(डॉ.) अनला पंडित

पंडित, (डॉ.) अनला

कोणत्याही खासगी अथवा सार्वजनिक कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या यंत्रणेने आपल्याकडे उपलब्ध असलेल्या माहिती साठय़ाचा योग्य उपयोग करून घेतल्यास त्याचा कंपनीच्या विकासासाठी मोठा फायदा होऊ शकतो; पण त्यासाठी कंपनी कर्मचाऱ्यांना आपल्याच कंपनीमध्ये उपलब्ध असलेल्या या माहितीचा कसा शोध घ्यायचा याचे प्रशिक्षण दिले जाणे आवश्यक असते. किंबहुना ही माहिती कशी जमा करावी, त्याचा उपयोग कसा करावा याबाबतचा खास अभ्यासक्रम असेल तर त्याचा मोठाच फायदा होऊ शकतो.

‘वीरमाता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिटय़ूट’च्या (व्हीजेटीआय) सहाय्यक प्राध्यापिका अनला पंडित यांनी ‘आयबीएम’ या जगविख्यात संगणक कंपनीला अशा माहितीचा उपयोग करून घेणारा ‘कॉम्पिटिटिव्ह इंटलिजन्स यूजिंग बिझनेस अ‍ॅनॅलिसिस’ हा प्रोजेक्ट सादर केला. पंडित यांचा हाच प्रोजेक्ट ‘आयबीएम’च्या दहा हजार डॉलर्सच्या (सुमारे साडेचार लाख रुपये) ‘सर्जनशील शिक्षक पुरस्काराचा’ मानकरी ठरला आहे. जगभरातून २०४ तर भारतातून अवघ्या सहा जणांची या पुरस्कारासाठी निवड झाली होती, त्यात पंडित एक होत्या. ‘आयबीएम’ने दिलेल्या या रकमेतून आता पंडित ‘व्हीजेटीआय’मध्ये हा प्रोजेक्ट प्रत्यक्ष राबविणार आहेत. कोणत्याही प्रोजेक्टसाठी, संशोधन कार्यासाठी एखाद्या कंपनीकडून अशा प्रकारचा पुरस्कार मिळणे ही त्या शिक्षकासाठी व संबंधित महाविद्यालयासाठी अभिमानास्पद बाब असते. सायन येथील ‘एसआयईएस’ महाविद्यालयातून त्यांनी १९८१ मध्ये बीएस्सी तर १९८३ साली मुंबई विद्यापीठातून एमएस्सी अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांनी अमेरिकेत ‘युनिव्हर्सिटी ऑफ लुईविल’मध्ये दोन वर्षांचा एमएस इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग हा (एमटेक समकक्ष) अभ्यासक्रम पूर्ण केला. पंडित यांच्या आई शिक्षिका तर वडील महापालिकेमध्ये नोकरी करणारे. त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच हे उच्चशिक्षण शक्य झाले. ८५ साली शिक्षण पूर्ण करून त्या मुंबईस परतल्या आणि वाटुमल अभियांत्रिकी महाविद्यालयात व्याख्यात्या म्हणून रुजू झाल्या. विद्यार्थ्यांना पुस्तकाबाहेरचे शिक्षण द्यायचे, त्यांना संशोधनासाठी प्रवृत्त करायचे, पुस्तकी शिक्षणाबरोबरच समाजासोबत जोडून घ्यायला प्रवृत्त करायचे या हेतूने त्यांनी विविध उपक्रम महाविद्यालयात सुरू केले. पती अनिरूद्ध हे ‘आयसीटी’मध्ये (यूआयसीटी) प्राध्यापक, तर सासरे भालचंद्र पंडित हेसुद्धा शिक्षकच. त्या दोघांचे अनेक बाबतींत मार्गदर्शन आणि सहकार्य त्यांना लाभले. सुमारे साडेतीन वर्षांच्या सेवेनंतर काही कारणास्तव त्यांनी वाटूमल महाविद्यालयातील नोकरीचा राजीनामा दिला आणि क्रॉम्प्टन या खासगी कंपनीत त्या ‘कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह’ पदावर रूजू झाल्या. त्यांच्या कामाने प्रभावित होऊन वरिष्ठांनी प्रोबेशन काळातच त्यांना बढती दिली. मात्र तीन-चार वर्षे हे काम केल्यानंतर पुन्हा शिक्षकी पेशात यायचा निर्णय त्यांनी घेतला. १९९४ ते ९९ या काळात त्यांनी रिझवी इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट, व्हीजेटीआय, एमईटी या महाविद्यालयांमध्ये व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून काम केले. २००० मध्ये त्यांना व्हीजेटीआयमध्येच पूर्णवेळ व्याख्याता होण्याची संधी मिळाली. त्यांच्या कामाचा व्याप आता रेडिफ, आयबीएम, सिटी बँक अशा विविध कंपन्याच्या कर्मचाऱ्यापर्यंत जाऊन पोचला आहे. राष्ट्रीय स्तरावरच्या काही पुरस्कारांच्या मानकरीही त्या ठरल्या आहेत. त्यांना पीएच.डी.साठी अमेरिकेतील ‘युनिव्हर्सिटी ऑफ लुईविल’ येथे पाठविण्याचा निर्णय व्हीजेटीआयने घेतला आहे. ऑगस्टमध्ये त्या अमेरिकेला जाणार आहेत, त्यांच्या भावी वाटचालीला शुभेच्छा.

Author