महाबळेश्वर मोरजे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे जन्मलेल्या महाबळेश्वर मोरजे यांचे प्राथमिक शिक्षण वेंगुर्ला, हुबळी आणि पार्ल्यातील पार्ले टिळक विद्यालयात झाले. चर्चगेट येथील गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून ते १९६४ मध्ये एल.एल.एम. झाले. याशिवाय एम.कॉम. (कॉस्टिंग) ही पदवीही त्यांनी संपादन केली होती. त्यांनी लंडनच्या इन्शुरन्स व चार्टर्ड सेक्रेटरी या पदविका घेतल्या होत्या. ज्येष्ठ वकील आर. सी. बेलोसे, रामराव आदिक व न्या. जी. एन. वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वकिली व्यवसायाचे धडे घेतले. त्यांनी मुंबई, मराठवाडा आणि शिवाजी विद्यापीठांत अध्यापनाचे काम केले. जगभरातील फ्लॅटओनर्स व रेंट अॅक्ट याच्या शोधनिबंधाबद्दल त्यांना १९६७ मध्ये पुरस्कार मिळाला. त्यांनी कायद्याच्या अभ्यासानिमित्त लंडन, अमेरिका येथे दौरे केले. १९७८ मध्ये ते सरकारी वकील; तर १९८७ मध्ये बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा याचे सदस्य होते. 'आय लव्ह मुंबई' या समितीचे ते ट्रस्टी होते.

मुंबईचे माजी शेरीफ नाना चुडासामा व तत्कालिन राज्यपाल डॉ. पी. सी. अलेक्झांडर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी स्वच्छ मुंबई व तिच्या सुशोभीकरणासाठी प्रयत्न केले. पर्यावरण व वृक्षारोपण कामाबद्दलही त्यांचा गौरव झाला होता. महाराष्ट्र विधानसभा बरखास्ती, इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठान आणि आणीबाणीच्या काळातील खटल्यांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. हाऊसिंग पॉलिसी ऑफ इंडिया, पंचायत राज, एन्व्हायर्नमेंट लॉ आदी पुस्तके त्यांनी लिहिली. इंग्रजी-मराठी वृत्तपत्रांतून त्यांनी कायदेविषयक विपुल लेखन केले. जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या सुकथणकर कमिटीचे ते सदस्य होते.

मुंबईतील जुन्या चाळींचा प्रश्न व फ्लॅटओनर्सच्या समस्या हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. सामान्य माणसाचे फ्लॅटचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी १९८३ मध्ये फ्लॅट ओनर्स असोएशिनची स्थापना केली. सामान्यांची फसवणूक करणार्‍या बिल्डर व डेव्हलपर यांच्यावर महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅटओनर्स अॅक्टअंतर्गत कारवाई करण्यासाठी सरकारला कायदेविषयक मार्गदर्शन केले. मुंबईतील पार्किंगच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू होते. मुंबईकरांच्या न संपणार्‍या समस्यांचा कायद्याच्या दृष्टीने अभ्यास करणार्‍या या ज्येष्ठ कायदेतज्ज्ञाला मुंबई हायकोर्टाने त्यांच्या कर्तृत्वाचा बहुमान म्हणून सिनीअर कौन्सिलचा सन्मानही दिला होता.

(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे जन्मलेल्या महाबळेश्वर मोरजे यांचे प्राथमिक शिक्षण वेंगुर्ला, हुबळी आणि पार्ल्यातील पार्ले टिळक विद्यालयात झाले. चर्चगेट येथील गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून ते १९६४ मध्ये एल.एल.एम. झाले. याशिवाय एम.कॉम. (कॉस्टिंग) ही पदवीही त्यांनी संपादन केली होती. त्यांनी लंडनच्या इन्शुरन्स व चार्टर्ड सेक्रेटरी या पदविका घेतल्या होत्या. ज्येष्ठ वकील आर. सी. बेलोसे, रामराव आदिक व न्या. जी. एन. वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वकिली व्यवसायाचे धडे घेतले. त्यांनी मुंबई, मराठवाडा आणि शिवाजी विद्यापीठांत अध्यापनाचे काम केले. जगभरातील फ्लॅटओनर्स व रेंट अॅक्ट याच्या शोधनिबंधाबद्दल त्यांना १९६७ मध्ये पुरस्कार मिळाला. त्यांनी कायद्याच्या अभ्यासानिमित्त लंडन, अमेरिका येथे दौरे केले. १९७८ मध्ये ते सरकारी वकील; तर १९८७ मध्ये बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा याचे सदस्य होते. ‘आय लव्ह मुंबई’ या समितीचे ते ट्रस्टी होते.

Author