(कॉ.) गोविंद पानसरे

पानसरे, (कॉ.) गोविंद

‘राजर्षी शाहू पुरस्कारा’साठी कॉ. गोविंद पानसरे यांची निवड यंदा झाली, तो त्यांना २६ जून रोजी दिला जाईल. दोन वर्षांपूर्वी स्वत:च्या अमृत महोत्सवप्रसंगी ‘माझ्याखेरीज अन्य कार्यकर्त्यांवर पुस्तके काढा’ म्हणणारे कॉ. पानसरे या प्रतिष्ठेच्या सन्मानाला तयार झाले, हेच विशेष. शाहूंच्या कोल्हापुरातूनच गेली सहाहून अधिक दशके पानसरे महाराष्ट्रीय पुरोगामी चळवळीला दिशा देणारे काम करताहेत.
कामगार चळवळ, विद्यार्थी चळवळीला मार्गदर्शन, स्त्री-मुक्ती चळवळीत इथल्या मातीच्या गरजा ओळखणारे ‘जटामुक्ती’ कार्यक्रम हाती घेणे आणि वयपरत्वे व्याख्याने / लेखन यांतून प्रबोधनावर भर देणे हे त्यांचे हल्लीच्या तरुणांना चटकन आठवणारे काम. पण संयुक्त महाराष्ट्र आणि गोवामुक्ती आंदोलने यांत सक्रिय असलेले पानसरे पुढे वकील म्हणून केवळ न्यायालयीन लढाया न लढता लोकजागृतीसाठी रस्त्यावरही उतरत राहिले. ‘यशवंतराव चव्हाणांना कोल्हापूर प्रवेशबंदी’ किंवा ‘गुंडगिरीविरोधी मोर्चा’ अशी नावीन्यपूर्ण आंदोलने त्यांनी केली. शेतमजुरांची युनियन सशक्त केली आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाला थेट रस्त्यावर उतरून कृतीचा भक्कम पायाही दिला. अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार ते कोल्हापूर हे स्थलांतर इयत्ता सातवीनंतर पुढल्या शिक्षणासाठी करण्यात पानसरे यांना ज्या गोविंद पत्की या गुरुजींची मदत झाली, त्यांनीच राष्ट्र सेवा दलाच्या संस्कारांची शिदोरीही पानसरे यांना दिली होती. मात्र पुढे, १९५२ साली कसे लढायचे, हा प्रश्न आला तेव्हा दलाचा सौम्य समाजवाद सोडून थेट साम्यवादी पक्षात प्रवेश करणाऱ्यांत ते सामील झाले. कम्युनिस्ट चळवळीला मुंबईत जे फूट, पोथीनिष्ठा आदी उपसर्ग झाले ते कोल्हापुरात झाले नाहीत, याचे कारण बागल, गायकवाड, पानसरे, आदींची लोकनिष्ठ आणि बुद्धिनिष्ठ काम करत राहण्याची पद्धत. वकिलीपर्यंतचे शिक्षण घेताना नानापरींचे कष्ट करावे लागणे, निवाराही नसताना कधी पुस्तकांच्या दुकानात तर कधी ज्येष्ठ कार्यकर्त्यांकडे राहणे अशा अनुभवांनी ही लोकनिष्ठा पानसरे यांच्यात भिनवली. शाहू महाराजांच्या काळात स्थापन झालेल्या ‘प्रिन्स शिवाजी फ्री मराठा बोर्डिग हाऊस’ने पानसरे यांना छत्र दिले आणि इथेच त्यांच्यातला विद्यार्थी-कार्यकर्ताही घडला. याच शाहूंच्या नावाचा पुरस्कार आता पानसरे स्वीकारणार आहेत.
-----------------------------------------------------------------------

पानसरे, गोविंदराव उर्फ कॉम्रेड गोविंदराव पानसरे

कॉ. गोविंद पानसरे यांची पंचाहत्तरी झाली तेव्हा सहकारी आणि मित्रमंडळाने त्यांना १५ लाखांची थैली भेट दिली. कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता म्हणून जन्मभर वणवण केलेल्या आणि वैयक्तिक लाभहानीचा विचारही मनाला न शिवलेल्या पानसरेंनी त्याच कार्यक्रमात या निधीतून ७५ कॉम्रेड्सची प्रेरक चरित्रे पुस्तकरूपाने प्रसिद्ध केली जावीत, असे मनोगत व्यक्त केले. ते प्रत्यक्षातही आणले. कॉ. पानसरेंचे वैशिष्ट्य येथेच आहे. कोणत्याही गोष्टींचा नेमका वापर कसा करायचा हे ते काटेकोरपणे स्पष्ट करतात आणि काम पूर्ण होईपर्यंत स्वस्थ बसत नाहीत किंबहुना त्यांचे कार्यच त्यांना स्वस्थ बसू देत नाही. एकाच व्यक्तीत नेता आणि कार्यकर्ता असा अद्भुत संगम क्वचितच पाहायला मिळतो. कॉ. पानसरे तर परखड लेखक आणि फर्डे वक्ताही आहेत. सर्व डाव्या, पुरोगामी गटांशी त्यांचा दोस्ताना आहे.

अहमदनगरच्या श्रीरामपूरमधील कोल्हार गावी त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. राहुरीला माध्यमिक शिक्षण घेतले. घरची परिस्थिती तशी बेताची. कोल्हापूरच्या प्रिन्स शिवाजी फ्री मराठा बोर्डिंगमध्ये राहून राजाराम कॉलेजात त्यांनी शिक्षण सुरू केले. प्रसंगी वृत्तपत्रविक्रेता म्हणून कामही केले. महापालिकेत शिपायाची नोकरी केली. म्युनिसिपल बोर्डात प्राथमिक शिक्षक बनले. कायद्याचे शिक्षण पूर्ण करून वकिली सुरू केली.

पण हे इतपतच नव्हते. राष्ट्र सेवा दलातही जाणे चालू होते. पुढे पानसरेंनी कॉ. माधवराव बागल, कॉ. माधवराव गायकवाड, कॉ. गुलाबराव गणाचार्य, कॉ. बापूराव जगताप यांच्यासोबत १९५२ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पूर्णवेळ काम सुरू केले. संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन, गोवा मुक्ती आंदोलन यात तर ते होतेच ; पण कम्युनिस्ट पक्षाचा कणा असलेल्या आयटकच्या कामगार आणि शेतमजुरांच्या युनियन बांधण्यात त्यांनी सिंहाचा वाटा उचलला. यशवंतराव चव्हाणांना कोल्हापूर जिल्हाबंदी करणारे पानसरे अद्याप अनेकांच्या स्मरणात असतील. पानसरे आजही मोलकरणी, रिक्षावाले, टपरीवाले यांच्या संघटनाबांधणीत गुंतलेले आहेत. त्यांचे सारे कुटुंबच कार्यकर्ते आहे. काही वर्षांपूर्वी पुत्रवियोगाचे दुःख त्यांच्या वाट्याला आले. कॉ. अवीला अखेरचा निरोप देण्यासाठी आलेल्यांना ते म्हणाले, ' अश्रु ढाळू नका, त्याऐवजी मी आजन्म समाजासाठी काम करेन अशी शपथ घ्या.' आणि तशी ती त्यांनी उपस्थितांना घ्यायला लावलीही.

त्यांनी विपुल लेखन केले आहे, मात्र शिवाजी खरा कोण होता या त्यांच्या दीड लाखांहून अधिक खपलेल्या पुस्तकाने सामाजिक न्यायावर आधारलेल्या बहुजनवादी शिवाजीराजाची नवी ओळख आक्रमकपणे महाराष्ट्राला करून दिली. प्रचंड आवाका असलेल्या या मर्‍हाटी मातीतल्या साम्यवाद्याचा गौरव राजर्षि शाहू पुरस्काराने करण्यात आला.

(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)

पानसरे, (कॉ.) गोविंद

‘राजर्षी शाहू पुरस्कारा’साठी कॉ. गोविंद पानसरे यांची निवड यंदा झाली, तो त्यांना २६ जून रोजी दिला जाईल. दोन वर्षांपूर्वी स्वत:च्या अमृत महोत्सवप्रसंगी ‘माझ्याखेरीज अन्य कार्यकर्त्यांवर पुस्तके काढा’ म्हणणारे कॉ. पानसरे या प्रतिष्ठेच्या सन्मानाला तयार झाले, हेच विशेष. शाहूंच्या कोल्हापुरातूनच गेली सहाहून अधिक दशके पानसरे महाराष्ट्रीय पुरोगामी चळवळीला दिशा देणारे काम करताहेत.
कामगार चळवळ, विद्यार्थी चळवळीला मार्गदर्शन, स्त्री-मुक्ती चळवळीत इथल्या मातीच्या गरजा ओळखणारे ‘जटामुक्ती’ कार्यक्रम हाती घेणे आणि वयपरत्वे व्याख्याने / लेखन यांतून प्रबोधनावर भर देणे हे त्यांचे हल्लीच्या तरुणांना चटकन आठवणारे काम. पण संयुक्त महाराष्ट्र आणि गोवामुक्ती आंदोलने यांत सक्रिय असलेले पानसरे पुढे वकील म्हणून केवळ न्यायालयीन लढाया न लढता लोकजागृतीसाठी रस्त्यावरही उतरत राहिले. ‘यशवंतराव चव्हाणांना कोल्हापूर प्रवेशबंदी’ किंवा ‘गुंडगिरीविरोधी मोर्चा’ अशी नावीन्यपूर्ण आंदोलने त्यांनी केली. शेतमजुरांची युनियन सशक्त केली आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाला थेट रस्त्यावर उतरून कृतीचा भक्कम पायाही दिला. अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार ते कोल्हापूर हे स्थलांतर इयत्ता सातवीनंतर पुढल्या शिक्षणासाठी करण्यात पानसरे यांना ज्या गोविंद पत्की या गुरुजींची मदत झाली, त्यांनीच राष्ट्र सेवा दलाच्या संस्कारांची शिदोरीही पानसरे यांना दिली होती. मात्र पुढे, १९५२ साली कसे लढायचे, हा प्रश्न आला तेव्हा दलाचा सौम्य समाजवाद सोडून थेट साम्यवादी पक्षात प्रवेश करणाऱ्यांत ते सामील झाले. कम्युनिस्ट चळवळीला मुंबईत जे फूट, पोथीनिष्ठा आदी उपसर्ग झाले ते कोल्हापुरात झाले नाहीत, याचे कारण बागल, गायकवाड, पानसरे, आदींची लोकनिष्ठ आणि बुद्धिनिष्ठ काम करत राहण्याची पद्धत. वकिलीपर्यंतचे शिक्षण घेताना नानापरींचे कष्ट करावे लागणे, निवाराही नसताना कधी पुस्तकांच्या दुकानात तर कधी ज्येष्ठ कार्यकर्त्यांकडे राहणे अशा अनुभवांनी ही लोकनिष्ठा पानसरे यांच्यात भिनवली. शाहू महाराजांच्या काळात स्थापन झालेल्या ‘प्रिन्स शिवाजी फ्री मराठा बोर्डिग हाऊस’ने पानसरे यांना छत्र दिले आणि इथेच त्यांच्यातला विद्यार्थी-कार्यकर्ताही घडला. याच शाहूंच्या नावाचा पुरस्कार आता पानसरे स्वीकारणार आहेत.
———————————————————————–

पानसरे, गोविंदराव उर्फ कॉम्रेड गोविंदराव पानसरे

कॉ. गोविंद पानसरे यांची पंचाहत्तरी झाली तेव्हा सहकारी आणि मित्रमंडळाने त्यांना १५ लाखांची थैली भेट दिली. कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता म्हणून जन्मभर वणवण केलेल्या आणि वैयक्तिक लाभहानीचा विचारही मनाला न शिवलेल्या पानसरेंनी त्याच कार्यक्रमात या निधीतून ७५ कॉम्रेड्सची प्रेरक चरित्रे पुस्तकरूपाने प्रसिद्ध केली जावीत, असे मनोगत व्यक्त केले. ते प्रत्यक्षातही आणले. कॉ. पानसरेंचे वैशिष्ट्य येथेच आहे. कोणत्याही गोष्टींचा नेमका वापर कसा करायचा हे ते काटेकोरपणे स्पष्ट करतात आणि काम पूर्ण होईपर्यंत स्वस्थ बसत नाहीत किंबहुना त्यांचे कार्यच त्यांना स्वस्थ बसू देत नाही. एकाच व्यक्तीत नेता आणि कार्यकर्ता असा अद्भुत संगम क्वचितच पाहायला मिळतो. कॉ. पानसरे तर परखड लेखक आणि फर्डे वक्ताही आहेत. सर्व डाव्या, पुरोगामी गटांशी त्यांचा दोस्ताना आहे.

अहमदनगरच्या श्रीरामपूरमधील कोल्हार गावी त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. राहुरीला माध्यमिक शिक्षण घेतले. घरची परिस्थिती तशी बेताची. कोल्हापूरच्या प्रिन्स शिवाजी फ्री मराठा बोर्डिंगमध्ये राहून राजाराम कॉलेजात त्यांनी शिक्षण सुरू केले. प्रसंगी वृत्तपत्रविक्रेता म्हणून कामही केले. महापालिकेत शिपायाची नोकरी केली. म्युनिसिपल बोर्डात प्राथमिक शिक्षक बनले. कायद्याचे शिक्षण पूर्ण करून वकिली सुरू केली.

पण हे इतपतच नव्हते. राष्ट्र सेवा दलातही जाणे चालू होते. पुढे पानसरेंनी कॉ. माधवराव बागल, कॉ. माधवराव गायकवाड, कॉ. गुलाबराव गणाचार्य, कॉ. बापूराव जगताप यांच्यासोबत १९५२ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पूर्णवेळ काम सुरू केले. संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन, गोवा मुक्ती आंदोलन यात तर ते होतेच ; पण कम्युनिस्ट पक्षाचा कणा असलेल्या आयटकच्या कामगार आणि शेतमजुरांच्या युनियन बांधण्यात त्यांनी सिंहाचा वाटा उचलला. यशवंतराव चव्हाणांना कोल्हापूर जिल्हाबंदी करणारे पानसरे अद्याप अनेकांच्या स्मरणात असतील. पानसरे आजही मोलकरणी, रिक्षावाले, टपरीवाले यांच्या संघटनाबांधणीत गुंतलेले आहेत. त्यांचे सारे कुटुंबच कार्यकर्ते आहे. काही वर्षांपूर्वी पुत्रवियोगाचे दुःख त्यांच्या वाट्याला आले. कॉ. अवीला अखेरचा निरोप देण्यासाठी आलेल्यांना ते म्हणाले, ‘ अश्रु ढाळू नका, त्याऐवजी मी आजन्म समाजासाठी काम करेन अशी शपथ घ्या.’ आणि तशी ती त्यांनी उपस्थितांना घ्यायला लावलीही.

Author