सरंजामशाही आणि जमीनदारशाहीच्या विरोधात बंडाचा झेंडा उभारून या दोन्ही शाह्या समूळ संपविण्याचा विडा उचलेल्या सर्वहारा वर्गाचे ते एकनिष्ठ पाईक असले तरी प्रत्यक्षात त्यांच्या घरातच दोन पिढय़ा अगोदपर्यंत या दोनही शाह्या सुखनैव नांदत होत्या. वडील राजनिष्ठ सेवक होते आणि विद्यार्थीदशेत अत्यंत आज्ञाधारक असलेला गंगाधर चिटणीस एकदम दुसऱ्या टोकाच्या विचारांचा गिरणी कामगारांच्या सुखदु:खाशी समरस होत गेला. हे अतक्र्य घडविले साने गुरूजींनी.
‘समाजासाठी आणि देशासाठी जगा’ हा साने गुरूजींचा संदेश त्यांनी आत्मसात केला आणि एका क्षणात सुखाची सरकारी नोकरी सोडून त्यांनी कामगारांशी आपले नाते जुळवले ते अखेपर्यंत! अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे येथे १९२७ मध्ये जन्म झालेल्या कॉ. गंगाधर चिटणीस यांचे शिक्षण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात झाले आहे.
सावंतवाडी, पुणे, मुंबई येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यावर ते पुण्याला गेले. गंगाधरचे वडील राजापेक्षा राजनिष्ठ असे होते. त्यांना आपल्या मुलानेही तसेच व्हावे असे वाटत होते. विद्रोही वातावरणापासून त्यांनी मुलांना कटाक्षाने दूर ठेवले असले तरी इंग्रजी पाचवीपर्यंत मुंबईत शिक्षण घेत असताना गंगाधरच्या एका शिक्षकामुळे त्याचा रा. स्व. संघाच्या शिवाजी पार्कच्या शाखेशी संबंध आला होता. पण संघाच्या शिकवणुकीविषयी त्यांचा भ्रमनिरास झाला आणि नंतर वडिलांच्या बदलीमुळे त्यांचा संघाशी असलेला संबंध कायमचा तुटला. पुन्हा ते मुंबईत आले पण तेव्हा त्यांच्या विचारांवर मार्क्सवाद आणि साने गुरूजी यांच्या विचारांचा पगडा होता. त्यांनी मुंबईच्या पोदार महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केले. वाणिज्य शाखेमध्ये अॅडव्हान्स बँकींगमध्ये ते विद्यापीठात सर्वप्रथम आले. त्यांना सरकारी नोकरी मिळाली तीही निर्वासितांचे अश्रू पुसणारी.
स्वातंत्र मिळाल्यावर देशातल्या निर्वासितांच्या छावण्यांमध्ये जाऊन त्यांना मदत करताना आपल्या समाजातील विषमता त्यांना सतत डाचत होती आणि त्याचवेळी साने गुरूजींच्या साहित्याचा प्रभाव त्यांच्या मनावर होत होता. एका क्षणी त्यांनी ठाम निर्णय घेतला आणि नोकरी सोडून कम्युनिस्ट पक्षात ते दाखल झाले. मार्क्सवादी साहित्य संपूर्णपणे वाचून पूर्ण विचारांती कम्युनिस्ट पक्षात दाखल झालेल्या चिटणीसांची नाळ गिरणी कामगारांच्या प्रत्येक लढयाबरोबर अधिक घट्ट होत गेली. १९५२ मध्ये पक्षात आल्यावर त्यांनी कॉ. डांगे यांच्या बरोबर आयटकच्या कामात स्वत:ला झोकून दिले आणि कार्यालयीन कामकाजाची जबाबदारी स्वत:हून स्वीकारली.
गिरणी कामगारांच्या संपामध्ये गिरणगावातील अनेक गिरण्यांच्या दरवाजावर संपफोडय़ांचे हल्ले झेलत, कामगारांना आपली भूमिका पटवून देण्यात चिटणीसांचा हातखंडा होता. शिवसेनेच्या उदयानंतर त्यांना तोडीस तोड उत्तर देण्यासाठी गिरणी कामगार युनियन आणि कम्युनिस्ट पक्षातर्फे काढण्यात आलेल्या ‘लाल बावटा’ या मुखपत्राचे संपादन चिटणीस यांनी केले होते. गिरणी कामगारांचे बोनसचे लढे असोत किंवा क्षणिक एखाद्या मुद्यावरून एखाद्या गिरणीत अचानक आंदोलन झालेले असो, चिटणीस तेथील तणाव कमी करण्याचा प्रयत्न करीत असत.
कमला मिल असो वा मधुसूदन मिल तेथील कामगारांना आजही पोलिसांबरोबर झालेल्या संघर्षांत चिटणीसांनी बजावलेली समन्वयाची भूमिका लक्षात आहे. अनेकदा हल्ले झाल्यावरही त्याच नेटाने आपली ‘गेट मिटींग’ पूर्ण करणारे चिटणीस पंक्षातर्गत वादामध्ये कधी पडले नाहीत. पक्षाचा आदेश कायम मानणारे आणि प्रसंगी आपल्या मनाला मुरड घालून तो आदेश शेवटपर्यंत पाळणारे, असे ते एकनिष्ठ पदाधिकारी होते. गिरणी कामगार युनियनच्या स्थापनेपासून किंबहुना त्या अगोदरपासून त्यांनी गिरणी कामगारांची लढाई पाहिली होती.
१९७१ ते २००० पर्यंत तब्बल २९ वर्षे ते मुंबई गिरणी कामगार युनियनचे कार्यवाह होते. पक्षांतर्गत मतभेद असले तरीही त्यांनी भावनिक आणि वैचारिक पातळीवर भारतीय कम्युनिस्ट पक्षाबरोबर असलेली नाळ कधीही तोडली नाही. आंतरराष्ट्रीय राजकारणही जवळून अभ्यासलेल्या साम्यवादी नेते आणि कार्यकर्त्यांच्या पठडीतले ते होते. कामगारांच्या सर्व संघटना एकत्र करून पुन्हा एक मोठी लढाई उभारण्याची त्यांची मनीषा होती, पण ती त्यांची मंझिल दूरच राहिली.
आठ वर्षे प्रकृती साथ देत नसतानाही त्यांनी आपला अभ्यास सुरू ठेवला. काही दिवसांपूर्वी त्यांना इस्पितळात दाखल केले तेव्हाही ते आपल्या मंझिलबाबत आशावादी होते. इतक्या सरळ मनाचा, इतका नि:स्पृह आणि इतक्या निस्वार्थीपणे आपले जीवन, ध्येयासाठी पूर्णपणे वाहून टाकणारा असा हा कॉम्रेड होता. त्यामुळेच जेव्हा कम्युनिस्ट पक्षात फूट पडली तेव्हा आणि कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांना पक्षातच टीकेचे लक्ष्य केले गेले, तेव्हा त्यांना खूप वेदना झाल्या. परंतु ते वैचारिक आणि धोरणात्मक वादामध्ये सहसा पडत नसत आणि आपला लाल ध्रुव तारा कधीतरी अवघ्या जगावरती त्याची प्रभा पसरवेल असा आत्मविश्वास त्यांना अखेपर्यंत होता. त्यामुळेच अनेकदा जागतिक पातळीवरती साम्यवादी देशांना व विचारांना पीछेहाट सहन करावी लागली तरी ते खचून गेले नाहीत.
भविष्य कामगार आणि कष्टकरी वर्गाच्याच हातात आहे अशी खात्री त्यांना होती आणि ती मनात ठेऊनच ते चिरंतनात विलिन झाले.