यांनी भारतीय बाजारावर कब्जा केला होता. पण, त्यांचा दर्जा अतिशय निकृष्ट होता. चिनी खेळण्यांत कनिष्ठ दर्जाचे प्लास्टिक व अन्य खराब कच्च्या मालाचा वापर केला जात असे. तथापि दर्जा नियंत्रण आदेश लागू झाल्याने असा माल भारतात येणे कमी झाले व देशांतर्गत उद्योगवाढीला संधी मिळाली.
खेळणी शरीरास अपायकारक स्वस्त आणि आकर्षक या दोनच गोष्टींमुळे चीनीखेळण्यांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असली तरी त्याचे आरोग्यावर घातक परिणाम होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. चायनीज खेळण्यांच्या आयातीला परवानगी नाही. असे असतानाही तस्करीमुळे ही खेळणी विक्री होत आहे. खेळणीवर होणारी प्रक्रिया पर्यावरणपूरक नसल्याने ती शरीरास अपायकारक आहे.
चायनीज वस्तू तोंडात घातल्याने त्यातील घातक रसायनांमुळे विषबाधा होण्यासह त्वचेलाही इजा पोहोचण्याची शक्यता असते. सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्न्मेंटने दिल्ली येथे घेतलेल्या 45 सॅम्पल्समध्ये 29 मध्ये विषारी पदार्थ आढळले.
चीनकडील ही आयात रोखण्यासाठी सरकारने या वर्षी फेब्रुवारीत खेळणी आयात शुल्कात 200 टक्केची वाढ केली होती. परंतु, खेळण्यांची आयात अजूनही सुरूच आहे. भारतीय खेळणीच विकत घ्यायची निर्धार खेळण्यांशिवाय बालपण असूच शकत नाही. यामुळेच भारतात पारंपरिक खेळणी रुजलेली दिसतात. भारतीय खेळण्यांना हजारो वर्षांची परंपरा आहे.भारतीय खेळणी उद्योगाची उलाढाल 10 हजार काेटी रुपये आहे. मात्र जागतिक खेळणी उद्याेगातील भारताचा वाटा आहे 0.5 टक्के आहे. यामुळे या बाजारपेठेत मुसंडी मारायला भारताला वाव आहे. मात्र आधी देशातील खेळण्यांच्या मार्केटकडे आपण लक्ष दिले पाहिजे. त्यातून हजारो कारागिरांचा रोजगार टिकून राहील.
भारतीय बाजारपेठेतून चिनी खेळणी हद्दपार करायला हवीत. भारतीय खेळणी थोडी महाग असली, तरी ती आम्ही खरेदी केली पाहिजेत. या कृतीतून आपल्याला देशभक्ती दाखवता येते. शैक्षणिक आणि वैज्ञानिक स्वरूपाच्या खेळण्यांना येत्या काही काळात चांगले दिवस येतील.पर्यावरणपूरक खेळण्यांची मागणीही वाढेल.गेम्स, पझल आणि ऑनबोर्ड गेम्सना जगभर नेहमीच मागणी असते.इलेक्ट्राॅनिक खेळण्यांचेही मोठे मार्केट आहे. पारंपरिक आणि आधुनिक अशी दोन्ही खेळणी मुलांना आवडतात. आणि हे लक्षात घेऊन लेगो या जगप्रसिद्ध खेळणी उत्पादक कंपनीने लाकडाच्या काही खेळण्यांचे रूपांतर इलेक्ट्राॅनिक खेळण्यांमध्ये केले. भारतीय उद्योजकांनाही हा कित्ता गिरवावा लागेल.
भारतीय खेळणी महोत्सव 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय खेळणी महोत्सव 2021 चे उद्घाटन केले होते. भारतातल्या खेळणी उत्पादकांनी पर्यावरणपूरक आणि मनस्वास्थ्याला अनुकूल अशी खेळणी बनवावित , लहान मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी खेळणी महत्त्वाची भूमिका निभावतात, भारतीय खेळणी महोत्सव 2021 हे आत्मनिर्भर भारताची निर्मिती आणि भारताच्या पुरातन परंपरा अधिक दृढ करण्याच्या दिशेनं टाकलेलं महत्वाचं पाऊल आहे, असे मोदी त्यावेळी म्हणाले होते.
खेळणी महोत्सव हा व्यावसायिक उपक्रम नसून भारताच्या पुरातन क्रिडा आणि खेळाच्या संस्कृतीचे बंध अधिक दृढ करायचा प्रयत्न आहे.भारताने जगाला बुद्धीबळासह अनेक आंतरराष्ट्रीय खेळ आणि क्रीडा प्रकार दिले आहेत. खेळणी उद्योग जगतात अफाट क्षमता दडलेली आहे. ही क्षमता आपण आत्मनिर्भर भारत अभियानाच्या माध्यमातून अधिक पटीनं वाढवू शकतो. तसेच भारतात तयार होणारी खेळणी ही परवडणाऱ्या दरात उपलब्ध होतात. ही खेळणी पर्यावरणपूरक उत्पादनांपासून बनवली असल्यामुळे ती सुरक्षीत असतात. प्राचीन काळामध्ये जेव्हा प्रवासी भारतात येत. तेव्हा ते भारतातील खेळ शिकत आणि खेळणी आपल्यासोबत घेऊन जात. विद्यार्थी, शिक्षक, कलाकार, विक्रेते, ग्राहकांना एका मंचावर एकत्रीत करण्याचा भारतीय खेळणी महोत्सवाचा उद्देश होता.
खेळणी बाजारातून चीनला हद्दपार करण्याची पूर्ण तयारी करण्यात या योजने द्वारे आली आहे,ज्याला यश मिळत आहे. भारताला केवळ देशातील बाजारावर नव्हे, तर जगातील बाजारात भारतीय खेळण्यांची छाप पहायची आहे. अशी खेळणी बनवावीत ज्यामध्ये एक भारत, श्रेष्ठ भारतची झलक असेल आणि खेळणी पाहून जगातील लोक भारतीय संस्कृती, पर्यावरणाबाबत भारताची गंभीरता आणि भारतीय मूल्ये समजू शकतील.यामुळे स्थानिक कारागीरांनी बनवलेल्या खेळण्यांना प्रोत्साहन मिळेल. मार्केट रिसर्च फर्म आयएमएआरसीनुसार भारतात खेळण्यांचा व्यापार 10,000 कोटी रूपयांचा आहे.
खेळण्यांच्या आयातीत सुमारे ७० टक्क्यांपर्यंत घट भारत प्रत्येक क्षेत्रात ‘आत्मनिर्भर’ होण्याच्या प्रयत्नात आहे. भारतात तब्बल ८० टक्क्यांपेक्षा अधिक खेळणी चीनमधून येत असत. तथापि, आता यात फार मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. देशात खेळणी उद्योग वेगाने फळू-फुलू लागला आहे. केवळ तीन वर्षांच्या अवधीत भारतात खेळण्यांच्या आयातीत सुमारे ७० टक्क्यांपर्यंत घट नोंदवण्यात आली आहे. इतकेच नव्हे, तर भारत आता अन्य देशांतही आपल्याकडे तयार केलेल्या खेळण्यांची निर्यात करत आहे.