गिरीश कुलकर्णी

मॅकेनिकल इंजिनिअरिंगची पार्श्वभूमी असताना गिरीश कुलकर्णी मराठी सिनेइंडस्ट्रीमध्ये आला. हा मुलगा पुस्तकातील मॅकॅनिक्स सिनेमामध्ये कसे वापरेल, सिनेमा काढण्यात तो यशस्वी होईल की नाही, अशा अनेक शंका सुरुवातीला होत्या. मात्र, गिरीश नि:संदेह होता. सगळ्या प्रकारच्या प्रेक्षकांना अपील होणारा सिनेमा आपल्याला काढायचाय आणि त्यात आपण नक्कीच यशस्वी होऊ, असा पक्का आत्मविश्वास त्याला होता. त्याच्या या विश्वासानं आणि केलेल्या प्रयत्नानं 'वळू', 'विहीर', 'गाभ्रीचा पाऊस', 'देऊळ' हे उत्कृष्ट सिनेमे मराठी चित्रपटसृष्टीला मिळाले.

मराठी सिनेमे पाहण्यासाठी प्रेक्षकांना थिएटरकडे वळवण्यात हे सिनेमे महत्त्वाचे ठरले. यावर्षीचा उत्कृष्ट अभिनेता आणि संवादाचा तसंच 'देऊळ'ला बेस्ट फिचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवल्यानंतर गिरीशचं सिनेमा मेकिंगचं टॅलेंट पुन्हा एकदा अधोरेखित झालं. 'तुझा सिनेमा शहरी आणि ग्रामीण भागातील प्रेक्षकांना अपील होतो, हा मेळ साधणं कसं शक्य होतं,' यावर गिरीशचं एकच उत्तर असतं. ते म्हणजे,' आधी मीच माझ्या सिनेमाचा प्रेक्षक असतो. मला आवडला, तरच तो सगळ्या प्रकारच्या प्रेक्षकांना आवडेल असा निष्कर्ष मी काढतो.' आवर्जून पाहावेत असे मराठी सिनेमा आता येत नाहीत, अशी ओरड मध्यंतरी होती. त्यावर 'इतर कुणी मराठी सिनेमा काढत नाही ना, मग आपणच काढू,' या ध्यासानं गिरीशनं कामाला सुरुवात केली. आज त्याचे 'रिझल्ट्स' 'वळू', 'देऊळ'च्या रूपात पाहायला मिळताहेत.

गिरीशला शाळेत असल्यापासूनच नाटकांची आवड. मॅकेनिकलचं शिक्षण घेत असताना नाटकांविषयीची आवड त्याला शांत बसू देत नव्हती. त्यामुळे अभ्यास सांभाळून प्रायोगिक नाटकंही तो करत होता. मध्यंतरी एका रेडिओ स्टेशनसाठी प्रोग्रामिंग हेड म्हणूनही त्यानं काम केलं. मग त्याला सिनेमाचे वेध लागले. या प्रवासात दहावीपासून मित्र असलेल्या उमेश कुलकर्णीची साथ त्याला मिळाली. उमेश एफटीआयआयमध्ये शिक्षण घेत होता. त्यामुळे गिरीशासाठी उमेश सिनेनिमिर्तीसाठी एक 'इन्स्टिट्यूट' झाला. सिनेमा मेकिंगमधल्या तांत्रिक गोष्टी कळण्यासाठी उमेश त्यासाठी माध्यम बनला. मग काय, या जोडगोळीनं मराठी सिनेइंडस्ट्रीला सोन्याचे दिवस देण्यासाठी एकदम भरारीच घेतली. आज ही भरारी यशस्वी ठरली आहे. यापुढेही मायबाप प्रेक्षकांना गिरीश-उमेशनं केलेले उत्कृष्ट सिनेमे पाहायला मिळतील, अशी अपेक्षा करणं नक्कीच फोल ठरणार नाही.

(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)

गिरीश कुलकर्णी

गिरीश कुलकर्णी हा मराठीमधील नामांकित व सध्याचा आघाडीचा कथा व पटकथाकार आहे. वळू, विहीर, आणि देऊळ यांसारख्या दर्जेदार व यशस्वी चित्रपटांच्या कथा व पटकथा लिहून त्यांने सर्वसामान्य रसिकांच्या मनामध्ये मानाचे स्थान पटकाविले आहे. उमेश कुलकर्णी ने प्रथमच दिग्दर्शित केलेल्या गिरणी या डिप्लोमा फिल्मच्या कथेचे व पटकथेचे लेखन गिरीश कुलकर्णीच्या सक्षम व प्रभावी लेखणीकडून घडले. तो जस हाडाचा लेखक व कथाकार आहेच, तितक्याच नैसर्गिकरित्या तो अभिनयदेखील करू शकतो हे त्याने सिध्द केले आहे. गाभ्रीचा पाऊस या सतिश मनवर दिग्दर्शित चित्रपटातील दुष्काळाने पिडीत कर्जबाजारी शेतकर्‍याची भूमिका त्याला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उत्तम अभिनेत्याचे पारितोषिक मिळवून गेली. आज गिरीश त्याच्या बहुस्पर्शी कर्तुत्वामुळे लाखो मराठी तरूणांचा आदर्श ठरला आहे.




मॅकेनिकल इंजिनिअरिंगची पार्श्वभूमी असताना गिरीश कुलकर्णी मराठी सिनेइंडस्ट्रीमध्ये आला. हा मुलगा पुस्तकातील मॅकॅनिक्स सिनेमामध्ये कसे वापरेल, सिनेमा काढण्यात तो यशस्वी होईल की नाही, अशा अनेक शंका सुरुवातीला होत्या. मात्र, गिरीश नि:संदेह होता. सगळ्या प्रकारच्या प्रेक्षकांना अपील होणारा सिनेमा आपल्याला काढायचाय आणि त्यात आपण नक्कीच यशस्वी होऊ, असा पक्का आत्मविश्वास त्याला होता. त्याच्या या विश्वासानं आणि केलेल्या प्रयत्नानं ‘वळू’, ‘विहीर’, ‘गाभ्रीचा पाऊस’, ‘देऊळ’ हे उत्कृष्ट सिनेमे मराठी चित्रपटसृष्टीला मिळाले.

मराठी सिनेमे पाहण्यासाठी प्रेक्षकांना थिएटरकडे वळवण्यात हे सिनेमे महत्त्वाचे ठरले. यावर्षीचा उत्कृष्ट अभिनेता आणि संवादाचा तसंच ‘देऊळ’ला बेस्ट फिचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवल्यानंतर गिरीशचं सिनेमा मेकिंगचं टॅलेंट पुन्हा एकदा अधोरेखित झालं. ‘तुझा सिनेमा शहरी आणि ग्रामीण भागातील प्रेक्षकांना अपील होतो, हा मेळ साधणं कसं शक्य होतं,’ यावर गिरीशचं एकच उत्तर असतं. ते म्हणजे,’ आधी मीच माझ्या सिनेमाचा प्रेक्षक असतो. मला आवडला, तरच तो सगळ्या प्रकारच्या प्रेक्षकांना आवडेल असा निष्कर्ष मी काढतो.’ आवर्जून पाहावेत असे मराठी सिनेमा आता येत नाहीत, अशी ओरड मध्यंतरी होती. त्यावर ‘इतर कुणी मराठी सिनेमा काढत नाही ना, मग आपणच काढू,’ या ध्यासानं गिरीशनं कामाला सुरुवात केली. आज त्याचे ‘रिझल्ट्स’ ‘वळू’, ‘देऊळ’च्या रूपात पाहायला मिळताहेत.

गिरीशला शाळेत असल्यापासूनच नाटकांची आवड. मॅकेनिकलचं शिक्षण घेत असताना नाटकांविषयीची आवड त्याला शांत बसू देत नव्हती. त्यामुळे अभ्यास सांभाळून प्रायोगिक नाटकंही तो करत होता. मध्यंतरी एका रेडिओ स्टेशनसाठी प्रोग्रामिंग हेड म्हणूनही त्यानं काम केलं. मग त्याला सिनेमाचे वेध लागले. या प्रवासात दहावीपासून मित्र असलेल्या उमेश कुलकर्णीची साथ त्याला मिळाली. उमेश एफटीआयआयमध्ये शिक्षण घेत होता. त्यामुळे गिरीशासाठी उमेश सिनेनिमिर्तीसाठी एक ‘इन्स्टिट्यूट’ झाला. सिनेमा मेकिंगमधल्या तांत्रिक गोष्टी कळण्यासाठी उमेश त्यासाठी माध्यम बनला. मग काय, या जोडगोळीनं मराठी सिनेइंडस्ट्रीला सोन्याचे दिवस देण्यासाठी एकदम भरारीच घेतली. आज ही भरारी यशस्वी ठरली आहे. यापुढेही मायबाप प्रेक्षकांना गिरीश-उमेशनं केलेले उत्कृष्ट सिनेमे पाहायला मिळतील, अशी अपेक्षा करणं नक्कीच फोल ठरणार नाही.

(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)

गिरीश कुलकर्णी

गिरीश कुलकर्णी हा मराठीमधील नामांकित व सध्याचा आघाडीचा कथा व पटकथाकार आहे. वळू, विहीर, आणि देऊळ यांसारख्या दर्जेदार व यशस्वी चित्रपटांच्या कथा व पटकथा लिहून त्यांने सर्वसामान्य रसिकांच्या मनामध्ये मानाचे स्थान पटकाविले आहे. उमेश कुलकर्णी ने प्रथमच दिग्दर्शित केलेल्या गिरणी या डिप्लोमा फिल्मच्या कथेचे व पटकथेचे लेखन गिरीश कुलकर्णीच्या सक्षम व प्रभावी लेखणीकडून घडले. तो जस हाडाचा लेखक व कथाकार आहेच, तितक्याच नैसर्गिकरित्या तो अभिनयदेखील करू शकतो हे त्याने सिध्द केले आहे. गाभ्रीचा पाऊस या सतिश मनवर दिग्दर्शित चित्रपटातील दुष्काळाने पिडीत कर्जबाजारी शेतकर्‍याची भूमिका त्याला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उत्तम अभिनेत्याचे पारितोषिक मिळवून गेली. आज गिरीश त्याच्या बहुस्पर्शी कर्तुत्वामुळे लाखो मराठी तरूणांचा आदर्श ठरला आहे.


Author