संगीत हे केवळ कर्णसंपुटांना समाधान देणारे साधन नाही, तर संगीताचा प्रत्येक स्वर आणि त्यापासून निर्माण होणारी ध्वनिकंपने शारीरिक समाधान आणि प्रफुल्लित चित्तवृत्तींचे उगमस्थान असतात, ही आता केवळ समजूत राहिलेली नाही. भारतीय संस्कृतीने शतकांच्या सखोल साधनेतून सिद्ध केलेल्या या वास्तविकतेला पुन्हा जनमानसात रुजविण्याची गरज ओळखून स्वार्थनिरपेक्ष काम करणारे
पं. डॉ. चंद्रकांत सरदेशमुख यांच्या निधनाने संगीतसाधनेच्या परंपरेतला एक अलौकिक दुवा निखळला आणि शरीर, मन व संगीत यांच्या नात्याची वैज्ञानिक उकल करण्याचे एक ‘संशोधनव्रत’ खंडित झाले. केवळ आंतरराष्ट्रीय ख्यातीचा उत्कृष्ट सतारवादक, एवढीच पं. सरदेशमुखांची ओळख नाही, तर संगीतविश्व हा मानवाच्या असंख्य भावविश्वांना सांधणारा प्रभावी दुवा आहे, हे ओळखून संगीतप्रसाराचा ध्यास घेतलेला एक आधुनिक मनस्वी माणूस अशी त्यांची खरी ओळख आहे. भारतीय संस्कृतीत संस्कृत मंत्रोच्चारांचे स्थान अढळ आहे, पण मंत्रोच्चार किंवा मंत्रपठण हा ‘पठडीबाज परंपरावाद’ असल्याचे अर्धज्ञान आजही उजळले जाते.
संस्कृत श्लोकांचे संगीतशास्त्रीय पठण मानवी आयुष्याला परमोच्च समाधानाचे क्षण प्राप्त करून देते, मानसिक जाणिवा पराकोटीच्या प्रगल्भ करते आणि जीवन समृद्ध करते. संस्कृत श्लोकपठणातील ध्वनिलहरींच्या कंपनांतून शारीरिक व्याधींचे समूळ उच्चाटन होते, दुष्प्रवृत्ती दूर होतात आणि मनाला आपोआपच माणुसकीचा स्पर्श होतो. अशा तऱ्हेने, मंत्रपठण ही समृद्ध आयुष्यासाठीची एक तप:साधना बनते, हे पं. सरदेशमुखांच्या संशोधनाचे सार! वयाच्या चौथ्या वर्षीपासूनच्या कठोर संगीत साधनेतून साधलेला हा साक्षात्कार समाजास अर्पण करण्याच्या भावनेतून पुढे, संगीत हे आरोग्य आणि मानसिक समाधानप्राप्तीचे साधन ठरावे, यासाठी पं. सरदेशमुख यांचे संशोधन सुरू झाले. वसंत बहरला, की कोकिळेच्या कंठातील अलौकिक सूर माणसाला मोहवून टाकतात. त्या सुरांच्या स्वर्गीयतेची जाणीव त्या कोकिळेला असेलच असे नाही, पण संगीताचा ‘स्वर’ ओळखणारा आणि जोखणारा जाणकार कान प्रकृतीने माणसालाच बहाल केला आहे. हाच ‘जाणता कान’ जोपासावा, यासाठी पं. सरदेशमुख सतत तळमळले.
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात आणि पुणे विद्यापीठातही संगीत साधना सुरू झाली, हे त्या तळमळीचेच फलित होय. याच तळमळीतून त्यांनी अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया आणि कर्मभूमी जपानमध्ये भारतीय संगीताचे स्वर अजरामर केले. संगीत क्षेत्रातील नव्या दिशांचा शोध आणि वेध घेत नव्या पिढीसाठी संगीतात संशोधन करणाऱ्या पं. सरदेशमुख यांना त्यांच्या वडिलांचा आणि कुटुंबाचा आयुर्वेदाचा वारसा मिळाला होता, पण तो केवळ व्यावसायिकतेसाठी न वापरता, मानवी आरोग्य आणि मनाच्या संपन्नतेसाठी आयुर्वेद आणि संगीतोपचारांची सुरेख सांगड घालणारे संशोधन पं. सरदेशमुखांनी सुरू केले. म्हणूनच, भारतीय संस्कृती आणि तत्त्वज्ञानाची खरी ओळख झालेल्या या ज्ञानवंताने आपल्या अध्र्यामुध्र्या आयुष्यात केलेल्या कामाचे महत्त्व मोठे आहे.